What is UPI in Marathi : UPI म्हणजेच Unified Payments Interface. आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात सर्व पैशाचे व्यवहार हे आपल्या मोबाईल फोन मधून करणे शक्य झाले आहे, ते केवळ यूपीआय मुळे. आता आपल्याला पूर्वीप्रमाणे घराबाहेर खरेदीसाठ पडताना खिशात कॅश घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. खिशात एकही रुपया नसताना आपण बाजारातून हवी ती वस्तू खरेदी करू शकतो, ही किमया UPI ने साधली आहे. भारतासारख्या देशांमध्ये अगदी हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत कोणत्याही ठिकाणाहून आपण आपल्या स्मार्टफोन मधून पैशाचे व्यवहार करू शकतो. हे सर्व ज्याच्यामुळे शक्य झालं, ते यूपीआय म्हणजे नेमकं काय ? यूपीआय सिस्टीम कशा प्रकारे कार्य करते? यूपीआयचे फायदे काय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे What is UPI in Marathi या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळणार आहेत, त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.
यूपीआय फुल फॉर्म ? | UPI Full Form
Unified Payments Interface Meaning in Marathi
यूपीआय ही अशी सिस्टीम आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल मधील ॲप्लिकेशन मध्ये अनेक बँकांची खाती लिंक करू शकता आणि त्यांच्यामध्ये अगदी सहजपणे पैशाचे व्यवहार करू शकता.
विमा म्हणजे काय ? त्याबद्दल संपूर्ण माहिती वाचा
यूपीआय चा वापर करून आपण आपल्या मित्राला किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू शकतो (पीअर टू पीअर – P2P), तसेच एखाद्या दुकानदाराला किंवा व्यापाऱ्याला सुद्धा यूपीआय ने पैसे पे करू शकतो (पर्सन टू मर्चंट – P2M).
तसेच यूपीआय मुळे इलेक्ट्रिसिटी बिल, मोबाईल फोन रिचार्ज करणे किंवा ऑनलाईन खरेदी करणे हे सहज सोपे झाले आहे. त्याचबरोबर यूपीआय हे वापरण्यासाठी सुद्धा एकदम सुरक्षित आहे कारण यूपीआय मध्ये द्विपक्षीय प्रमाणीकरण पद्धती (Two way verification method) वापरली जाते.
युपीआय चा इतिहास | UPI History in Marathi
भारतात यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीची सुरुवात 2016 मध्ये करण्यात आले. यूपीआय मुळे भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये मोठी डिजिटल क्रांती घडवून आणली आहे.
सुरुवातीला यूपीआयची सुरुवात करण्याचा उद्देश हा कागदी चलनी नोटांचा वापर शक्य तितका कमी करून पर्यावरणाचे संवर्धन करणे ‘Green Initiative’ चा एक भाग म्हणून झाली.
यूपीआय प्रणाली ही NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने भारतीय रिझर्व बँक (RBI) च्या मार्गदर्शनाखाली विकसित केली. एक सहज, सोपी आणि परस्पर सहकार्य करणारे पेमेंट सिस्टीम विकसित करण्याचा उद्देश ठेवून एम पी सी आय ने यूपीआय ची निर्मिती केली आहे.
यूपीआय (UPI) हे ‘पुश-पुल’ इंटर ऑपरेबल मॉडेलवर काम करते. हे असे तंत्रज्ञान आहे, जे दोन बँकांमधील व्यवहार सोपे आणि जलद करते. यामध्ये सामान्यपणे पुढील दोन घटक येतात
पुश (Push)
- येथे पैसे पाठवणारे व्यक्ती म्हणजेच Payer बँक व्यवहार सुरू करते.
- पैसे पाठवणाऱ्याकडून रक्कम, ज्याला पाठवायचे आहेत त्याचा UPI ID अशी सर्व माहिती प्राप्त करता बँकेला पुश (Push) केली जाते.
- प्राप्तकर्ती बँक व्यवहार स्वीकारते आणि प्राप्तकर्त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करते.
पुल (Pull)
- यामध्ये ज्याला पैसे हवे असतात तो म्हणजेच प्राप्तकर्ता (Payee) बँक व्यवहार सुरू करतो.
