मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र | ज्येष्ठ नागरिकांना मिळार 3000 रुपये | Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online | Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
शासनातर्फे समाजातील गरजू घटकांसाठी नेहमीच विविध योजना राबविल्या जातात. समाजातील मागास घटक,महिला,अनाथ,अपंग,विधवा तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकं यांसारख्या अनेक घटकांना या योजनांचा लाभ होत असतो. ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा वयोपरत्वे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. सन 2011 च्या जनगणानेनुसार आपल्या महाराष्ट्रात 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही सुमारे 1.50 कोटी आहे. ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच विविध शारीरिक आजार, अवयव निकामी होणे तसेच इतर मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. यासाथी केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ सुरू केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्याच्या निर्णय घेतला आहे, ज्या अंतर्गत या व्यक्तींच्या आधार संलघ्न असलेल्या बँक खात्यावर DBT प्रणालीच्या माध्यमातून 3000 रुपये देण्यात येणार आहेत. नेमकी कुणासाठी आहे ही योजना, या योजनेसाठी काय पात्रता आहे, लाभार्थ्याला कोणते लाभ मिळणार आहेत तसेच या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील 65 व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन इतरांप्रमानेच नॉर्मल पद्धतीने व कोणत्याही अडथळयाविणा जगता यावे, तसेच त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा यांवर उपाय योजना करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करता यावीत तसेच मनःस्वास्थ केंद्र तसेच योगोपचार केंद्र यांच्या माध्यमातून त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आधार संलघ्न बँक खात्यांमध्ये थेट लाभ वितरण (D.B.T) प्रणालीद्वारे एकरकमी रु. 3000 /- जमा करण्यात येणार आहेत.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री वयोश्री योजना |
कोणी सुरू केले | महाराष्ट्र शासन |
कोण पात्र आहेत | 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेले जेष्ठ नागरिक. |
कोणते लाभ मिळणार आहेत | एक रकमी रु. 3000 /- |
योजनेचे स्वरूप | What is the Vayoshri Yojana scheme?
आपण वर पाहिल्याप्रमाणे 65 व त्यावरील वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक असमर्थता व दुर्बलतेनुसार आवश्यक असलेली साधन/उपकरणे खरेदी करण्यासाठी एकरकमी रु. 3000 /- शासनामार्फत देण्यात येणार आहेत. ही साधन/उपकरणे पुढीलप्रमाणे असू शकतात.
- चष्मा
- श्रवणयंत्र
- ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर
- फोल्डिंग वॉकर
- कमोड खुर्ची
- नि – ब्रेस
- लंबर बेल्ट
- सर्वाइकल कॉलर इ.
तसेच या योजनेतील लाभार्थी नागरिकांना केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र तसेच मनःस्वास्थ केंद्र, मानशक्ती केंद्र/प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.
फेसबुक वरुन पैसे कसे कमवायचे याबद्दल संपूर्ण माहिती वाचा.
इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती वाचा.
मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ | Mukhyamantri Vayoshri Yojana Benefits
या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील वय वर्ष 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या आधार संलघ्न खात्यामध्ये थेट लाभ वितरण (DBT) प्रणाली माध्यमातून एकरकमी 3000 रुपये वर्ग करण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनामार्फत 100 % अर्थसंहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन त्यामार्फत या योजनेतील लाभार्थी नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष | Mukhyamantri Vayoshri Yojana Eligibility
- महाराष्ट्र राज्यातील च्या नागरिकांनी दिनांक 31.12.2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या योजनेसाठी पात्र समजण्यात येतील.
- सदर व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणी केल्याची पावती असणे आवश्यक आहे. जर आधार कार्ड नसेल तर दुसरं स्वतंत्र ओळखपत्र असल्यास ते ओळख पत्र सुद्धा चालेल.
- लाभार्थ्याच्या पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे रु. 2 लाखा पर्यंत असावे. वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असलेले स्वयंघोषणापत्र लाभार्थ्याला सादर करावे लागेल.
- सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत/पंचायत समिती/जिल्हा परिषद/नगरपालिका/महानगरपालिका) आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमात कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. याबाबत सुद्धा लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र आधी घेतलेल्या उपकरणांमध्ये दोष निर्माण झालेला असल्यास किंवा ते उपकरण अकार्यक्षम झाले असल्यास त्याच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.
- लाभार्थ्याच्या आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये रु. 3000 /- थेट लाभ वितरण (DBT) प्रणालीद्वारे जमा झाल्यानंतर या योजनेअंतर्गत विहित असलेली उपकरणे खरेदी केल्याचे बिल (Invoice) तसेच मन:स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे बिल प्रमाणपत्र तीस दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम (CPSU) संस्थेमार्फत विकसित केलेल्या पोर्टलवर तीस दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक असेल. तसे न केल्यास लाभार्थ्यांकडून सदर रक्कम पुन्हा वसूल करण्यात येईल.
- सदर योजनेअंतर्गत निवड/निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के लाभार्थी या महिला असतील.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Mukhyamantri Vayoshri Yojana Documents
- ओळखीचा पुरावा – आधार कार्ड/मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक ची झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- स्वयंघोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना शासन निर्णय | Mukhyamantri Vayoshri Yojana GR pdf
महाराष्ट्र शासनातर्फे सुरु करण्यात येत असलेल्या ‘ मुख्यमंत्री व यशस्वी योजना’ बद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही महाराष्ट्र शासनातर्फे निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय डाउनलोड करून घ्या.
Mukhyamantri Vayoshri Yojana Registration
‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी लवकरच केंद्राच्या राष्ट्रीय वयोश्री पोर्टल च्या धर्तीवर स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून तयार करण्यात येणार आहे. हे पोर्टल तयार झाल्यानंतर इच्छुक नागरिकांना त्यावर आपली नोंदणी करता येईल.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ?
‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ ही केंद्र शासनाच्या राष्ट्रीय योजना च्या धरतीवर महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेली 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली योजना आहे. यात लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ वितरण (D.B.T) प्रणाली द्वारे एकरकमी रु. 3000 /- वितरित केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी काय पात्रता आहे ?
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर व्यक्ती हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व तिचे वय 31/12/2023 पर्यंत 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असायला हवे, जर आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड साठी नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे, तो नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे. जर आधार कार्ड नसेल तर दुसरे कधी स्वतंत्र ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये कोणते लाभ देण्यात येतात?
या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील वय वर्ष 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या आधार संलघ्न खात्यामध्ये थेट लाभ वितरण (DBT) प्रणाली माध्यमातून एकरकमी 3000 रुपये वर्ग करण्यात येणार आहेत.
निष्कर्ष :
महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात येत असलेले ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ ही निश्चितच ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना वृद्धपकाळानुसार अनेक आजारपण, अपंगत्व, अशक्तपणा तसेच इतर अनेक मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळातील जीवन सुखकर व चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी आवश्यक असणारे विविध उपकरणे यांच्या खरेदीसाठी व त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी किंवा विविध योगोपचार घेण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये एक रकमी रु. 3000 /-वितरित करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील बारा ते पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. आपल्याला ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल’ प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा, आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास इतरांना सुद्धा नक्की शेअर करा.
धन्यवाद!!
हे पण वाचा :
- Agristack : भारतातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल
- पायलट बनण्याचे स्वप्न असे करा पूर्ण | How to become Pilot after 12th
- १२ वी नंतर फोटोग्राफर बनायचं आहे ? मग हे कोर्स करा | career in photography after 12th
- १२ वी नंतर पत्रकार कसे बनायचे? | Journalism course information in Marathi |
- NEFT म्हणजे काय ? | what is NEFT in Marathi