Nursing course details in marathi | anm nursing course information in marathi | bsc nursing course information in marathi | nursing assistant course information in marathi | nursing course mahiti marathi | nursing course in marathi |
Nursing course information in marathi : कोरोना काळात देशाच्या आरोग्यव्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका कुणी बजावली असेल तर ते आहेत डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ. या क्षेत्रातील वाढत्या संधी आणि मिळणारा पगार यामुळे दिवसेंदिवस नर्सिंग मध्ये करियर करण्याकडे तरुणांचा ओढा दिसून येत आहे. 12 सायन्स नंतर वैद्यकीय क्षेत्रातील करियर च्या अनेक वाटा तुमच्यासाठी खुल्या होतात,त्यातीलच एक अत्यंत महत्वाचे क्षेत्र म्हणजे नर्सिंग. तुम्हाला सुद्धा रुग्नसेवेची आवड असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला 12 वी नंतर सर्वोत्कृष्ठ नर्सिंग कोर्सेस बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत,त्यामुळे शेवटपर्यंत आमच्यासोबत कनेक्ट रहा.
नर्सिंग म्हणजे काय ? | What Is Nursing In Marathi
नर्सिंग म्हणजेच मराठीत ‘रुग्णसेवा’ होय. नर्स ला मराठीमध्ये परिचारिका तर पुरुष असेल तर परिचर असा शब्द वापरला जातो. रुग्णांना औषधे देणे,प्राथमिक उपचार करणे,सलाईन लावणे,इंजेक्शन देणे, रुग्णांची काळजी घेणे इत्यादी कामे त्यांना करावी लागतात. तसेच बदलत्या काळात अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लागल्यामुळे याने नवीन गोष्टी सुद्धा त्यांना शिकविण्यात येत आहेत. कोरोना काळामध्ये रुग्णसेवेच महत्व आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. भारतासारख्या प्रचंड देशात आजही आरोग्यसेवा अपुरी पडत आहे तसेच कुशल कर्मचार्यांचा तुटवडा या क्षेत्रात नेहमीच जाणवतो. त्यामुळेच आज या क्षेत्रात करीयरच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत.तसेच आता नर्सिंग क्षेत्रामध्ये पगारही चांगला दिला जातो.
वाचा : हे कोर्स करा आणि बँकेमध्ये जॉब मिळवा | Top demanded courses in banking Information in Marathi
nursing course details in marathi
तुम्ही १२ वी सायन्स किंवा बी.एस्सी केले असेल आणि तुम्हाला रुग्णसेवा करायला आवडट असेल तर तुम्ही तुमचे करियर नर्सिंग क्षेत्रात घडवू शकता. त्यामुळेच नर्सिंग मध्ये कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत याची संपूर्ण माहिती nursing course details in marathi तुम्हाला आम्ही देत आहोत.
नर्सिंग मधील कोर्सेस चे प्रकार | Types Of Nursing Course In Marathi
नर्सिंग कोर्सचे सामान्यपणे ANM , GNM, B.Sc.Nursing हे प्रकार पडतात. तसेच नर्सिंग मध्ये M. Sc व P. hd सुद्धा करता येते.
बी.एस्सी नर्सिंग | What Is BSC Nursing Course In Marathi
बीएससी नर्सिंग हे नर्सिंग क्षेत्रातली पदवी आहे.
हा पूर्ण चार वर्षांचा पूर्ण वेळ असणारा कोर्स आहे.
या अभ्यासक्रमामध्ये रुग्णांची काळजी घेणे,मुख्य डॉक्टर च्या सल्ल्यानुसार रुग्णांना औषध देणे, रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे प्रशिक्षण इत्यादि शिक्षण दिले जाते.
B.Sc Nursing हा 4 वर्षांचा कोर्स आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात नोकरीला लागू शकता.
वाचा : हे आहेत 12 नंतरचे सर्वोत्तम डिप्लोमा कोर्सेस | Diploma courses after 12th in Marathi
B.Sc नर्सिंग कोर्सची पात्रता | Eligibility For BSC Nursing Course In Marathi
बीएससी नर्सिंग साठी ऍडमिशन घेण्यासाठी आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय घेऊन इयत्ता बारावी सायन्स शाखेतून कमीत कमी 45 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय 17 ते 35 पर्यन्त असावे.
बीएससी नर्सिंग मध्ये प्रवेश घेतांना प्रवेश परीक्षा सुद्धा द्यावी लागते. प्रवेश परिक्षेतील गुणवत्ते नुसार प्रवेश दिला जातो.
