types of cheque in marathi : नमस्कार मित्रांनो, आपण प्रत्येक जण नेहमी बँकेत जाऊन विविध व्यवहार करत असतो. बऱ्याचदा आपण बँकेत चेक ची देवाणघेवाण सुद्धा करतो. बऱ्याचदा आपल्याला एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला चेक मार्फत पैसे द्यावे लागतात किंवा त्यांच्या मार्फत स्वीकारावे लागतात. परंतु आपल्याला दिलेला चेक नेमकी कोणत्या प्रकारचा आहे यावर आपल्याला त्याचे पैसे कधी कुठे आणि कसे मिळणार हे अवलंबून असते. बऱ्याच जणांना या बद्दल काहीही माहिती नसते त्यामुळे गोंधळ उडतो. आज आम्ही तुम्हाला चेक म्हणजे नेमक काय असते आणि त्यांचे प्रकार कोणते असतात, तसेच चेक वापरातांना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत,त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.
Types of cheque in Marathi
चेक म्हणजे काय | what is cheque

चेक म्हणजे एक प्रकारे आपण दिलेला लेखी आदेश असतो, ज्यात आपण आपल्या बँकेला सांगतो कि अमुक एखाद्या व्यक्तीला आपल्या खात्यातून इतकी इतकी रक्कम द्यावी.
सोप्या भाषेत बोलायचं झाल तर आपण बँकेला एक पत्र देतो, ज्यात आपण आपल्या बँकेला सांगतो कि माझ्या खात्यातून ठराविक रक्कम काढून [ क्ष ] नावाच्या व्यक्तीला द्या. हे आपण बँकेला दिलेले पत्र म्हणजेच चेक होय.
हे पण वाचा : बजेट म्हणजे काय ? | Budget in Marathi
चेक चा उपयोग का करावा
सुरक्षित : चेक चा वापर केल्यामुळे आपल्याला मोठ्या रकमा सोबत घेऊन फिरण्याची गरज पडत नाही. मोठी रक्कम कॅश मध्ये देण्यापेक्षा चेक देणे सुरक्षित आहे.
पावती पुरावा : चेक हा एक प्रकारे लेखी आदेश असलेली पावतीच असते, ज्यातील व्यवहाराचा आपल्याकडे पुरावा राहतो. त्यामुळे भविष्यात काहीही समस्या निर्माण झाल्यास आपण आपला व्यवहार सिद्ध करू शकतो.
वापरण्यास सुलभ : चेक चा वापर करणे हे अत्यंत सुलभ असते. चेक भरणे सोपे असल्याने कोणतीही व्यक्ति विनय अडचण चेक चा वापर करू शकते.
हे पण वाचा : हे कोर्स करा आणि बँकेमध्ये जॉब मिळवा | Top demanded courses in banking Information in Marathi
चेक चे प्रकार कोणते आहेत | Types of cheque in Marathi
चेक चे मुख्य प्रकार 4 आहेत, बेअरर चेक (Bearer Cheque),ऑर्डर चेक (Order Cheque),क्रॉस केलेला चेक (Crossed Cheque),ओपन चेक (Open Cheque) इत्यादी. या प्रत्येक चेक ची काही वैशिष्ठ्ये आहेत तसेच काही मर्यादा सुद्धा आहेत. या प्रत्येक प्रकाराबद्दल आपण आता माहिती पाहू या..
1) बेअरर चेक (Bearer Cheque)
बेअरर चेक (Bearer Cheque) हा अशा प्रकारचा चेक असतो ज्यावर कोणत्याही व्यक्तीचे नाव लिहिलेले नसते. म्हणजेच कोणतीही व्यक्ति बँकेत जावून या चेक मार्फत पैसे काढू शकते.
या प्रकारचा चेक हा शक्यतो लहान रकमांसाठी वापरणे योग्य आहे. कारण यावर कुणाचेही नाव नसते, त्यामुळे चुकीने हा चेक दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागल्यास ती व्यक्ति पैसे काढू शकते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा चेक वापरणे धोक्याचे ठरते.
हल्ली ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याच्या सुविधांमुळे या प्रकारच्या चेक चा वापर कमी होत आहे.
2) ऑर्डर चेक (Order Cheque)
या प्रकारच्या चेक वर नेहमी विशिष्ठ व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाव असते, तो माणूस किंवा संस्थांच या चेक द्वारे पैसे काढू शकतो.
ऑर्डर चेक हा बेअरर चेक पेक्षा जास्त सुरक्षित आहे.
3) क्रॉस केलेला चेक (Crossed Cheque)
क्रॉस चेक वर दोन समांतर रेषा काढलेल्या असतात,त्यामुळे हा चेक फक्त बँक खात्यात जमा करावा लागतो. म्हणजेच या चेक द्वारे आपण बँकेच्या काउंटर वर पैसे काढू शकत नाहीत.
या प्रकारचा चेक हा बेअरर आणि ऑर्डर चेक पेक्षा जास्त सुरक्षित असतो,कारण हा चेक हरवला तरी त्याद्वारे कुणीही जाऊन पैसे काढू शकत नाही.
4) ओपन चेक (Open Cheque)
ओपन चेक वर कोणत्याही प्रकारच्या रेषा काढलेल्या नसतात. त्यामुळे हा चेक बँकेच्या काउंटर वर कॅश करता येतो.
हा चेक वापरणे बेअरर चेक पेक्षा सुरक्षित परंतु क्रॉस चेक पेक्षा कमी सुरक्षित आहेत. कोणत्याही चुकीच्या माणसाच्या हातात हा चेक लागल्यास त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
या चेक द्वारे पैसे काढणे सोपे असते. शक्यतो छोट्या रकमांच्या व्यवहारासाठी हा चेक वापरला जातो.
You May also like : “What is AI? Discover How Artificial Intelligence is Changing Our World”
Cheque information in Marathi
वरील सर्व चेकच्या महत्वाच्या प्रकारांबरोबरच चेकचे ट्राव्हलर्स चेक (Traveller’s Cheque),बँक ड्राफ्ट (Bank Draft),पोस्ट ऑफिस चेक (Post Office Cheque) असेही इतर प्रकार पडतात.
Note : मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या Instagram, Facebook, आणि फेसबूक वरील @rikama_khisa पेज ला फॉलो करा.
- Agristack : भारतातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल
- पायलट बनण्याचे स्वप्न असे करा पूर्ण | How to become Pilot after 12th
- १२ वी नंतर फोटोग्राफर बनायचं आहे ? मग हे कोर्स करा | career in photography after 12th
- १२ वी नंतर पत्रकार कसे बनायचे? | Journalism course information in Marathi |
- NEFT म्हणजे काय ? | what is NEFT in Marathi
- नेट बँकिंग म्हणजे काय ? | Net banking information in marathi
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत