फेरीवाले व लहान व्यापऱ्यांसाठी केंद्र सरकारची धमाकेदार योजना | PM Svanidhi Yojana in Marathi

PM Svanidhi Yojana in Marathi : नमस्कार मित्रांनो, आला आपण पंतप्रधान स्वनिधी योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. PM svanidhi yojana हि आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली. जे लहान व्यापारी आणि फेरीवाले अआहेत,ज्यांचा उद्योग कोविड काळामध्ये बंद पडला किंवा ज्यांना नुकसान झाले अशांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 सुरु करण्यात आली आहे. फेरीवाले व कमी उत्पन्न असलेले व्यापारी यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत मिळावी हा या योजनेचा उद्द्श आहे. लहान फेरीवाले, रस्त्याच्या कडेला आपले दुकान लावणारे आणि लहान व्यापारी यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 काय आहे, या योजनेचे लाभ काय आहेत, तसेच या योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा,जेणेकरून पंतप्रधान स्वनिधी योजना 2024 या योजनेचा लाभ तुम्ही सुद्धा घेऊ शकाल.

PM Svanidhi Yojana in Marathi

PM Svanidhi Yojana हि योजना आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 1 जून 2020 रोजी सुरु केली. लहान पथ विक्रेते, रस्त्यालगतचे लहान दुकानदार व लहान व्यापारी यांना त्यांचा व्यवसाय नव्याने सुरु करण्यात मदत मिळावी यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 50,000 पर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. जे लाभार्थी या कर्जाची योग्य पद्धतीने परतफेड करतील त्यांच्यासाठी 7% इतके प्रति वार्षिक इतक्या दराने व्याज अनुदान सुद्धा दिले जाईल. तसेच हे सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात झाल्यास डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन म्हणून 1200 रुपयांपार्यान्य cashback सुद्धा देण्यात येणार आहे. हि योजना स्ट्रीट व्हेंडर सेल्फ-रिलायंट फंड योजना म्हणून सुद्धा ओळखली जाते. या योजनेची https://pmsvanidhi.mohua.gov.in/ ही अधिकृत वेबसाइट आहे.

PM Svanidhi Yojana in Marathi

PM Svanidhi Yojana in Marathi Highlights

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 बद्दल महत्वाचे मुद्दे आपण तक्त्याच्या स्वरूपात पाहणार आहोत, जेणेकरून अगदी थोडक्यात तुम्हाला या संपूर्ण योजनेचा अंदाज येईल.

योजनेचे नावPM Svanidhi Yojana / स्ट्रीट व्हेंडर सेल्फ-रिलायंट फंड योजना
कुणी सुरु केली भारत सरकार
केव्हा सुरु झाली 1 जून 2020 रोजी
कुणाला लाभ मिळेललहान फेरीवाले व व्यापारी
काय लाभ मिळेल 50000 रुपयांपर्यंत विनातारण कर्ज
अर्ज प्रक्रिया कशी आहे.अर्ज Online करायचा आहे.
अर्ज कुठे करायचा https://pmsvanidhi.mohua.gov.in/

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची उद्दिष्ठ्ये काय आहेत | Objectives Of PM Svanidhi Yojana

आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी म्हणतात की, प्रधानमंत्री स्वनिधी योजना म्हणजे स्वनिधीतून स्वावलंबन व स्वावलंबना तून स्वाभिमान या प्रवासातील महत्वाचा टप्पा आहे. या योजनेंतर्गत फेरीवाले (स्ट्रीट व्हेंडर) कर्ज स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे. PM Svanidhi Yojana ची उदिष्ठ्ये पुढीलप्रमाणे आहेत.

  • लहान फेरीवाले व रस्त्यालगतचे लहान व्यापारी यांना व्यवसाय वाढीसाठी 10000 रु. पर्यंत कर्ज पुरवणे.
  • या कर्जातून ते व्यासायासाठी लागणारे नवीन साहित्य घेऊ शकतात.
  • नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी 7% इतके व्याज अनुदान सुद्धा दिले जाईल.
  • या योजनेमुळे फेरीवाले व लहान व्यापारी बँकिंग प्रणालीशी जोडले जातील.
  • लहान व्यापाऱ्यांच्या व्यवसायात वृद्धी होऊन रोजगार व उद्योगधंदे वाढतील.

65 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मिळणार 3000 रुपये | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 लाभ | PM SVAnidhi yojana benefits

  • PM Svanidhi Yojana अंतर्गत फेरीवाले व लहान व्यापारी यांना 10,000 ते 50,000 पर्यन्त विणातारण कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज तीन टप्प्यांमध्ये मिळू शकते.
  • कर्जाची उत्तम परतफेड करणाऱ्यांसाठी व्याजावर सवलत सुद्धा दिली जाणार आहे.
  • डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन पर 1200 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिले जाईल.
  • ज्या फेरिवाल्यांचे किंवा लहान व्यापाऱ्यांचे कोविड काळात धंद्यामध्ये नुकसान झाले त्यांना पुनः नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांना ही करजस्वरूपात मदत दिली जाईल.

कर्ज कुणाकडून मिळेल ?

