LG कंपनीकडून मिळणार 1 लाख रु. स्कॉलरशिप. लगेच अर्ज करा | life’s good scholarship program 2024

life’s good scholarship program 2024 | विद्यार्थ्यांना मिळणार 1 लाख रुपये स्कॉलरशिप | lg scholarship

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन आणि महत्त्वपूर्ण आर्टिकल मध्ये, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे एका अशा स्कॉलरशिप बद्दल माहिती, त्यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तब्बल एक लाख रुपयाची स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी LG Electronics India Private Limited मार्फत गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक जबरदस्त स्कॉलरशिप देण्यात येत आहे. या life’s good scholarship program 2024 साठी नक्की काय पात्रता लागणार आहे, कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात, कोणते लाभ मिळणार आहेत आणि कागदपत्र कोणती लागणार आहेत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखामध्ये मिळणार आहेत. तुम्ही सुद्धा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल, आणि ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळावी असं वाटत असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.

LG कंपनीकडून मिळणार 1 लाख रु. स्कॉलरशिप. लगेच अर्ज करा | life’s good scholarship program 2024

मित्रांनो, life’s good scholarship program 2024 ही स्कॉलरशिप इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी LG च्या सीएसआर फंडातून दिली जात आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत असलेले असे विद्यार्थी तिचे गुणवंत आहेत परंतु ज्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, आणि ज्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात आर्थिक मदत आणि आधार मिळावा यासाठी ही शिष्यवृत्ती आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत असलेले विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात व त्यांना एका वर्षासाठी ही स्कॉलरशिप मिळू शकते. या शिष्यवृत्तीसाठी काही ठराविक महाविद्यालयांची यादी सुद्धा दिलेली आहे. या महाविद्यालयांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात.

वाचा : फेरीवाले व लहान व्यापऱ्यांसाठी केंद्र सरकारची धमाकेदार योजना | PM Svanidhi Yojana in Marathi

गुणवत्ता पूर्ण शिक्षण, शाश्वत विकास आणि लैंगिक समानता ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून एलजी कंपनीतर्फे ही स्कॉलरशिप दिली जात आहे. या स्कॉलरशिप अंतर्गत पात्र महिला विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे, जेणेकरून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट गाठता येईल.

महत्वाचे पॉईंट्स | life’s good scholarship program 2024 highlights

स्कॉलरशिप चे नाव life’s good scholarship program 2024
पात्रता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी
लाभ 1,00,000 रुपये
शेवटची तारीख 23 मे 2024

पात्रता काय आहे | life’s good scholarship program 2024 Eligibilty

  • विद्यार्थी हा यादीमध्ये दिलेल्या मान्यता प्राप्त विद्यापीठात पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत असलेला असणे आवश्यक आहे.
  • जर विद्यार्थी प्रथम वर्षात (First Year) शिकत असेल तर त्याने इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये कमीत कमी 60% इतके गुण प्राप्त केलेल्या असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थी हा जर द्वितीय, तृतीय, किंवा चौथ्या वर्षाला शिकत असेल तर त्याने मागील परीक्षेत कमीत कमी 60 टक्के इतके गुण असणे आवश्यक आहे.
  • LG Electronics India Private Limited कंपनीचे कर्मचारी यांचे पाल्य या शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे.

Note – या शिष्यवृत्ती मध्ये उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थी, मुली आणि ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

वाचा : हे कोर्स करा आणि बँकेमध्ये जॉब मिळवा | Top demanded courses in banking Information in Marathi

अर्ज भरण्याची शेवटची तारीख | life’s good scholarship program 2024 last date

life’s good scholarship program 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2024 ही आहे.

मिळणारे लाभ | life’s good scholarship program 2024 Benefits

या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी 1,00,000 रुपये इतके शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

Note – या स्कॉलरशिप मधून मिळणारे पैसे विद्यार्थी हे त्यांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी वापरू शकतात. यामध्ये परीक्षा फी, होस्टेलची फी, ट्युशन फी, पुस्तके, स्टेशनरी, प्रवास खर्च, इंटरनेट प्लॅन्स, लॅपटॉप किंवा टॅबलेट ची खरेदी यांसारखा खर्च भागवू शकतात.