B.Sc नर्सिंग कोर्सची फी | Fees For B.Sc Nursing Course In Marathi
B.Sc नर्सिंग कोर्सची सरकारी इंस्टिट्यूट मधील फी ही साधारणपणे 8000 ते 30000 पर्यन्त असते. तर खाजगी संस्थेत हीच फी 40000 ते 100000 पर्यन्त असू शकते. सरकारी इंस्टिट्यूट पेक्षा खाजगी इंस्टिट्यूट मध्ये फी जास्त आकारली जाते.
राज्यानुसार कोर्सची फी वेगवेगळी असू शकते. तसेच काही ठिकाणी शिष्यवृत्ती सुद्धा दिली जाते
एम.एस्सी नर्सिंग | M. Sc nursing information in Marathi
मास्टर ऑफ सायन्स ईन नर्सिंग हा दोन वर्षांचा पदव्युत्तर कोर्स आहे जो आपण बी एस्सी नर्सिंग नंतर करू शकतो. यामध्ये नर्सिंग मधील विविध विषयांमध्ये स्पेशलायझेशन शिकविले जाते.
उदा. बाल नर्सिंग, मेडिकल आणि सर्जीकल नर्सिंग, प्रसृती आणि स्त्रीरोग इत्यादी…
एम.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर आपण सरकारी किंवा खाजगी रुग्णालयामध्ये क्लिनिकल नर्स, नर्स प्रशासक किंवा नर्स शिक्षक म्हणून सुद्धा जॉब करू शकतो.
वाचा : 12 वी नंतर या क्षेत्रात आहेत करियर च्या उत्तम संधी | Best courses in India after 12th
पी.एच.डी नर्सिंग | P.hd nursing information in Marathi
P.hd.Nursing या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना या क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन दिले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर नर्सिंग कोलेज मध्ये शिक्षक किंवा संशोधक म्हणून काम करता येईल.
नर्सिंग मधील डिप्लोमा कोर्सेस
ANM नर्सिंग कोर्स काय आहे | anm nursing course information in marathi
ANM Full Form Auxiliary Nurse Midwifery
ए एन एम म्हणजेच ऑक्झीलरी नर्स मिडवाइफ होय. हा नर्सिंग क्षेत्रातला डिप्लोमा कोर्स असून साधारण एक वर्षाचा असतो. हे एन एम कोर्स आपण दहावी किंवा बारावीनंतर करू शकतो.
ज्यांना नर्सिंग क्षेत्रात करियर ची सुरुवात करायची असेल व हेल्थ वर्कर म्हणून काम करायची इच्छा असेल तर ते ऑक्झीलरी नर्स मिडवाइफरी हा कोर्स करून सुरुवात करू शकतात.
हा नर्सिंग मधील बेसिक डिप्लोमा कोर्स असून यामध्ये विविध प्रकारच्या व्यक्तींची आरोग्य विषयक काळजी कशी घ्यायची याविषयी प्रशिक्षण दिले जाते. उदा.वृद्ध व्यक्ती, प्रसृत महिला,लहान मुले,महिला इत्यादी.
रुग्णांच्या नोंदी ठेवणे, थियेटर उभारणे, रुग्णांना औषधे देन याचे प्रशिक्षण ANM अभ्यासक्रमात दिले जाते.
ANM कोर्स करण्यासाठी काय पात्रता लागते | Eligibility for ANM Nursing Course In Marathi
विद्यार्थ्यांचे वय 17 ते 35 च्या दरम्यान असावे.
तयाने किमान 40% सह 12 वी कला किंवा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण केलेले असावे. वेगवेगळ्या प्रवर्गासाठी टक्केवारी वेगळी असू शकते.
ANM नर्सिंग कोर्स ची फी किती असते | ANM Nursing Course Fees In Marathi
ANM नर्सिंग कोर्स ची फी ही साधारण 10000 ते 200000 पर्यन्त सुद्धा असू शकते. ही फी प्रत्येक राज्यानुसार व नर्सिंग ट्रेनिंग इंस्टिट्यूट नुसार वेगवेगळी असू शकते.
सरकारी इंस्टिट्यूट मध्ये खाजगी इंस्टिट्यूट पेक्षा खूप कमी फी आकारली जाते.
GNM नर्सिंग कोर्स | anm nursing course information in marathi
GNM full form – General Nurse Midwifery
जी एन एम म्हणजेच ‘जनरल नर्स मिड वायफरी’ होय. यांना स्टाफ नर्स असे सुद्धा म्हणतात.हा साधारण तीन ते साडेतीन वर्षाचा अभ्यासक्रम असतो. महिला व पुरुष सुद्धा हा कोर्स करू शकतात.
