Top Engineering colleges in India list : भारतामध्ये इंजिनियर आणि डॉक्टर या शब्दांची अनेकांच्या मनात क्रेझ आहे. आपल्या मुलाने मोठ झाल्यावर इंजिनियर बनावं अस प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. परंतु इंजिनियरिंग कॉलेजेस ची संख्या सुद्धा खूप वाढली असून त्या कॉलेज मध्ये क्वालिटी एजुकेशन मिळेल कि नाही याची शाश्वती नाही. कोणत्याही संस्थेतून इंजिनियरिंग पूर्ण करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या संस्थेमधून इंजिनियरिंग केल्यास ते पुढील करियर च्या दृष्टीने नेहमीच फायदेशीर ठरते. अनेक मोठ्या कंपन्या या चांगल्या कॉलेजेस मधूनच अभ्यास क्रम पूर्ण केलेल्या इंजिनियर्स ना प्राधान्य देत असतात, अनेक कंपन्या संबंधित कॉलेज मध्ये जाऊन डायरेक्ट मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांचे सिलेक्शन करत असतात. त्यामुळे तुम्ही इंजिनियरिंग ला अॅडमिशन घेण्याचा विचार करत असाल,तर तुम्हाला Top Engineering colleges in India list माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक आणि संपूर्ण वाचा.
Top Engineering colleges in India list
नॅशनल इंस्टीट्यूट रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रायलायच्या अखत्यारीत येणारी संस्था असून ही संस्था विविध निकषांच्या आधारे भारतातील शैक्षणिक संस्थांचे रॅंकिंग जाहीर करते. यअ संस्थे मार्फत NIRF Ranking 2023 जाहीर करण्यात आले असून त्यानुसार भारतातील Top Engineering colleges in India list पुढीलप्रमाणे आहे.
हे पण वाचा : हे आहेत भारतातील टॉप चे MBA कॉलेज ! इथून MBA केले तर लाखोंची नोकरी पक्की | Top mba colleges in india list
१० वी पास वर मिळवा सरकारी जॉब | List of 10th Pass Govt Jobs in India in marathi
हे आहेत 12 नंतरचे सर्वोत्तम डिप्लोमा कोर्सेस | Diploma courses after 12th in Marathi
इंजिनियरिंग म्हणजे काय ? | What is Engineering in Marathi
इंजिनियरिंग ला मराठी मध्ये अभियांत्रिकी असे सुद्धा म्हणतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून दैनंदित जीवनातील विविध कामे करणे आणि समस्या सोडविणे अशा प्रकारची इंजिनियर्स ची कामे असतात. जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर होत असतो. कारखान्यांमधील मशीन्स असो, वा मोठ मोठ्या इमारती बांधणे ,धरणे बांधणे, विविध रासायनिक प्रक्रिया करून विविध उत्पादने बनवणे, सॉफ्टवेअर बनवणे, अवकाशयान सोडणे, वीज तयार करणे आणि वितरित करणे,कपडे तयार करणे या आणि अशा अनेक उद्योगांमध्ये इंजिनियर्स ची आवश्यकता असते. म्हणून चांगल्या संस्थेतून इंजिनियरिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना खूप मागणी असते व त्यांना पगारही खूप मिळतो.
इंजिनियरिंग चे प्रकार | Types Of Engineering
इंजियरिंग च्या वेगवेगळ्या शाखा असतात. आपल्याला जे क्षेत्र आवडते किंवा आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्यातील इंजिनियरिंग आपण करू शकतो. भारतातील अनेक महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारची इंजिनियरिंग कोर्स उपलब्ध आहेत. सामान्यपणे इंजिनियरिंग चे पुढील प्रकार पडतात.
1) स्थापत्य अभियांत्रिकी | CIVIL Engineering
यामध्ये बांधकाम क्षेत्राविषयी अभ्यासक्रम शिकवला जातो. विविध इमारती,धरणे,पूल,रस्ते तसेच इतर बांधकामे त्यांचे डिझाईन्स व बांधकाम,डागडुजी इत्यादि कामे या इंजिनियर्स ना करावी लागतात.
2) यांत्रिकी अभियांत्रिकी | Mechanical Engineering
यामध्ये विविध प्रकारच्या मशीन्स, वाहने तसेच इतर यांत्रिकी उपकरणे यांबद्दल सविस्तर अभ्यासक्रम शिकवला जातो.