- ही प्राप्त करता बँक पैसे पाठवणाऱ्याच्या बँकेकडून संपूर्ण व्यवहाराची माहिती “पुल” करते.
- त्यानंतर पैसे पाठवणारा बँक व्यवहार स्वीकारतो व पाठवणाऱ्याच्या खात्यातून तेवढी रक्कम वजा केली जाते.
सुरुवातीला 2016 मध्ये NPCI ने फक्त 21 बँकांना घेऊन प्रायोगिक तत्त्वावर यूपीआय ची सुरुवात केली. बँकेचे व्यवहार सहज सुलभ आणि जलद व्हावेत हा प्रारंभिक उद्देश होता.
या पायलट प्रोजेक्टच्या यशस्वी प्रयोगानंतर सर्व बँकांनी त्यांचे यूपीआय सपोर्टेड एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर वर अपलोड करायला सुरुवात केली. त्यामुळे पैशाची देवाणघेवाण जलद होऊ लागली.
आज युपीआय ही संपूर्ण भारतात सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट सिस्टीम म्हणून ओळखले जात आहे. जगातील अनेक देश याबाबत भारताचे कौतुक करत आहेत. भारतासारख्या खंडप्राय आणि मोठ्या देशात अगदी दुर्गम भागातील गावांमध्ये सुद्धा यूपीआयचा वापर करून पैशाची देवाण-घेवाण केली जात आहे.
यूपीआय कसे काम करते | How UPI works
यूपीआय चा वापर करणे हे अगदी सहज सोपे आहे. कोणतीही व्यक्ती आपल्या स्मार्टफोनचा वापर करून सहजपणे पैशाचे व्यवहार करू शकतो. यूपीआयचा वापर करून पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी पुढील गोष्टी कराव्या लागतात.
1. यूपीआय सेटअप करणे
- गुगल पे, फोन पे किंवा तुमच्या बँकेने ऑफर केलेले एखादे यूपीआय एप्लीकेशन गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करून आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्या.
- त्या ॲप्लिकेशन ला तुमच्या बँकेचे अकाउंट लिंक करून घ्या.
- पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी तुमचा युनिक यूपीआय आयडी (वर्चुअल आयडी) तयार करून घ्या.
2. पैसे पाठवणे
- ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा यूपीआय आयडी टाका किंवा त्याचा क्यू आर कोड स्कॅन करा.
- तुम्हाला जितके पैसे पाठवायचे आहेत ती रक्कम एंटर करा.
- त्यानंतर तुम्ही सेट केलेला यूटीआय पिन एंटर करा.
- तुम्ही टाकलेले रक्कम प्राप्तकर्त्याच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केली जाईल.
3. पैसे प्राप्त करणे
- जी व्यक्ती पैसे पाठवणार आहे त्या व्यक्तीला तुमचा यूपीआय आयडी द्या किंवा तुमचा क्यूआर कोड त्याला स्कॅन करायला सांगा.
- पैसे पाठवणारी व्यक्ती , रक्कम यूपीआय पिन टाकून पैसे ट्रान्सफर करते, त्याची सूचना तुम्हाला मिळेल.
- ही रक्कम तुमच्या आयडीने जे बँक अकाउंट लिंक केले आहे त्या बँक अकाउंट मध्ये जमा केली जाईल.
UPI ID काय असतो | What is UPI ID
UPI ही सिस्टिम वापरातांना आपल्याला एक UPI ID क्रिएट करावा लागतो , जो सामान्यतः yourname@bankname अशा प्रकारचा असू शकतो. हा ID म्हणजेच UPI वरील आपली ओळख असते ज्याचा वापर करून आपण कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू शकतो किंवा त्यांच्याकडून पैसे प्राप्त करू शकतो. हे आपण एखाद्याला फोन कॉल करतांना फोन नंबर चा वापर करतो तसच आहे.
यूपीआय चे फायदे | Benefits Of UPI
- यूपीआय वापरणे अतिशय सोपे व सोयीस्कर आहे. यामध्ये बँकेचे खाते क्रमांक व IFSC क्रमांक वगैरे माहिती टाकण्याची आवश्यकता भासत नाही. फक्त यूपीआय आयडी किंवा क्यू आर कोड स्कॅन करून आपण पैशाची देवाण-घेवाण करू शकतो.
