What is Term Insurance in Marathi : आपण या वेबसाईट वर विमा म्हणजे काय ? याबद्दल संपूर्ण माहिती या आधीच्या ब्लॉग पोस्ट मध्ये पाहिली आहे. आज आपण टर्म इन्शुरन्स जो की जीवन विम्याचा एक प्रमुख प्रकार आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणतीही घटना आकस्मात घडू शकते. त्यामुळे जीवन विमा चे महत्व वाढले आहे. या ब्लॉग मध्ये टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत ? या प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील,त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
टर्म इन्श्युरन्स म्हणजे काय ? What is Term Insurance in Marathi
दोन प्रकारचा आयुर्विमा असतो. एक म्हणजे कायम स्वरूपी विमा व दुसरा टर्म इन्श्युरन्स. टर्म इन्श्युरन्सलाच मराठीमध्ये मुदत विमा योजना असे म्हणतात. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्या विम्याचा लाभ त्याच्या कुटुंबाला मिळतो. म्हणजेच आपल्या मृत्युनंतर आपल्या कुटुंबाची आर्थिक काळजी टर्म इन्श्युरन्स च्या माध्यमातून घेतली जाते.
हे पण वाचा : शेअर मार्केट म्हणजे काय? | Share market in marathi
टर्म इन्श्युरन्स हा एक प्रकारचा जीवन विमा आहे, जो आपल्याला ठराविक कालावधीसाठी कव्हरेज प्रदान करतो. त्यासाठी आपल्याला ठराविक पेमेंट करावे लागते. आणि जेव्हा पॉलिसी धारकाचा मृत्यु होतो, त्यावेळी कव्हरेज ची संपूर्ण रक्कम एकरकमी नॉमिनी ला दिली जाते. म्हणजे आपण जिवंत नसतांनाही टर्म इन्श्युरन्स आपल्या कुटुंबाची काळजी घेतो.
Term Insurance Meaning in Marathi
नोकरीच्या कालावधी मध्ये एखादा माणूस हा आपल्या पगारातून त्याच्या घराचा संपूर्ण खर्च चालवत असतो, तसेच घेतलेल्या कर्जाचे हप्ते सुद्धा भारत असतो. परंतु दुर्दैवाने अचानक पगारधारी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पुढे काय हि कल्पना सुद्धा त्याच्या कुटुंबासाठी भयावह आहे. अशा वेळी मुदत विमा योजना हा सुरक्षित पर्याय आहे.
विमाधारकाच्या मृत्युनंतर कुटुंबातील नॉमिनीला विम्याची संपूर्ण रक्कम एकरकमी दिली जाते, जेणेकरून त्याचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहू शकेल. मात्र विम्याची मुदत संपल्यावर सुद्धा व्यक्ती जिवंत असेल, तर मात्र कोणताही लाभ त्या व्यक्तीला मिळणार नाही, हा महत्वाचा फरक आयुर्विमा व मुदत विमा यामध्ये आहे.
टर्म इन्श्युरन्स का आवश्यक आहे ? | Why to take term Insurance
टर्म इन्श्युरन्स किंवा मुदत विमा योजना किती महत्वाची आहे हे एरवी आपल्याला कळणार नाही. परंतु जेव्हा एखादी गंभीर घटना घडते त्यावेळी आपल्याला टर्म इन्श्युरन्स आपल्यासाठी किती महत्वाच आहे हे कळू शकेल. उदाहरणाने हे समजून घेऊ या..
शैलेश व रोहिणी हे आपल्या दोन मुलांसोबत मुंबईत राहत आहेत. शैलेश IT कंपनीत जॉब ला असून रोहिणी हि गृहिणी आहे. एक मोठा मुलगा इंजिनियरिंग करत असून लहान मुलाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे. तसेच शैलेश ने आपल्या मुंबईतील घरासाठी मोठं कर्ज सुद्धा घेतलं आहे.