GNM कोर्स साठी काय पात्रता लागते | Eligibility For GNM Course In Marathi
GNM हा 3 वर्षांचा कोर्स असतो.
GNM ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय 17 ते 35 वर्षांपर्यंत पाहिजे.
जी एन एम कोर्स करण्यासाठी तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी हे विषय घेऊन बारावी सायन्स शाखेतून कमीत कमी 40 टक्के गुणांनी पास असणे आवश्यक आहे.प्रवरगानुसार टक्केवारी बदलू शकते.
GNM कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी आधी प्रवेश परीक्षा सुद्धा द्यावी लागते. त्या प्रवेश परिक्षेतील गुणानुसार या कोर्स ला प्रवेश दिला जातो.
GNM कोर्स पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याला राज्याच्या नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणी करावी लागते. जेणेकरून तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी सोपे होते.
GNM कोर्स केल्यानंतर तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता. किंवा नर्सिंग इंस्टिट्यूट नर्सिंग होम यांमध्ये सुद्धा नोकरी करू शकता.
इंडियन नर्सिंग कौन्सिल वेबसाइट : https://www.indiannursingcouncil.org/
GNM कोर्सची फी | GNM Course Fees In Marathi
GNM कोर्स नंतर तुम्हाला स्टाफ नर्स म्हणून कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात सहज नोकरी मिळते. या कोर्सची फी सरकारी संस्थेमध्ये साधारण 30000 असते तर खाजगी संस्थेत 100000 पर्यन्त असू शकते.
नर्सिंग नंतर नोकरीच्या संधी | Job Vacancies After Nursing Course In Marathi
एकदा का तुम्ही नर्सिंग मधील कोर्स चांगल्या संस्थेतून पूर्ण केला तर तुम्ही जॉब वाचून राहू नाही शकत. सरकारी किंवा खाजगी अनेक ठिकाणी तुम्हाला नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होतात. यामध्ये साधारणपणे पुढील विभागात तुम्हाला नोकरी मिळते.
सरकारी व खाजगी रुग्णालये
रेल्वे डिपार्टमेंट मध्ये नर्सिंग स्टाफ
संरक्षण विभागात नर्सिंग स्टाफ
कॉलेज व युनिव्हर्सिटीज मध्ये
प्राथमिक आरोग्य केंद्रे
फार्मासयुटीकल कंपन्या
अनाथाश्रम वृद्धाश्रम आरोग्य निवास मध्ये
नर्सिंग इंस्टिट्यूट मध्ये
NGO (सेवाभावी संस्था ) मध्ये
FAQ about Nursing course information in marathi
ANM चा फुल फॉर्म काय आहे ?
ANM म्हणजेच Auxiliary Nurse Midwifery होय. हा नर्सिंग क्षेत्रातील डिप्लोमा असून साधारण 1 वर्षांचा कोर्स असतो.
GNM चा फुल फॉर्म काय आहे ?
GNM चा फुल फॉर्म General Nurse Midwifery असा असून हा नर्सिंग क्षेत्रातील 3 वर्षांचा कोर्स असतो.
नर्सिंग कोर्स किती वर्षाचा असतो?
नर्सिंग मध्ये विविध प्रकारचे कोर्सेस असून प्रत्येक कोर्स चा कालावधी वेगळा आहे. ANM हा डिप्लोमा कोर्सचा कालावधी 1 वर्ष इतका असतो. तर GNM या कोर्स चा कालावधी साधारण 3 वर्षांचा असून 6 महीने इंटर्नशिप करावी लागते. तर बी. एस्सी नर्सिंग कोर्स हा 4 वर्षांचा असतो.
निष्कर्ष : Nursing course information in marathi
भारताची वाढती लोकसंख्या व आपुऱ्या आरोग्य सुविधा पाहता नर्सिंग क्षेत्रात करियर च्या भरपूर संधी आगामी काळात उपलब्ध होणार आहेत. नर्सिंग मध्ये करियर करण्यासाठी कोणते कोर्सेस करावे लागतात याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. अजून काही सर्टिफिकेट कोर्स सुद्धा नर्सिंग मध्ये करता येतात ज्याची माहिती आपण नंतर च्या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा व माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रिकामा खिसा सोबत कनेक्ट रहा.
धन्यवाद !
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024