Share market in marathi : मित्रांनो, अमुक अमुक एका माणसाला शेअर बाजारातून कोटींवधीचा नफा झाला, किंवा सेंसेक्स ने उसळी घेतली, मार्केट मध्ये तेजी आली किंवा मार्केट कोसळले अशा प्रकारच्या गप्पा आपण आपल्या आजूबाजूला,टीव्ही चॅनेल्स वर किंवा न्यूज पेपर,सोशल मीडिया वर नेहमी ऐकत असतो. तुम्हालाही कधी कधी कुतूहल निर्माण झाले असेल,नेमकी या गोष्टी आहेत काय? कशाशी संबंधित आहेत, शेअर आणि शेअर बाजार म्हणजे नेमक काय? ते चालवतं कोण? शेअर बाजारात इतका पैसा कमावता येतो काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात.
तुमच्या या आणि शेअर बाजाराशी संबंधित अशा अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला हवी असतील तर हा लेख तुमच्यासाठी आहे, हा लेख संपूर्ण वाचा. आज आपण शेअर बाजार आणि त्यांच्याशी संबंधित इतर अनेक महत्वपूर्ण गोष्टी अटींनी सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग, वेळ न घालवता आजच्या आपल्या लेखा ला सुरुवात करू या…
शेअर म्हणजे काय ? | What is Shere
शेअर या शब्दाचा अर्थ होतो हिस्सा किंवा भाग. आता शेअर मार्केट मध्ये जो शेअर हा शब्द वापरला जातो त्याचा नेमका अर्थ काय होतो ते आपण एका उदाहरणातून समजावून घेऊयात.
समजा माझी ABC नावाची एक कंपनी आहे. आणि मला तिला आता एक मोठा ब्रॅंड बनवायचा आहे. साहजिक आहे यासाठी मला पैशांची गरज लागेल. मग मि काय करू शकतो? एक तर एखादा मित्र किंवा नातेवाईक यांच्या कडून पैसे घेऊ शकतो किंवा कर्ज घेऊ शकतो. परंतु मला हवी असलेली रक्कम जर मोठी असेल, समजा ही रक्कम 100 कोटी असेल,तर मात्र मला अशा मार्गाने पैसे उभारणे जमणार नाही. हे जे लागणारा पैसा आहे त्याला ‘भांडवल’ असे म्हणतात.
मग अशा वेळी मी शेअर मार्केट ची मदत घेऊ शकतो. मी या भांडवलाचे लहान लहान समान भाग करेल. हे भाग साधारपणे 1, 2, 5, 10 किंवा 100 रुपयांचे असू शकतात. या प्रत्येक भागाला ‘शेअर’ असे म्हणतात. हे शेअर्स विकून मि माझ्या कंपनी साठी भांडवल उभारेन.
कंपनीचे शेअर जी व्यक्ति विकत घेते ती व्यक्ति त्या कंपनीची भागधारक किंवा शेअर धारक (Share holder) असते. त्या व्यक्तीकडे जितक्या प्रमाणात त्या कंपनीचे शेअर्स असतील तितक्या प्रमाणात ती व्यक्ती त्या संबंधित कंपनीची मालक असते.
उदाहरणार्थ , समजा तुमच्या कडे TATA या सुप्रसिद्ध कंपनीचे 2% इतके शेअर्स तुम्ही विकत घेतलेले असतील, तर त्याचा अर्थ असा होतो कि, तुम्ही TATA या कंपनीचे 2% मालक आहात, म्हणजे TATA या कंपनीची 2% इतकी हिस्सेदारी तुमच्याकडे आहे.
आता तुम्हाला शेअर म्हणजे नेमक काय हे थोडक्यात समजले असेल, पण हा प्रश्न नक्की पडला असेल कि, हे सर्व ठीक आहे, पण हे शेअर आम्ही नक्की खरेदी कुठं करायचे आणि विक्री कुठे करायचे?
शेअर बाजार (Stock Exchange) : what is share market in marathi
शेअर्स ची खरेदी किंवा विक्री ठिकाणी केली जाते त्याला शेअर बाजार ( स्टॉक एक्स्चेंज /स्टॉक मार्केट / शेअर मार्केट / इक्विटी मार्केट / कॅपिटल मार्केट ) असे म्हणतात.
शेअर बाजार म्हणजे असा बाजार आहे जिथे कंपन्या आपले शेअर (समभाग) विकतात आणि गुंतवणूकदार ते विकत घेतात. कंपन्या पैसा जमा करण्यासाठी शेअर्स विकतात व गुंतवणूकदार त्या कंपन्यांमध्ये मालकी मिळवण्यासाठी त्यांचे शेअर्स खरेदी करतात.
मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण एखादी वस्तु खरेदी करण्यासाठी बाजारात जातो उदा. भाजीपाला मार्केट / मच्छी मार्केट, साधारणपणे त्याच प्रकारे शेअर खरेदी विक्री करण्यासाठी जे मार्केट असते त्याला शेअर मार्केट किंवा स्टॉक एक्स्चेंज असे सुद्धा म्हणतात. फरक हाच आहे कि,आता शेअर खरेदी विक्री करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाण्याची आवश्यकता नाही. शेअर खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार तुम्ही घरबसल्या मोबाइल किंवा कम्प्युटर वर इंटरनेटच्या सहाय्याने सहज ऑनलाइन करू शकता.
आपल्या भारतामध्ये दोन महत्वाचे स्टॉक एक्स्चेंज आहेत, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ( मुंबई शेअर बाजार आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (राष्ट्रीय शेअर बाजार).
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (Bombay Stock Exchange)
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना 1875 साली झाली.
मुंबई शेअर बाजार हा आशियातील पहिलं व सर्वात जुना स्टॉक एक्स्चेंज आहे.
हा 6 मायक्रो सेकंड इतक्या स्पीड सह जगातील सर्वात फास्ट स्टॉक एक्स्चेंज आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (National Stock Exchange)
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना 1992 साली झाली आणि हा भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार आहे.
भारतातील या संपूर्ण शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्याच काम "सेबी" ही संस्था करते.
सेबी – सेक्यूरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)
सेबी ही संस्था शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त आणि कायदेशीर संस्था आहे. ती गुंतवणूक दारांच्या हिताचे रक्षण करते तसेच शेअर बाजारात पारदर्शकता रहावी,काही चुकीच्या गोष्टी होऊन गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये म्हणून काम करते.
सेबीचे अधिकृत संकेतस्थळ : https://www.sebi.gov.in/
सेबीची महत्वाची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत | SEBI Work
कंपन्यांची नोंदणी आणि नियमन : जेव्हा कोणतीही कंपनी आपले शेअर स्टॉक एक्स्चेंज वर लिस्ट करते तेव्हा तिला सेबी ची परवानगी घ्यावी लागते. कंपन्यांची बॅलेन्स शीट तसेच तसेच मॅनेजमेंट यांच्यावर निगराणी ठेवण्याच काम सुद्धा सेबी करते.
गुंतवणूकदारांचे संरक्षण : गुंतवणूकदारांचे फसवणुकीपासून रक्षण करणे हे सेबीचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी ती वेळोवेळी अनेक नियम बनवत असते. ती म्युच्युअल फंड कंपन्या तसेच त्यांच्या विविध योजना ज्यांच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवून त्यांचे नियमन करत असते.
शेअर बाजाराचा विकास : सेबी हे शेअर बाजाराच्या विकासासाठी तसेच त्यात घेण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असते. विविध उत्पादन व सेवा यांच्या विस्तारासाठी ती नेहमी प्रोत्साहन देते तसेच स्टॉप एक्सचेंजेस च्या विकासासाठी काम करते.
गुंतवणूकदारांना प्रशिक्षण : सेबी गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे ज्ञान देण्याचे सुद्धा काम करते. त्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम राबवते.
गुंतवणूकदार शिक्षण पोर्टल: https://investor.sebi.gov.in/
सेंसेक्स आणि निफ्टि ( SENSEX & NIFTY )
शेअर बाजारातील चढ – उतार समजण्यासाठी SENSEX (सेंसेक्स) व NIFTY (निफ्टी) असे दोन मुख्य निर्देशांक ( Index ) आहेत. SENSEX हा शब्द Sensitive + Index या दोन शब्दांनी तयार झालेला आहे. BSE ने 1-1-1986 मध्ये SENSEX द्यायची सुरुवात केली. सर्वात जास्त भाग-भांडवल असलेल्या नामांकित व प्रस्थापित आशाअ 30 कंपन्यांच्या भावातील चढ – उतारानुसार SENSEX ठरतो.
‘निफ्टी’ हा शब्द सुद्धा NSE + FIFTY आशाअ दोन शब्दांपासून बनलेला असून निफ्टी हा NSE मधील सर्वात उत्तम कामगिरी करनाऱ्या 50 कंपन्यांवरुन ठरतो.
शेअर बाजारात कोण गुंतवणूक करू शकतो?
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची अट नाही. शेअर बाजार हा सर्वांसाठी खुला आहे. अनेक लोकांमध्ये हा गैरसमज आहे कि शेअर बाजार हा फक्त पैशेवाल्यांसाठी आहे किंवा शेअर बाजार हा जुगार आहे, त्यामुळे अनेक जन शेअर बाजारांपासून लांबच राहण पसंद करतात. त्यात गुंतवणूक करण्यासाठी घाबरतात. कारण त्यांना त्यांचे पैसे बुधण्याची भीती वाटते.
पण जर तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास केलात, कंपन्यांची नीट माहिती घेतलीत तर तुम्हाला त्यात नक्कीच खूप फायदा मिळेल.