3) विद्युत अभियांत्रिकी | Electrical Engineering
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये विद्युत प्रणाली, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे व टेलिकम्युनिकेशन सिस्टीम शी संबंधित अभ्यासक्रम असतो.
4) रसायन अभियांत्रिकी | Chemical Engineering
विविध रसायने, औषधे, रंग यांची निर्मिती तसेच डिझाईन या संबंधित अभ्यासक्रम केमिकल इंजिनिअरिंग मध्ये शिकवला जातो.
5) संगणक अभियांत्रिकी | Computer Engineering
विविध कम्प्युटर् लँग्वेजेस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, माहिती तंत्रज्ञान यांची निर्मिती व डिझाईन यासंबंधी अभ्यासक्रम कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये शिकवला जातो.
6) अंतराळ अभियांत्रिकी | Aerospace Engineering
अंतराळयान तसेच इतर विविध हवाई वाहने यांची निर्मिती व डिझाईन तसेच यामागील विज्ञान या संदर्भातील अभ्यासक्रम इंजिनिअरिंग मध्ये शिकवला जातो.
इंजिनियरिंग ला प्रवेश कसा घ्यावा ?
- इंजिनियरिंग मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही 12 वी सायन्स शाखेतून उत्तीर्ण करणे आवश्यक असते.
- 12 वी नंतर इंजिनियरिंग प्रवेशासाठी JEE Mains आणि JEE Advance या अखिल भारतीय स्तरावरील प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमधील मेरिट नुसार तुम्हाला इंजिनियरिंग ला प्रवेश दिला जातो.
- अनेक राज्य स्वतःच्या प्रवेश परीक्षा सुद्धा घेतात. महाराष्ट्रात शासनामार्फत इंजिनियरिंग प्रवेशासाठी MHT – CET ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.
- काही विद्यालये स्वतःची प्रवेश परीक्षा घेतात आणि त्या आधारे इंजिनियरिंग ला प्रवेश देतात.
- 10 वी उत्तीर्ण झाल्यावर सुद्धा इंजिनियरिंग डिप्लोमा साठी आपल्याला हव्या त्या ब्रांच मध्ये प्रवेश घेऊ शकतो. 3 वर्षांच्या डिप्लोमा नंतर आपल्याला इंजिनियरिंग डिग्री साठी प्रवेश मिळतो.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
भारतातील नंबर 1 चे इंजिनियरिंग कॉलेज कोणते आहे ?
नॅशनल इंस्टीट्यूट रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF) नुसार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास हे भारतातील नंबर 1 चे इंजिनियरिंग इंस्टिट्यूट आहे.
महाराष्ट्रातील नंबर 1 चे इंजिनियरिंग कॉलेज कोणते आहे ?
नॅशनल इंस्टीट्यूट रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF) नुसार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे हे मुंबई स्थित देशातील 2 नंबर च्या रॅंक वर असलेले सर्वोत्तम इंजिनियरिंग कॉलेज आहे.
इंजिनियरिंग चे प्रकार कोणते आहेत ?
इंजिनियरिंग च्या विविध ब्रांचेस असतात, त्यांची नावे पुढीलप्रमाणे
सिव्हिल इंजिनियरिंग
मेकॅनिकल इंजिनियरिंग
केमिकल इंजिनियरिंग
कॉम्प्युटर इंजिनियरिंग
इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग
ऐरोस्पेस इंजिनियरिंग
औटोमोबाईल इंजिनियरिंग
निष्कर्ष : Top Engineering colleges in India list
इंजिनियरिंग ला प्रवेश घेतांना चांगल्या संस्थेत प्रवेश घेणे अत्यंत महत्वाचे असते. तिथे मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा , शिक्षक वर्ग, ग्रंथालय प्रयोगशाळा यांसारख्या सुविधा हे पाहून घेणे गरजेचे आहे. Top Engineering colleges in India list बद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखा मध्ये पाहिली आहे. तुम्हाला या कॉलेजेस बद्दल अधिक माहिती हवी असल्यास त्या कॉलेजेस च्या अधिकृत वेबसाईट्स वर जावून संपूर्ण माहिती पाहू शकता. जेणेकरून प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला जर MBA करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर भारतातील टॉप MBA कॉलेजेस ची यादी सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा!
धन्यवाद !