सगळं सुरळीत सुरु असतांना मात्र एक दिवस आपल्या कुटुंबासोबत महाबळेश्वर ला फिरायला जात असतांना शैलेश च्या गाडीचा अपघात झाला, आणि त्यात दुर्दैवाने शैलेश चा मृत्यू झाला. कुटुंबातील इतर सदस्यांना सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
आता यामध्ये रोहिणीच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकीकडे शैलेश च्या जाण्याचे दुःख तर दुसरीकडे आता आपल्या कुटुंबाचे व मुलांचे पुढे कसे होणार याचे टेन्शन. घराचे हप्ते कसे भरणार व मुलांची शिक्षण आणि स्वप्न कशी पूर्ण करणार या विचाराने रोहीणी त्रस्त झाली.
हे वाचा : डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? | Digital Marketing in Marathi
परंतु सुदैवाने शैलेश ने आपला मित्र व आर्थिक सल्लागार मनिष च्या सांगण्याप्रमाणे मुदत विमा म्हणजेच टर्म इन्श्युरन्स खरेदी केलेला होता. त्यामुळे शैलेश च्या मृत्यू पश्चात रोहिणी नॉमिनी असल्यामुळे तिला त्यातून चांगली रक्कम मिळाली ज्यातून तिच्या कुटुंबाला खूप मोठा आर्थिक आधार मिळाला. त्या रकमेतून ती घराचे हप्ते व मुलांचे शिक्षण सहजपणे पूर्ण करू शकते.
अशाप्रकाची घटना उद्या आपल्यासोबत सुद्धा घडू शकते. आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला असे प्रसंग पाहत असतो. आपल्या मृत्युनंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी टर्म इन्श्युरन्स खूप महत्वाचा आहे. अत्यंत कमी विमा हप्त्यामध्ये खूप मोठी रक्कम आपल्या कुटुंबाला यातून मिळत असते.
टर्म इन्श्युरन्स बद्दल महत्वाची माहिती | Term Insurance Information in Marathi
- टर्म इन्श्युरन्स काढल्यावर तुम्हाला भरावा लागणारा हप्ता हा खूप कमी असतो.
- तुम्ही कमी हप्ता भारत असलात तरी त्या माध्यमातून तुम्हाला खूप जास्त विमा संरक्षण प्राप्त होते.
- विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर जर विमाधारक जिवंत असेल तर मात्र कोणताही लाभ मिळत नाही.
- पॉलिसी कालावधी संपल्यानंतर पुनः नूतनीकरण करता येते. त्यासाठी पुन्हा विमाधारकाचे वय,आरोग्य यांसारख्या गोष्टींची वैद्यकीय तपासणी कंपनीमार्फत करण्यात येते.
- विमाधारक मृत्यु पावल्यानंतर जो कुणी नॉमिनी असेल त्याला संपूर्ण रक्कम मिळते.
- काही टर्म इन्श्युरन्स प्लॅन असे सुद्धा आहेत कि ज्यांच्याबरोबर तुम्हाला इतर फायदे सुद्धा मिळू शकतात. ज्यांना रायडर बेनीफिट्स असे म्हणतात. उदा. आरोग्य विमा
- वाढत्या वयानुसार पॉलिसी प्रीमियम वाढत जातो, त्यामुळे कमी वयात (कमीत कमी 18) टर्म इन्शुरन्स घेणे चांगले
- वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या अटी व नियम असू शकतात.
- विम्याची मुदत संपेपर्यंत हप्ता रक्कम सारखीच राहते. त्यात वाढ किंवा घट होत नाही.
- टर्म इन्श्युरन्स हे गुंतवणुकीचे माध्यम नाही. यातून आपण पैसे कमवू शकत नाही. मात्र यात विमाधारकांच्या मृत्यु नंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते.
- टर्म इन्श्युरन्स विम्यावर तुम्हाला कोणतेही कर्ज घेता येत नाही.
टर्म इन्श्युरन्स कुणी घ्यावा ? | who should take term insurance
जर कुटुंबामध्ये पती आणि पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर दोघांनीही टर्म इन्श्युरन्स घेणे उत्तम राहील. दोघांसाठीही टर्म इन्श्युरन्स महत्वाचा आणि उपयोगी आहे.