या योजनेअंतर्गत पुढील प्रकारच्या बँका कर्ज उपलब्ध करून देतील.

  • शेड्यूल्ड कमर्शियल बँक
  • प्रादेशिक ग्रामीण बँक
  • स्मॉल फायनान्स बँक
  • को ऑपरेटीव्ह बँक
  • नॉन बँकिंग फायनान्स कंपनी
  • मायक्रो फायनान्स इन्स्टिटयूशन्स
  • बचत गट बँक

हे पण वाचा :

बँक म्हणजे काय ? बँकेविषयी संपूर्ण माहिती bank in marathi

विमा म्हणजे काय ? Insurance in marathi

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? | Digital Marketing in Marathi

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे लाभार्थी कोण आहेत

PM Svanidhi Yojana in Marathi

PM Svanidhi Yojana in Marathi या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पुढील प्रकारचे लहान फेरीवाले व व्यावसायिक अर्ज करू शकतात.

  • रस्त्यावरील कपडे विक्रेते
  • न्हावी दुकानदार
  • मोची
  • लॉंड्री दुकान
  • भाजीपाला विक्रेते
  • फळ विकणारे
  • रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे
  • चहा दुकानदार
  • ब्रेड पकोडे अंडी यांचे विक्रेते
  • स्टेशनरी आणि पुस्तके विकणारे
  • विविध कारागीर उत्पादने विकणारे

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 पात्रता

  • सर्वप्रथम अर्ज करणारा हा भारतीय नागरिक असावा.
  • तो लहान फेरीवाला किंवा लहान व्यापारी या वर्गातील असावा.
  • त्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • कमीत कमी मागील 6 महिन्यांपासून तो सदर व्यवसायात गुंतलेला असावा.
  • आधार कार्ड व पण कार्ड असावे.
  • बँकेमध्ये खाते असावे.

प्रधानमंत्री स्वनिधि योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेणासाठी लाभार्थी कडे पुढील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँकेचे खाते पुस्तक
  • रहिवासी दाखला

PM Svanidhi Yojana 2024 Apply Online

प्रधानमंत्री स्वनिधि योजना 2024 अर्ज करण्यासाठी https://pmsvanidhi.mohua.gov.in/ या वेबसाइट वर जा.

Login पर्याय वर क्लिक करून applicant निवडा.

आपला मोबाइल क्रमांक टाका व capcha code टाका.

मोबाइल वर आलेला OTP टाका व login करा.

FAQ : PM Svanidhi Yojana 2024

प्रधानमंत्री स्वनिधी योजना काय आहे ?

ही केंद्र सरकारची योजना असून रस्त्यावरील फेरीवाले व लहान व्यापारी यांना लॉकडाऊन नंतर त्यांचा व्यवसाय पुन्हा उभारण्यासाठी कर्ज स्वरूपात मदत देणे हे यअ योजनेचे उद्दिष्ट आहे. PM svanidhi yojana अंतर्गत लाभार्थ्याला 10000 ते 50000 पर्यन्त विना तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. तसेच व्याजावर 7% इतकी सबसिडी सुद्धा देण्यात येईल.

या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतात ?

या योजनेसाठी रस्त्यावरील विविध वस्तु विकणारे फेरीवाले,भाजीविक्रेते,फळ विक्रेते, पुस्तके व स्टेशनरी विक्रेते,कपडे विक्रेते,चहा टपरी चालवणारे, ब्रेड,पकोडे खाद्यपदार्थ विक्रेते हे अर्ज करू शकतात.

या योनजेची वैशिष्ठ्ये काय आहेत ?

या योजनेअंतर्गत स्ट्रीट वेंडर्स ना सुरुवातीला 10000 कर्ज देण्यात येईल.
वेळेवर हप्ता भरल्यास व्याजावर 7% इतकी सवलत मिळेल.
डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅक इनसेंटीव्ह मिळेल.
आधी घेतलेले कर्ज वेळेवर फेडल्यास पुढे जास्त लोन मिळेल. 50000 पर्यन्त कर्ज मिळू शकते.

निष्कर्ष : PM Svanidhi Yojana 2024

फेरीवाले व रस्त्यालागटाचे छोटा उद्योग व्यवसाय करणारे हे शहरी लोकजीवनात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. अगदी कमी व रास्त किमतीमध्ये विविध वस्तु आपल्याला उपलब्ध करून देत असतात. कोविड च्या भयंकर परिस्थितीमध्ये असे सर्व लहानसहान व्यावसायिक यांचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त झाले,त्यांचे व्यवसाय कोलमडून पडले. अशा सर्व लहान व्यापारी व फेरीवाले यांना त्यांचा व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी तसेच व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तु खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ठ ठेवून प्रधानमंत्री स्वनिधी आत्मनिर्भर योजना सुरू करण्यात आली आहे. वरील महत्वाच्या उद्देशा बरोबरच डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देणे, वरील व्यावसायिकांना बँक सिस्टिम मध्ये आणणे हे उद्देश या योजनेचे आहेत.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला PM Svanidhi Yojana बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेल्या आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तसेच इतरांना सुद्धा शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

धन्यवाद !

हे पण वाचा :