फ्रीलांसिंग म्हणजे काय | What is Freelancing in Marathi

freelancing in marathi , freelancer in marathi meaning, freelance in marathi translation, freelancing information in marathi, freelancing marathi mahiti, freelance work meaning in marathi, freelance job details

freelancing in marathi : मित्रांनो, हल्लीच्या युगामध्ये जॉब मिळवणे खूप कठीण झाले आहे. त्यातही मनासारखं जॉब मिळाला तरी योग्य पगार आणि तुमच्या लोकेशन पासून जवळ असेल याची खात्री नाही. तसेच बऱ्याच जणांना आपल्या आपल्या कौशलयांप्रमाणे योग्य काम मिळत नाही. तसेच खाजगी कंपन्यांमध्ये काम करतांना बऱ्याच वेळा आपल्यावर प्रेशर असतो. मित्रांनो, या सर्व समस्यांना तुम्ही सुद्धा कंटाळला असाल आणि तुमच्यात एखाद्या कामाचे चांगले कौशल्य असेल तर फ्रीलांसिंग (Freelancing ) हा तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. आजच्या आपल्या Freelancing in Marathi लेखामध्ये आपण फ्रीलांसिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.

फ्रीलांसिंग म्हणजे काय | freelancing meaning in marathi

फ्रीलांसिंग हा कामाचा असा प्रकार आहे कि ज्यामध्ये एखादा व्यक्ति आपल्यातील एखाद्या कामाविषयी असलेल्या ज्ञान आणि कौशलयांच्या आधारे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून काम मिळवतो आणि ते पूर्ण करून देण्यासाठी योग्य ते पैसे सुद्धा आकारतो.हे काम ऑनलाइन किंवा ऑफलाइन केले जाते.

फ्रीलांसिंग मध्ये आपण पूर्णतः फ्री असतो, म्हणजे आपल्यावर लक्ष ठेवायला कुणीही बॉस किंवा कंपनी नसते. आपण आपल्या काळेनुसार आवडीनुसार, कौशल्यानुसार हवे ते काम निवडू शकतो. तसेच या ठिकाणी तुम्ही एखाद्या कामांमध्ये किती निपुण आहात किंवा तुमचा त्या कामातील अनुभव किती आहे, यानुसार तुम्ही समोरच्या client कडून पैसे आकारू शकता.

उदा. माझा एक पुण्याचा मित्र आहे तो फ्रीलांसर म्हणून घर आणि बंगल्याचे एक्सटेरिअर थ्रीडी व्ह्यू बनवण्याचे काम करतो. त्यांच्या या कामाची प्रसिद्धी मी सोशल मिडियामधून केली पण, त्यातून जास्त काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मी माझ्या शहरात राहणाऱ्या सर्व बांधकाम व्यावसायिकांकडे व आर्किटेक्टकडे प्रत्यक्ष जाऊन मी त्यांना त्याचे थ्रीडी वर्क्स दाखवले त्यांना ही ते आवडले त्यानंतर त्याला काम मिळायला सुरुवात झाली…

जर तुमचे शिक्षण आर्किटेक्ट/ सिव्हिल इंजिनीअरिंग / इंटेरीयर डिझाईन यांपैकी असेल तर तुम्हाला या माझ्या मित्रासारखे काम करता येईल

यासाठी तुम्हाला ऑटोकॅड, थ्रीडीएस मॅक्स, रेवीट, स्केचप, फोटोशॉप इत्यादी सॉफ्टवेअरचे ज्ञान आणि संगणकावर काम करण्याचा वेग असणे आवश्यक आहे.

यथे फ्रीलांसर हा कोणत्या कंपनीचा भाग म्हणून एखाद्या टीम मध्ये काम करत नसून तो वयक्तिक रित्या एखाद्या व्यक्तीचे किंवा कंपनीचे काम करत असतो. येथे आपण आपल्या वेळेनुसार आपल्या ठिकाणी घरबसल्या काम करू शकतो आणि चांगला मोबादलाही आपल्याला मिळवता येतो.

हे पण वाचा : शेअर मार्केट म्हणजे काय ?

फ्रीलांसर म्हणजे काय ? | Freelancer Information in Marathi

फ्रीलांसर म्हणजे असा व्यक्ती जो आपल्या स्वतःचे कौशल्य वापरुन स्वतः मिळविलेल्या ग्राहकांची कामे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करून देतो.

कोणतीही व्यक्ती जीच्याकडे कोणत्याही एखाद्या विषिष्ठ कामविषयी विशेष कौशल्य असेल ती व्यक्ति फ्रीलांसर बनू शकते.

Freelancer हा आपल्या कौशल्यानुसार ग्राहक शोधत असतो आणि आपल्या ग्राहकांची कामे त्यांच्या मागणीप्रमाणे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करून देणे ही त्याची जबाबदारी असते.त्याबदल्यात तो योग्य असा चांगला मोबदला ही मिळवतो.