जर पती एकटाच नोकरी करत असेल तर पतीच्या नावाने टर्म इन्श्युरन्स घेऊ शकता.
पत्नीच्या नावाने टर्म इन्श्युरन्स घेतल्याच पुरुषांच्या तुलनेत अधिक स्वस्त टर्म प्लॅन मिळू शकतात
Check Out best Term Insurance Plans For You
टर्म इन्श्युरन्स घेतांना कोणती काळजी घ्याल ? | What are the precautions to be taken when purchasing insurance?
टर्म इन्शुरन्स आपल्या कुटुंबाला आपल्या मृत्यु पश्चात आर्थिक संरक्षण देते. ते घेणे फायद्याचे असले तरीही ते घेतांना आपल्याला योग्य माहिती नसेल किंवा आपण घाईगडबडीत निर्णय घेतला तर आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे टर्म इन्श्युरन्स घेतांना पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
टर्म इन्श्युरन्स घेतांना आपल्या आरोग्याची खरी माहिती कंपनी ला द्या. आपल्याला एखादा गंभीर आजार असेल तर त्यांची सुद्धा माहिती कंपनीला द्या. खोटी माहिती दिल्यास नंतर तुमचं क्लेम नाकारला जाऊ शकतो.
टर्म इन्श्युरन्स घेतांना जास्त लांब कालावधीच्या प्लॅन ची निवड करा. जेणेकरून नंतर प्रीमियम मध्ये वाढ होणार नाही. तुम्ही जर आधीच कमी कालावधीचा प्लॅन निवडला तर तो संपल्यानंतर पुन्हा नवीन प्लॅन घेतांना तुम्हाला वयानुसार व विविध शारीरिक व्याधीनुसार अधिक प्रीमियम भरावा लागेल. त्यामुळे कमी कालावधीचा प्लॅन निवडण्यापेक्षा जास्त कालावधीचा प्लॅन निवडणे फायदेशीर ठरते.
टर्म इन्श्युरन्स सोबतच जे अधिकाचे संरक्षण म्हणजेच रायडर्स मिळत असतील तर त्याचा फायदा जरूर घ्या. त्यामुळे तुमच्या प्रीमियम मध्ये वाढ होऊ शकते, परंतु हे रायडर्स तुमच्या पॉलिसी ला अधिक मूल्यवान बनवतात. उदा. क्रिटीकल इलनेस रायडर. यामध्ये गंभीर आजारांमध्ये आर्थिक संरक्षण मिळते, ज्यामुळे आजारपणांमध्ये मध्ये आपल्यावरील आर्थिक ताण कमी होतो.
FAQ : What is Term Insurance in Marathi
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आणि ते कसे काम करते?
टर्म इन्शुरन्स हा विम्याचा असा प्रकार आहे जिथे आपल्याला ठराविक कालावधिकरिता कव्हरेज मिळते. त्यासाठी आपल्याला ठराविक प्रीमियम भरावा लागतो. पॉलिसी चा कालावधी मध्ये विमा धारकाचा मृत्यु झाल्यास कव्हरेज ची संपूर्ण रक्कम एकरकमी नॉमिनी ला दिली जाते.
कालावधी पूर्ण झाल्यावर सुद्धा विमाधारक जिवंत असेल तर मात्र कोणताही लाभ मिळत नाही.
मुदत विम्यासाठी कोण पात्र आहे?
18 ते 65 वर्षे वय असलेले कोणीही व्यक्ती मुदत विमा घेऊ शकतो. मुदत विमा हा जितक्या लवकर काढला जाईल तितकी कमी प्रीमियम भरावा लागतो. जस जसे वय वाढत जाईल तस तशी विम्याचा हप्ता वाढत जातो.
Note : मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या Instagram, Facebook, आणि फेसबूक वरील @rikama_khisa पेज ला फॉलो करा.