डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? | Digital Marketing in Marathi

Digital marketing in Marathi : नमस्कार मित्रांनो, हल्ली सोशल मिडियाच्या जगामध्ये आपण डिजिटल मार्केटिंग हा शब्द रोज ऐकत असतो. अनेक जण आपल्या उत्पादनाची,ब्रॅंड आणि सेवांची जाहिरात करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग चा वापर करत आहेत आणि त्यापासून त्यांना खूप चांगला फायदा सुद्धा होत आहे. पण हे डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमक काय असतं? आणि ते कसं करतात? त्यांचे प्रकार कोणते असतात? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या digital marketing in marathi या आपल्या लेखांमध्ये करून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा आपला व्यवसाय वाढविण्यासाठी डिजिटल मार्केटिंग चा वापर करू इच्छित असाल किंवा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायची इच्छा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? (Digital Marketing in Marathi)

डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप साऱ्या गोष्टींचा समावेश होत असून सर्वसाधारणपणे डिजिटल मार्केटिंग ची व्याख्या करायची झाल्यास आपल्याला पुढीलप्रमाणे करता येईल.

digital marketing in marathi

डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपले उत्पादन / सेवा / ब्रॅंड / व्यवसाय यांचे इंटरनेटच्या आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्केटिंग म्हणजेच जाहिरात करणे होय.

इंटरनेटचा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून आपल्या वस्तू व सेवांची जाहिरात करण्याची कला आणि विज्ञान म्हणजेच डिजिटल मार्केटिंग होय.

डिजिटल मार्केटिंग मध्ये एखादी वस्तू किंवा उत्पादन, सेवा यांचे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीने ऑनलाईन मार्केटिंग केले जाते. याच्या माध्यमातून आपल्याला योग्य ग्राहकांपर्यंत अधिक जलदरीतीने व खूप कमी वेळामध्ये पोहोचण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी अनेक कंपन्या या आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी टीव्ही चॅनल्सचा वापर करायचा. आताही करतात, परंतु आता बहुसंख्य लोक हे मोबाईल च्या माध्यमातून सोशल मीडिया ॲक्सेस करत असतात. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब इत्यादी सामाजिक माध्यमे तसेच ई-मेल, वेबसाईट सारख्या सेवा यांचा समावेश होतो. आणि यास सर्व गोष्टींचा उपयोग डिजिटल मार्केटिंग मध्ये आपल्या उत्पादनाची जाहिरात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी केला जातो.

आपण बऱ्याच वेळा मोबाईल वापरत असताना आपल्या मोबाईलवर एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात आपल्याला पहावयास मिळते. ही डिजिटल मार्केटिंगच आहे.

आपला व्यवसाय जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आणि आपल्या वस्तू सेवा किंवा उत्पादनांचा जास्तीत जास्त खप होण्यासाठी त्या वस्तूंची चांगल्या प्रकारे मार्केटिंग करणे, तर चांगल्या पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे खूप गरजेचे असते, आणि ते आपण डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून सहज साध्य करू शकतो. आपण बऱ्याच वेळा बघतो की हल्ली बरीचशी उत्पादने (उदा. कपडे, सौंदर्यप्रसाधने, घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे) यांची ऑनलाईन खरेदी विक्री केली जाते. या सर्व उत्पादनांचे माहिती आपल्या ग्राहकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी त्या त्या कंपन्यांकडून डिजिटल मार्केटिंग चा प्रभावी वापर केला जातो.

उदाहरणार्थ ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांसारख्या अनेक कंपन्या खूप मोठ्या प्रमाणात डिजिटल मार्केटिंग चा वापर करून आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत.

Telegram GroupLink
Whatsapp ChannelLink

या मोठ्या कंपन्यांबरोबरच, आपण प्रत्येक जण व्यक्तिगत रीत्या सुद्धा आपण उत्पादन करत असलेल्या वस्तूचे, देत असलेल्या सेवेची संगणक, ई-मेल, मोबाईल, सोशल मीडिया इत्यादींच्या माध्यमातून घरबसल्या मार्केटिंग करू शकतो.

