इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे | How to Earn Money from Instagram in Marathi

Earn Money from Instagram in Marathi : इंस्टाग्राम हे इतके प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे की आजच्या युगात इंस्टाग्राम माहिती नाही असा व्यक्ती चुकूनच सापडेल. इंस्टाग्राम हा युवा पिढीच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनला आहे. हल्ली आपण असे अनेक इन्स्टा रील स्टार्स पाहतो जे इंस्टाग्राम वर खूप प्रसिद्ध आहेत, व त्यांचे इंस्टाग्राम वर लाखो मध्ये फॉलोवर्स आहेत. अशी लोकं इंस्टाग्राम च्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पैसे सुद्धा कमवत आहेत. जर इंस्टाग्राम वर तुमचे चांगल्या प्रकारचे फॉलोवर्स असतील तर तुम्ही इंस्टाग्राम च्या माध्यमातून चांगले पैसे सुद्धा कमवू शकता. आजच्या या लेखांमध्ये आपण कशाप्रकारे इंस्टाग्राम वरून पैसे कमवू शकतो, त्यासाठी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

Telegram GroupLink
Whatsapp ChannelLink

Table of Contents

इंस्टाग्राम म्हणजे काय ? | What is Instagram in Marathi

इंस्टाग्राम हे एक प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे लोकांना फोटोज आणि व्हिडिओ शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. एक प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे यावर लोक विविध प्रकारचे फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करू शकतात तसेच इतर लोकांशी संवाद साधू शकतात, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचू शकतात. आपल्या मनातील भावना आपल्या फॉलोवर्स पर्यंत पोहोचवण्याचं इंस्टाग्राम हे एक प्रभावी माध्यम बनले आहे.

इंस्टाग्राम चा इतिहास | Instagram History in Marathi

इंस्टाग्राम ची सुरुवात ‘ केविन आणि माईक क्रियेगर’ या दोन अमेरिकन मित्रांनी 2000 मध्ये केली. सुरुवातीला ते एका वेगळ्या एप्लीकेशन वर काम करत होते ज्याचं नाव Bourbom असं होतं. पण नंतर त्यांना असे वाटले की आपण असे एप्लीकेशन तयार करायला हवं, ज्यामध्ये लोक सहजपणे आपले फोटोज किंवा व्हिडिओज इतरांसोबत शेअर करू शकतात. मग त्यांनी अशा प्रकारचे एप्लीकेशन तयार करून त्याचं नाव इंस्टाग्राम असं ठेवलं.

सुरुवातीला इंस्टाग्राम मध्ये खूप कमी फीचर्स होते, परंतु त्यानंतर मात्र अनेक चांगले फीचर्स यामध्ये ऍड होत गेले आणि इंस्टाग्राम प्रसिद्ध होत गेले.

इंस्टाग्राम ला खूप जास्त प्रसिद्धी मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यामध्ये असलेले फिल्टर्स ची सुविधा. विविध प्रकारच्या फिल्टर्स मुळे लोक आपण काढलेले फोटोज किंवा व्हिडिओज हे अधिक आकर्षक बनवून शकतात आणि शेअर करू शकतात.

हे पण वाचा : सिबिल स्कोअर म्हणजे काय ?

फ्रीलांसिंग म्हणजे काय ?

इंस्टाग्राम चा वाढता प्रभाव व प्रसिद्धी पाहून ‘फेसबुक‘ या जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनीने सन 2012 मध्ये इंस्टाग्राम ला 1 बिलियन अमेरिकन डॉलर ला विकत घेतल्या. फेसबुकच्या सोबतीने इंस्टाग्राम अजूनच प्रसिद्ध झाले आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचले गेले.

इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत | How to Earn Money On Instagram

इंस्टाग्राम चा वापर करून खूप लोक चांगले पैसे कमवत आहेत. परंतु इंस्टाग्राम वरून पैसे कमवणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. तुम्हाला इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

1) Niche Selection | विषय निवडणे

niche for instagram

इंस्टाग्राम वर अनेक लोक वेगवेगळ्या विषयांवर काम करत आहेत. आपल्याला आवडणारा विषय निवडणे आवश्यक आहे, तसेच त्या विषयाबद्दल आपल्याला चांगले ज्ञान व माहिती असणे हे आवश्यक आहे. आपल्याला ज्या विषयात इंटरेस्ट असेल त्या विषयावर आपण चांगल्या पद्धतीने वेळ देऊन काम करू शकतो आणि सातत्य राखू शकतो. पुढील प्रकारचे अनेक विषय असून तुम्ही तुमच्या आवडीनुसार योग्य विषय निवडू शकता.