फ्रीलांसिंगचे फायदे | Advantages Of Freelancing

  • फ्रीलांसिंग मध्ये काम करतांना तुमच्यावर वेळेचे कोणतेही बंधन नसते. तुम्ही तुम्हाला वाटेल त्या वेळी तुम्हाला दिलेले काम पूर्ण करू शकता. तसेच तुम्ही ठराविक इतकेच तास काम केले पाहिजे अशीही सक्ती तुमच्यावर नसते. म्हणजेच वेळेच्या बाबतीत Freelancer हा पूर्णपणे स्वतंत्र असतो.
  • Freelancer ला ठिकाणाचे सुद्धा बंधन नसते. तो अगदी घरबसल्या ही आपले काम पूर्ण करू शकतो. इतरांप्रमाणे फ्रीलांसर ला कोणत्याही विशिष्ठ ठिकाणी ऑफिसमध्ये जायची आवश्यकता पडत नाही. हल्लीच्या प्रचंड गर्दीमुळे प्रवासात होणारी प्रचंड दगदग आपण रोज अनुभवतो. सोबत प्रवासासाठी येणारा खर्च, होणारे अपघात,आजारपण या सर्व गोष्टींचा विचार करता फ्रीलांसर म्हणून काम करणे नक्कीच सोयीस्कर आहे
  • फ्रीलांसर हा त्यांच्या आवडीप्रमाणे आणि कौशल्याप्रमाणे काम निवडू शकतो. त्याने रोज एक ठराविक प्रकारचेच काम केले पाहिजे असे काही बंधन त्यांच्यावर नसते. तो विविध प्रकारची आणि विविध क्षेत्रातील कामे निवडू शकतो. त्यामुळे कामांमध्ये विविधता आणि नवीन काहीतरी शिकण्याची संधी त्याला उपलब्ध होते.
  • फ्रीलांसर ला त्याने केलेल्या कामाच्या आधारे उत्पन्नाच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. त्याला त्याच्या कामाच्या गुणवत्ते नुसार चांगले पैसे मिळतात.

फ्रीलांसिंगचे तोटे | Disadvantages Of Freelancing

प्रत्येक चांगल्या गोष्टीचे जसे फायदे असतात तसे काही तोटे सुद्धा असतात. आपण कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्या गोष्टीचे फायदे आणि तोटे यांचा साधक बाधक विचार करूनच मग त्याबाबतीत योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. Freelancing चे वरीलप्रमाणे अनेक फायदे असले तरी त्यापासून असणारे तोटे सुद्धा आपल्याला विचारात घ्यावे लागतील.

  • फ्रीलांसिंग मध्ये आपण आपल्या मर्जीप्रमाणे आपला ग्राहक स्वतः शोधत असतो. परंतु दरवेळी आपल्याला हवा तेव्हा ग्राहक उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे एक काम संपल्यावर दूसरा ग्राहक लगेच मिळेल असे नाही. तसेच नेहमी मिळणारे उत्पन्न सारखेच असेल असे सुद्धा नसते. म्हणजेच उत्पन्नाच्या आणि कामाच्या बाबतीत काही प्रमाणात अस्थिरता फ्रीलांसिंग मध्ये आहे.
  • फ्रीलांसिंग करणारी व्यक्ति ला वेळेचे आणि ठिकाणांचे कोणतेही बंधन नसते. परंतु याचे जसे फायदे आहेत तसेच काही प्रमाणात तोटे सुद्धा आहेत. कधी कधी या गोष्टीमुळे आपल्या कामात कोणतीही शिस्त राहात नाही. यांचा दूरगामी परिणाम आपल्या करियर वर होऊ शकतो.
  • फ्रीलांसर्स ना इतर पारंपारिक पद्धतीने नोकरी करणाऱ्या व्यक्ती प्रमाणे विमा सुरक्षा किंवा निवृत्तीवेतन सारख्या कोणत्याही सुविधा मिळू शकत नाहीत. या गोष्टी आपल्या आणि कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने खूप महत्वाच्या असतात.

फ्रीलांसिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये | How to become Freelancer

freelancer in marathi

फ्रीलांसिंग करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या विशिष्ठ प्रकारची पदवी असण्याची आवश्यकता नाही,परंतु छानगली कौशल्ये आणि अनुभव असेल तर तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता. मार्केट मध्ये अनेक प्रकारची फ्रीलांसिंग ची कामे उपलब्ध आहेत, त्यातील काही जास्त लोकप्रिय असणारी क्षेत्र पुढीलप्रमाणे सांगता येतील.

लेखन आणि अनुवाद (Writing and Translation)

यामध्ये जर तुमच्यात चांगल्या प्रकारचे लेखन कौशल्य आणि भाषेच ज्ञान असेल तर तुम्ही एखाद्या ब्लॉग साठी किंवा वेबसाईट्स साठी कंटेंट रायटर म्हणून काम करू शकता. तसेच कथा,कविता,गीत,जाहिराती यामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. तसेच इतर भाषांमधील मजकूर भाषांतरित करण्याच काम सुद्धा फ्रीलांसर ला मिळू शकतं.

ग्राफिक डिझाईन (Graphic Design)

ग्राफिक डिझाईन मध्ये आवश्यक असणारे सॉफ्टवेअर च ज्ञान तुमच्याकडे असेल तर इथे खूप स्कोप आहे. यामध्ये वेबसाइट डिझाईन,लोगो डिझाईन, फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, सोशल मीडिया पोस्ट, ब्रॅंड डिझाईन, प्रेझेंटेन्शन अशा अनेक प्रकारची कामे उपलब्ध असतात.

वेब डेव्हलपमेंट (Web Development)

हल्ली प्रत्येकजण आपल्या व्यवसायासाठी वेबसाइट बनावट असतो. त्यामुळे हल्ली या क्षेत्रात खूप चांगला स्कोप आहे. या यामध्ये वेबसाईट्स बनवण्याचे किंवा विविध Web Applications बनवण्याच काम Freelancers ना मिळू शकतं.

सोशल मीडिया व्यवस्थापन (Social Media Management)

या मध्ये एखाद्या व्यवसायासाठी सोशल मीडिया व्यवस्थापन करणे, विविध सोशल मीडियावर पोस्ट टाकणे,ब्रॅंड ची जाहिरात करणे, लोकांशी संपर्क प्रस्थापित करणे आणि व्यवसाया बद्दल अवेअरनेस निर्माण करणे,विविध अहवाल देणे या कामांचा समावेश होतो.

डेटा एन्ट्री

कॉम्पुटर च चांगला ज्ञान असेल आणि त्यातील Word, Excel यांसारखे Applications चांगल्या पद्धतीने वापरता येत असतील आणि सोबत Typing speed असलेल्यांसाठी हल्ली खूप सारे Data Entry ची कामे उपलब्ध आहेत.

वर्चुअल असिस्टंट

वर्चुअल असिस्टंट मध्ये एखादा फ्रीलान्सर आपल्या client विविध प्रशासकीय सुविधा पुरवत असतो. ज्यात मिटींग्स चे व्यवस्थापन, प्रवास व्यवस्था,फोन कॉल,ग्राफिक डिझाईन,email account management,Book keeping,Content Writing यांसारख्या सेवांचा समावेश होतो.

आणखी वाचा – डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

फ्रीलांसिंगसाठी काही लोकप्रिय वेबसाइट्स | freelance job details

तुम्हाला जर फ्रीलांसर म्हणून काम करायच असेल तर आशाअ अनेक वेबसाईट्स आहेत ज्या ठिकाणे तुम्ही तुमच नाव नोंदवू शकता. तुम्ही त्यावर तुमचे पूर्ण प्रोफाइल,तुम्हाला अवगत असलेली कौशल्य यांची माहिती देवू शकता. ज्या कुणाला तुमच्या कडून काम करून घ्यायच असेल ते तुमच्याशी तुमच्या प्रोफाइल च्या आधारे संपर्क करू शकतात. पुढे काही आशाअ प्रसिद्ध वेबसाईट्स दिल्या आहेत ज्यावर नोंदणी करून तुम्ही फ्रीलांसिंग चे काम मिळवू शकता.

Fiverr
Upwork
Freelancer
Guru
PeoplePerHour

FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

फ्रीलांसिंग म्हणजे काय

फ्रीलांसिंग म्हणजे एखादी व्यक्ति आपल्या अनुभव आणि कौशलयांच्या जोरावर वयक्तिकरीत्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे काम ऑनलाइन किंवा ऑफ लाइन करून देणे,व त्यांचे योग्य ते पैसे सुद्धा आकारते.


अल्पवयीन मुले फ्रीलान्सिंग करू शकतात का?

फ्रीलांसिंग करण्यासाठी वयाचे बंधन नसते. जर तुमच्या मध्ये योग्य ते स्किल असतील तर तुम्ही फ्रीलांसिंग करू शकता. काही काही क्षेत्रांतील कामांच्या बाबतीत मात्र याबाबतीतले त्या त्या देशातील फ्रीलांसिंग बाबतचे नियम बघून घेणे योग्य ठरेल.

निष्कर्ष : Freelancing in Marathi

हल्लीच्या युगामध्ये Freelancing करणाऱ्यांची संख्या खूप वाढत आहे. वेळेचे आणि ठिकाणांचे असणारे स्वातंत्र्य, प्रवासाची होणारी दगदग, आणि आपल्या आवडीनुसार काम निवडण्याची मुभा,कामातील असणारे वैविध्य, इ. कारणांमुळे अनेक जण फ्रीलांसिंग ला पसंती देत आहेत. Freelancing in Marathi या लेखामध्ये आपण फ्रीलांसिंग बद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुमच्या मनात फ्रीलांसिंग बद्दल आणखी काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि वरील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका !!

धन्यवाद !!

Related :