डिजिटल मार्केटिंग चे प्रकार | Types Of digital Marketing

डिजिटल मार्केटिंग हे इंटरनेट साहाय्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून केली जाते. त्यामध्ये वेबसाईट , सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), सोशल मीडिया मार्केटिंग, अफिलिएट मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, पे पर क्लिक ऍडव्हर्टायझिंग, ई-मेल मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग यांसारख्या प्रकारांचा समावेश होतो.

digital marketing in marathi

1) सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) (Search Engine Optimization)

SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे असे तंत्रज्ञान आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या वेबसाईटला सर्च इंजिन रिझल्ट पेज (SERPs) मध्ये वरच्या रँक वर आणू शकतो. म्हणजेच अनेक लोक जेव्हा गुगल, याहू, बिंग यांसारख्या सर्च इंजिन वर एखादी माहिती शोधतात, त्यावेळी आपल्या वेबसाईट वरील माहिती सगळ्यात वर दिसण्यासाठी आपल्याला SEO – सर्च इंजिन आप्टेमायझेशनचा उपयोग होतो.

SEO चे पुढील प्रकार असतात.

  • On Page SEO : ऑन पेज एसइओ हे आपल्या वेबसाईटच्या पेजवर केले जाते. यामध्ये Title Tag, Meta Discription, URL Optimization, Image optomization तसेच Keyword Optimization यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो.
  • Off Page SEO : यामध्ये वेबसाईटच्या बाहेर काम केले जाते. उदाहरणार्थ, आपल्या वेबसाईटसाठी चांगल्या बॅटलिंग्स मिळवणे, सोशल मीडियावर मार्केटिंग करणे तसेच गेस्ट पोस्ट ब्लॉगिंग करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

👉 हे पण वाचा : GDP म्हणजे काय ?

विमा म्हणजे काय ?

2) सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशांमध्ये खूप सारे सोशल मीडिया युजर्स आहेत. त्यामुळे आपल्या उत्पादनाची जाहिरात सोशल मीडिया एप्लीकेशन द्वारे करणे खूप फायद्याचे ठरते.

यामध्ये Facebook, Instagram, LinkedIn, Twitter यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्या targeted audiance च्या पर्यंत आपल्या व्यवसायाची किंवा उत्पादनाची माहिती आकर्षित रित्या पोहोचवली जाते.

  • सोशल मीडिया मार्केटिंग मुळे आपली वेबसाईट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तसेच अधिक लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे आपले ग्राहक आणि विक्री वाढण्याची संभाव्यता वाढते.
  • तसेच आपल्या व्यवसायाचा विशिष्ट ब्रँड निर्माण करणे आणि तो अधिकाधिक प्रसिद्ध करणे यास मदत होते.
  • सोशल मीडिया मार्केटिंगमुळे आपण ग्राहकांशी संवाद साधू शकतो, आपल्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल ग्राहकांची असलेली मते, त्यांच्या समस्या इत्यादींबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो.
  • आपले जे स्पर्धक आहेत त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय वाढवण्यास सोशल मीडिया मार्केटिंग आपल्याला मदत करते.

3) अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)

अफिलिएट मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंगचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये एखादी कंपनी (अफिलिएटर) दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा कंपनीला (अफिलिएट) तिच्या वस्तू/उत्पादन/सेवेची जाहिरात करण्यासाठी कमिशन देते.

अमेझॉन, फ्लिपकार्ट, होस्टिंगर यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्या अफलेट मार्केटिंग प्रोग्राम ऑफर करतात.

  • अफिलिएट प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्या कंपनी च्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागते, आणि आपण त्या प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी कंपनी ठरवलेले प्रक्रिया पूर्ण करतो.
  • त्यानंतर त्या अफिलिएटर कंपनीकडून आपल्याला एक त्यांच्या उत्पादनाची लिंक दिली जाते.
  • आपण आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवा वेबसाईटवर ती लिंक समाविष्ट करतो.
  • जेव्हा कोणताही व्यक्ती त्या लिंकच्या माध्यमातून त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तेथील प्रॉडक्ट खरेदी करतो त्यावेळी आपल्याला त्या कंपनीच्या माध्यमातून ठराविक कमिशन दिले जाते.

अफिलिएट मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंग चा खूप महत्त्वाचा आणि प्रभावशाली पर्याय आहे. अनेक प्रसिद्ध youtubers, Instagram Influensers, Bloggers हे आपले मार्केटिंगच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पैसे कमवत आहेत.

4) पे पर क्लिक ऍडव्हर्टायझिंग (PPC) (Pay Per click Advertising)

या जाहिरातीच्या प्रकारामध्ये जेव्हा जेव्हा एखादा जाहीर जाहिरातीवर एखादी व्यक्ती क्लिक करते त्यावेळी तो संबंधित जाहिरात दार ती जाहिरात प्रकाशित करणाऱ्याला ठराविक कमिशन देते. हे अशा प्रकारच्या जाहिराती साधारणता सर्च इंजिन रिझल्ट पेजेस वर तसेच इतर वेबसाईटवर दाखविल्या जातात.