  • फॅशन
  • ट्रॅव्हलिंग
  • फूड
  • फोटोग्राफी
  • म्युझिक
  • आरोग्य
  • योगा
  • खेळ
  • पेंटिंग
  • साहित्य
  • बातम्या
  • इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट
  • कॉस्मेटिक
  • मनोरंजन
  • धर्म
  • फायनान्स
  • टेक्नॉलॉजी

तसेच आपण निवडलेल्या विषयावर नियमितपणे व दर्जेदार कंटेंट तयार करून पोस्ट करणे गरजेचे आहे.

2) Increase Your Followers | तुमचे फॉलोवर्स वाढवा

way ti increase followers on instagram

इंस्टाग्राम वरून चांगले पैसे कमवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या फॉलोवर्सची संख्या जास्त असणे आवश्यक आहे. जितकी जास्त फॉलोवर्सची संख्या तुमच्याकडे असेल तितकी तुमची पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून ते जास्तीत जास्त लोकांकडून पाहिली जाईल. फॉलोवर्सची संख्या वाढण्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम वर सतत अपडेट राहून तुमच्याविषयी संबंधित रोज नवीन नवीन माहिती पोस्ट करणे आवश्यक आहे. तुमच्या पोस्ट जर आकर्षक आणि एंगेजिबल असतील तर निश्चितच त्यातून तुमची फॉलोवरची संख्या वाढण्यास मदत होईल. इंस्टाग्राम वरून तुम्ही किती पैसे कमवू शकता हे सर्व स्त्री तुमच्या फॉलोवर्सच्या संख्येवर अवलंबून आहे.

3) Increase Engagement | तुमच्या प्रेक्षकांना आकर्षित करा

फॉलोवरच्या संख्येबरोबरच आपल्या पोस्टवर जास्तीत जास्त एंगेजमेंट असणे आवश्यक आहे, म्हणजेच आपली पोस्ट अशाप्रकारे पाहिजे की ती जास्तीत जास्त लोकांनी पाहिले गेले पाहिजे. आपली पोस्ट किती लोकांपर्यंत पोहोचते, त्यावर आलेले लाईक, कमेंट्स आणि शेअर यावरून सुद्धा आपल्या पोस्टवरील लोकांचा प्रतिसाद आपल्याला कळतो. आपल्या इंस्टाग्राम पेजवर जास्तीत जास्त फॉलोवर्स आणि लोकांचे एंगेजमेंट असतील तर आपण आपले मार्केटिंग किंवा स्पॉन्सर पोस्ट टाकून इंस्टाग्राम वरून चांगले पैसे कमवू शकतो.

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे | Way to Make Money from instagram in Marathi

आपण वर पहिल्याप्रमाणे जर तुमच्या इंस्टाग्राम पेजवर चांगले फॉलोवर्स असतील आणि तुमच्या पोस्टवर लोकांची चांगले एंगेजमेंट असेल तर इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्याच्या अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतात. त्यात पुढील मार्गांचा समावेश होतो.

way to earn money from instagram

1) Brand Collaboration – Sponsored Posts

जर तुमच्या इंस्टाग्राम पेजवर लाखो फॉलोवर्स ची संख्या असेल, तर विविध प्रसिद्ध ब्रँड मार्फत तुम्हाला स्पॉन्सर्ड पोस्ट साठी विचारणा होते. तुमची मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या स्पॉन्सर्ड पोस्ट तुमच्या इंस्टाग्राम पेजवर टाकून तुम्ही त्या माध्यमातून चांगले पैसे कमवू शकता. तुमच्या फॉलोवरची संख्या आणि ऍक्टिव्ह युजर्सची संख्या यावर तुम्हाला मिळालेले स्पॉन्सरशिप आणि त्या माध्यमातून मिळणारे पैसे याचे प्रमाण अवलंबून आहे.

2) अफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing

अफिलिएट मार्केटिंग हा अशा प्रकारचा एक प्रोग्राम असतो, ज्यात आपण एखाद्या प्रॉडक्ट च प्रमोशन करून त्यावर कमिशनच्या माध्यमातून पैसे कमवू शकतो. यासाठी आपल्याला त्या संबंधित प्रोडक्टची लिंक आपल्या इंस्टाग्राम च्या पेजवर ॲड करावे लागते. त्या लिंक वरून कोणत्याही व्यक्तीने त्या प्रोडक्टची खरेदी केली तर आपल्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळते.

अफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कमवणे हा इंटरनेटवरून पैसे कमवण्याचा सोपा मार्ग समजला जातो. या माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी आपल्याला विविध अफिलिएट प्रोग्राम जॉईन करावे लागतात. उदाहरणार्थ Amazon, Flipcart, Snapdeal, ShareASale, Commission Junction, Clickbank इत्यादी. प्रोग्राम जॉईन केल्यानंतर तुम्हाला संबंधित वेबसाईटवरून प्रॉडक्टची लिंक जनरेट करून मिळेल. ती लिंक आपण आपल्या इन्स्टा प्रोफाइल वर ऍड करायची असते.

कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, डिजिटल प्रॉडक्ट, सौंदर्य प्रसाधने, क्रीडा साहित्य अशा प्रकारच्या अनेक प्रॉडक्टची अफिलिएट मार्केटिंग आपण करू शकतो.

3) प्रॉडक्ट विकणे | Selling Products

तुम्ही एकदा प्रॉडक्ट स्वतः बनवत असाल किंवा तुमच्याकडे उपलब्ध असणारे कोणतेही प्रॉडक्ट तुम्हाला विकायचे असतील तर इंस्टाग्राम तुमच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला जो प्रॉडक्ट विकायचा असेल त्याचे आकर्षक फोटो आणि माहिती तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम पेजवर टाकू शकता किंवा रील्स च्या माध्यमातून त्या प्रॉडक्टची माहिती तुम्ही इंस्टाग्राम वर टाकू शकता.

जर तुमचे इंस्टाग्राम वर लाखोमध्ये फॉलोवर्स असतील, तर तुमचे प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त ग्राहक तुम्हाला मिळू शकतील. तुमच्याकडे जर कोणते स्किल असेल तर फ्रीलांसिंग करूनही तुम्ही पैसे कामवू शकता. जर तुमचा एखादा दुकान/हॉटेल असेल तर त्याची सुद्धा जाहिरात तुम्ही इंस्टाग्राम वरून परिणामकारकपणे करू शकता ज्याने तुमचा कस्टमर बेस् वाढवण्यास मदत होते.

4) इंस्टाग्राम पेज बनवून विकणे | Selling Instagram Page

एखाद्या इंस्टाग्राम पेज बनवून त्यावर चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर जास्तीत जास्त फॉलोवर्स झाल्यावर असे इंस्टाग्राम पेज विकून सुद्धा खूप लोक चांगले पैसे कमवत आहेत. इंस्टाग्राम पेज विकून लाखो रुपये एकाचवेळी कमवण्याची संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. अर्थात यातून तुम्हाला किती पैसे मिळतील हे सर्व गोष्टी तुमच्या इंस्टाग्राम पेजवर असलेले फॉलोवर्सच्या संख्येवर अवलंबून आहे.

5) दुसऱ्या इंस्टाग्राम पेजला प्रमोट करून पैसे कमवणे | Promoting other Instagram Pages

इंस्टाग्राम हे खूपच प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावर दररोज लाखो नवीन इंस्टाग्राम पेजेस तयार होत असतात. प्रत्येकालाच जास्तीत जास्त फॉलोवर्स ची संख्या हवी असते. अशावेळी, हे लोक दुसऱ्या एखाद्या जास्त फॉलोवर्स असलेल्या व्यक्तीला आपला इंस्टाग्राम पेज प्रमोट करण्यासाठी पैसे देतात. तुमच्या इंस्टाग्राम पेजवर लाखो फॉलोवर्स असतील तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे दुसऱ्यांचे इंस्टाग्राम पेजेस प्रमोट करून त्याद्वारे चांगले अर्निंग प्राप्त करू शकता.

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? | How to earn money from Instagram ?

Way to earn money from Instagram
विविध ब्रॅंड ना प्रमोट करणे | Brand collaboration
अफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing
विविध प्रॉडक्ट विकणे | Selling Products
इंस्टाग्राम पेज बनवून विकणे | Selling Instagram Page
दुसऱ्या इंस्टाग्राम पेजला प्रमोट करून पैसे कमवणे | Promoting other Instagram Pages

इंस्टाग्राम तुम्हाला व्ह्यूजसाठी पैसे देते का?

इंस्टाग्राम व्ह्यूजसाठी पैसे देत नाही. तुमचे जितके जास्त फॉलोवर्स असतील त्यानुसार तुम्हाला विविध ब्रॅंडस कडुन त्यांच्या ब्रॅंड च प्रमोशन करण्यासाठी ऑफर येतात,त्यातुम तुम्ही पैसे कामवू शकता.

निष्कर्ष :

आपण इंस्टाग्राम वरुण कोण कोणत्या प्रकारे पैसे कामवू शकतो याची संपूर्ण माहिती आज बघितली. वर सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या तर कुणीही इंस्टाग्राम मधून चांगले पैसे कामविण्यात यशस्वी होऊ शकतो. हल्ली डिजिटल मार्केटिंग मध्ये सुद्धा इंस्टाग्राम चा जास्तीत जास्त वापर केला जातो. आजची How to earn money from Instagram in Marathi बद्दलची माहिती तुम्हाला काशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती वाचण्यासाठी रिकामा खिसा ला रोज भेट देत रहा.

धन्यवाद !

Related :