- यूपीआय वापरून पैसे पाठवणे किंवा प्राप्त करण्याची प्रक्रिया अतिशय जलद म्हणजेच केवळ सेकंदात पूर्ण होते. महत्त्वाचे म्हणजे ही सुविधा दिवसाची 24 तास सुरू असते.
- यूपीआय वापरणे हे पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण यात द्विपक्षीय प्रामाणिकरण पद्धत अवलंबली जाते.
- यूपीआय प्रणाली हे विश्वसनीय सुद्धा आहे. कारण यावर रिझर्व बँक ऑफ इंडिया चे नियंत्रण असते. यूपीआय नेटवर्कमध्ये असलेल्या सर्व बँकांमध्ये यूपीआय सिस्टीम काम करते.
- यूपीआय चा वापर करून व्यवहार करणे हे जवळजवळ मोफत आहे, किंवा खूपच कमी शुल्क यावर आपल्याला द्यावे लागते.
यूपीआय ची इतर वैशिष्ट्ये | UPI Features
- यूपीआय चा वापर करून पैसे पाठवणे किंवा पैसे प्राप्त करणे हे अत्यंत जलद व सोपे झाले आहे.
- यूपीआय चा वापर करून आपण आपल्या बँक खात्यामधील शिल्लक रक्कम म्हणजेच बॅलन्स सुद्धा घरबसल्या आपल्या स्मार्टफोन द्वारे तपासू शकतो.
- विविध पेमेंट बिल्स उदाहरणार्थ लाईट बिल, मोबाईल रिचार्ज, तसेच इतर बिल पेमेंट आपण UPI चा वापर करून भरू शकतो.
FAQ : नेहमी विचारले जाणारे प्रश्न
UPI पेमेंट म्हणजे काय?
यूपीआय चा फुल फॉर्म ‘ युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ असे असून यूपीआय ही भारताने विकसित केलेली एक अत्याधुनिक पेमेंट सिस्टीम आहे. या यूपीआय द्वारे आपण स्मार्टफोन चा वापर करून कोणत्याही बँक खात्यामध्ये पैसे जमा करू शकतो किंवा त्या बँक खात्यामधून पैसे प्राप्त करू शकतो.
UPI ॲप सुरक्षित आहे का?
UPI वापरणे सुरक्षित आहेत कारण यामध्ये द्विपक्षीय प्रमाणीकरण (Two Way Verification) पद्धती वापरली जाते. Application सुरू करतांना तसेच पैसे पाठवतांना सुद्धा पिन टाकावा लागतो.
UPI भारतात कशी सुरू झाली?
यूपीआय प्रणाली ही NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने भारतीय रिझर्व बँक (RBI) च्या मार्गदर्शनाखाली 2016 मध्ये विकसित केली. एक सहज, सोपी आणि परस्पर सहकार्य करणारे पेमेंट सिस्टीम विकसित करण्याचा उद्देश ठेवून NPCI ने यूपीआय ची निर्मिती केली आहे.
निष्कर्ष : What is UPI in Marathi
आपण बातम्यांमध्ये पाहतो कि जेव्हा जेव्हा एखादी विदेशी प्रसिद्ध व्यक्ती भारता मध्ये येते तेव्हा आपल्याकडील आर्थिक क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचा आवर्जून कौतुक केला जातो. साहजिकच हे सर्व UPI मुळे शक्य झाले आहे. संपूर्ण भारतामध्ये जवजवळ सर्वच ठिकाणी आता सर्रास UPI ने पेमेंट स्वीकारले जाते. ज्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा अनेक फायदे झाले आहेत. त्यामध्ये अजून काही सुधारणा असतील किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने अजून काही बदल असतील तर त्याबाबतीत शासनाकडून निश्चितच योग्य पाऊले उचलली जातील. UPI बद्दल संपूर्ण माहिती आम्ही आज या पोस्ट मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती साथी रिकामा खिसा ला रोज भेट देत रहा.
हे पण वाचा :
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024