पे पर क्लिक ऍडव्हर्टायझिंग (PPC) दोन प्रकारच्या असतात

  • SEM – Search Engine Marketing – यामध्ये Google Ads, Bing Ads सारख्या प्लॅटफॉर्मवर पे पर क्लिक जाहिराती लावल्या जातात.
  • डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग – यामध्ये जाहिरात दारांच्या माध्यमातून वेबसाईट, ब्लॉग, यूट्यूब चैनल यांवर जाहिराती प्रकाशित केला जातात. या जाहिराती इमेजेस, व्हिडिओ किंवा टेक्स्ट च्या स्वरूपात असू शकतात.

5) ई-मेल मार्केटिंग (E-mail marketing)

मार्केटिंग चा असा पर्याय आहे की यामध्ये ई-मेल च्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची माहिती किंवा जाहिरात ही ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते.

हा मार्केटिंगचा किफायतशीर पर्याय असून याद्वारे नवीन ग्राहक मिळवणे, असलेल्या ग्राहकांना टिकवणे, तसेच ग्राहकांना आपल्या उत्पादनाबद्दल अद्यावत ठेवणे इत्यादी उद्देश साध्य करता येतात.

यामध्ये नवीन ग्राहकांसाठी स्वागत ई-मेल, नवीन ऑफर्स, सवलती आणि नवीन उत्पादन बद्दल माहिती देण्यासाठी प्रचारात्मक ई-मेल, आपले प्रॉडक्ट चा वापर कसा करावा आणि कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती देण्यासाठी शैक्षणिक ई-मेल, नवनवीन बातम्या तसेच लेख यांसाठी न्यूज लेटर्स, तसेच खरेदी-विक्री बिल यांसारख्या गोष्टींसाठी ट्रांजेक्शन ई-मेल चा वापर केला जातो.

6) मोबाईल मार्केटिंग (Mobile Marketing)

हल्ली प्रत्येकजण मोबाईलचा वापर करत आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशांमध्ये तर खूप सारे मोबाईल युजर्स आहेत. त्यामुळे आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी मोबाईल मार्केटिंग चा वापर प्रचंड प्रमाणात अनेक कंपन्यांकडून केला जातो. यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून मेसेजेस पाठवणे, मेसेजेस च्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची माहिती किंवा ऑफर सवलती इत्यादी ग्राहकांपर्यंत पोहोचवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो.

मोबाईल मध्ये प्रत्येक जण व्हाट्सअप, इंस्टाग्राम सारखे एप्लीकेशन वापरत असतो. या एप्लीकेशन च्या माध्यमातून सुद्धा ग्राहकांना आपल्या व्यवसायाची माहिती पाठवली जाते.

FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

इंटरनेटचा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून आपल्या वस्तू व सेवांची जाहिरात करण्याची कला आणि विज्ञान म्हणजेच डिजिटल मार्केटिंग होय.

डिजिटल मार्केटिंगचे वेगवेगळे घटक कोणते आहेत?

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), सोशल मीडिया मार्केटिंग, अफिलिएट मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, पे पर क्लिक ऍडव्हर्टायझिंग, ई-मेल मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग हे डिजिटल मार्केटिंगचे वेगवेगळे घटक आहेत.

SEO चा फुल फॉर्म काय आहे?

SEO चा फुल फॉर्म Search Engine Optimization असा आहे.

निष्कर्ष : Digital Marketing in Marathi

मित्रांनो, आजच्या आपल्या Digital Marketing in Marathi या लेखा मध्ये आपण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? त्यांचे महत्व आणि प्रकार या बद्दल संपूर्ण माहिती बघितली. आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपल्या व्यवसाय वाढीसाठी डिजिटल मार्केटिंग चा प्रभावी वापर करणे अनिवार्य आहे. डिजिटल मार्केटिंग चा वापर आपल्या व्यवसाय वाढीसाठी वापर करणे हे सर्वांसाठी सहज शक्य व कमी खर्चीक असून जास्त परिणामकारक सुद्धा आहे. तुम्हाला डिजिटल मार्केटिंग संदर्भात आणखी काही माहिती हवी असल्यास किंवा तुम्हाला त्याबद्दल काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. तुम्हाला हा लेख आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद !!

Related :