कागदपत्र कोणती लागतील | life’s good scholarship program 2024 Documents

  • या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पुढील कागदपत्र असणे आवश्यक आहे.
  • पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता बारावीचे मार्कशीट आणि दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या वर्षांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षाचे मार्कशीट.
  • पत्त्याचा पुरावा (उदाहरणार्थ आधार कार्ड)
  • पुढीलपैकी कोणताही एक कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा
  1. इन्कम टॅक्स रिटर्न स्टेटमेंट
  2. पगार दाखला
  3. फॉर्म 16
  4. बी पी एल / रेशन कार्ड
  5. तहसीलदार यांच्याकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला
  6. ग्रामपंचायत कार्यालयाकडून मिळालेल्या दाखला (सही आणि शिक्क्यासह)
  • प्रवेश पुरावा ( विद्यालयातील ओळखपत्र, फी भरल्याची पावती)
  • महाविद्यालयाकडून मिळालेल्या बोनाफाईड सर्टिफिकेट
  • लाभार्थ्याचे बँक पासबुक
  • फोटो

अर्ज कसा कराल life’s good scholarship program 2024

  1. अर्ज करण्यासाठी https://www.buddy4study.com/page/life-s-good-scholarship-program?utm_source=featuredBlocks या लिंक वर क्लिक करा.
  2. Apply Now या बटण वर क्लिक करा.
  3. तुम्ही जर buddy4study.com या वेबसाइट वर नोंदणी केली नसेल तर सर्वप्रथम आपला मोबाइल नंबर किंवा ईमेल चा वापर करून नोंदणी करा.
  4. तुमच्या बडी4स्टडी अकाऊंट मध्ये लॉगिन करा.
  5. तुम्ही ‘LIFE’S GOOD’ Scholarship Program 2024 च्या फॉर्म पेज वर याल.
  6. यानंतर Start Application वर क्लिक करून फॉर्म भरायला सुरुवात करा.
  7. आवश्यक ती सर्व माहिती ऑनलाइन भरा.
  8. आवश्यक कागदपत्रे आपलोड करा.
  9. अटी आणि शर्थी मान्य करा आणि आपला अर्ज पुन्हा नीट पाहून घ्या (Review).
  10. सर्व माहिती अचूक आणि बरोबर असल्याची खाती केल्यावर Submit वर क्लिक करा.
  11. अशा प्रकारे तुमचा फॉर्म यशस्वीपणे भरला जाईल.

आपल्याला ‘LIFE’S GOOD’ Scholarship Program 2024 स्कॉलरशिप मिळाली कि नाही हे पाहण्यासाठी आपल्या Buddy4Study च्या खात्यामध्ये लॉगिन करून नेहमी चेक करत रहा. कारण ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही महिन्यांचा वेळ लागतो. अर्ज केलेल्या अनेक विद्यार्थ्यांपैकी काहींचीच स्कॉलरशिप साठी निवड होत असते. तुम्ही जर सर्व पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्हाला ही शिष्यवृत्ती नक्की मिळू शकते.

कोणत्या महाविद्यालयातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.

या life’s good scholarship program 2024 साठी एकूण 4 फेज आहेत. सध्या फेज 1 चे अर्ज स्वीकारले जात आहेत. या फेज 1 मध्ये पुढील महाविद्यालयातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.

1 Apex University Jaipur
2 Jaipuria Institute of Management Jaipur
3 Global Institute of Technology Jaipur
4 RDJM Medical College & Hospital Muzaffarpur
5 Sharnbasva University Kalaburagi
6 BLDE University Vijaypura
7 Central University of Karnataka Kalaburagi
8 Ramgarh Engineering College Ramgarh
9 Radha Govind University Ramgarh
10 YBN University Ranchi 11 Vananchal Group of College Garhwa
12 Tribal College of Nursing Ranchi
13 National Insurance Academy Pune
14 Abhinav Education Society’s College of Computer Science Pune
15 KDK College of Engineering Nagpur
16 Kumaraguru College of Technology Coimbatore
17 Indian Institute of Information Technology Guwahati
18 Girijananda Chowdhury University Guwahati
19 Gautam Buddha University Greater Noida
20 Noida International University Noida
21 Llyod Law College G. Noida
22 Noida International University G. Noida
23 GR Medical College Gwalior
24 Datia Medical College Gwalior
25 Jaipur Engineering College Jaipur
26 Manav Rachna University Faridabad
27 AITM College of Engineering and Technology Palwal
28 Regional Centre of Biotechnology Gurgaon
29 Rawal Institute of Engineering & Technology Faridabad
30 Amity University Calcutta
31 Brainware University Calcutta
32 IIT Kharagpur Kharagpur
33 Swami Vivekananda University Kolkata
34 Bhagwan Mahavir university Surat
35 Vidhyadeep University Surat
36 Vishnu Engineering College Vishnupur
37 Maulana Azad University Hyderabad
38 IIIT Hyderabad Hyderabad
39 Siddhant College of Management Studies Pune
40 JOY University Tirunelveli 41 NIT Durgapur Durgapur

Note : या शिष्यवृत्तीच्या पुढील फेज 2,3,4 च्या माहितीसाठी वरील वेबसाइटला नियमित पणे भेट देत रहा.

Telegram GroupLink
Whatsapp ChannelLink
rikama khisa

Related :