शेअर मार्केट ला झटपट पैसा मिळवण्याचा मार्ग म्हणून नका बघू तर गुंतवणुकीचा मार्ग म्हणून बघा. यात जर तुम्ही विशिष्ठ काळासाठी योग्य कंपन्यां मध्ये long term साठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला खूप चांगला फायदा मिळू शकतो.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची?
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रथमतः तुमच्याकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे.
ट्रेडिंग अकाऊंट
जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, शेअरची खरेदी विक्री करायची असेल, तर सगळ्यात आधी तुमच्याकडे ट्रेडिंग अकाउंट असणे आवश्यक आहे. ट्रेडिंग अकाउंट मधूनच तुम्ही शेअरची खरेदी विक्री आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप मधून करू शकता.
डिमॅट अकाउंट
तुम्ही खरेदी केलेले शेअर्स ठेवण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असणे आवश्यक असते. ज्याप्रमाणे आपण आपले पैसे ठेवण्यासाठी बँकेमध्ये सेविंग अकाउंट उघडतो आणि त्यात पैसे ठेवतो, त्याचप्रमाणे आपण खरेदी केलेले शेअर्स ठेवण्यासाठी डिमॅट अकाउंट ची गरज असते.
डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी आपण ऑनलाइन अप्लाय करू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमचे काही डॉक्युमेंट्स जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट/बँक पासबुक, फोटो द्यावे लागतात.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे फायदे
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील.
1) उच्च परतावा : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा शेअर बाजारात गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळू शकतो. अनेक लोक यासाठीच शेअर बाजारात पैसे गुंतवत असतात.
2) दीर्घकालीन संपत्ती निर्मिती : आपण जर मार्केट चा व्यवस्थित अभ्यास करून चांगल्या कंपन्यांचे शेअर्स जास्त कालावधीसाठी विकत घेतले तर ती आपली दीर्घ काळासाठी एक संपत्ती तयार होते, जी पुढे जाऊन आपल्याला खूप मोठा परतावा देवू शकते.
3) विविधता : शेअर बाजारात गुंतवणूक करतांना आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध असतात. आपण विविध क्षेत्रातील (उदा. मेडिकल,औटोमोबाईल,कन्स्ट्रकशन) कंपन्या निवडून आपला पोर्ट फोलिओ तयार करू शकतो.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे तोटे
प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात त्याप्रकारे काही तोटे सुद्धा असू शकतात. शेअर बाजारात सुद्धा काही संभाव्य तोटे किंवा धोके आहेत.
1) जोखीम : शेअर बाजार हा अस्थिर आहे. आपण पैसे गुंतवल्यावर त्य शेअर ची किंमत वाढू शकते त्याच प्रमाणे कमी सुद्धा होऊ शकाटे. शेअर ची किंमत जर जास्त प्रमाणात खाली आली तर आपल्याला जास्त तोटा सहन करावा लागू शकतो.
2) अस्थिरता : शेअर बाजार खूप अस्थिर आहे. यामध्ये किमतींमध्ये सतत चढ उतार होत असतात.
3) शेअर बाजारातील ज्ञानाची आवश्यकता : शेअर बाजारात गुंतवणूक करण्या आधी आपण काही बेसिक गोष्टींचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. ज्ञान आणि अनुभव असेल तर तुम्ही शेअर बाजारामध्ये निश्चित यशस्वी होऊ शकता.
शेअर बाजार हा गुंतवणुकीचा खूप चांगला प्रकार आहे. जर तुम्ही योग्य ज्ञान घेऊन शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्की फायदा होतो आणि चांगला परतावा मिळतो.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न | share market in marathi
शेअर म्हणजे काय?
शेअर या शब्दाचा अर्थ भाग किंवा हिस्सा असा होतो. कंपनीच्या भाग भांडवलातील एक भाग म्हणजे एक शेअर होय.
भारतातील दोन महत्त्वाचे स्टॉक एक्सचेंजेस कोणते?
नॅशनल स्टॉक एक्सचेंज व बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारतातील महत्त्वाचे स्टॉक एक्सचेंज आहेत.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या अकाउंट ची गरज असते?
आपल्याला जर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायचे असेल तर आपल्याकडे ट्रेडिंग अकाउंट व डिमॅट अकाउंट असणे आवश्यक असते.
निष्कर्ष | share market Basics in marathi
तुम्ही सुद्धा शेअर बाजारात गुंतवणूक करून त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आजच्या लेखामध्ये मी शेअर बाजाराबद्दल बेसिक माहिती, शेअर म्हणजे काय, शेअर बाजार म्हणजे काय, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, शेअर बाजाराचं काम कशाप्रकारे चालतं, शेअर बाजारामध्ये कोण गुंतवणूक करू शकतो तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे फायदे व तोटे या सर्वांबद्दल माहिती दिली आहे. मला अपेक्षा आहे की ही माहिती नक्कीच तुम्हाला फायद्याची ठरेल. मी दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद👏