पीएम किसान योजना काय आहे?
PM kisan yojana information in Marathi : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना हि केंद्र सरकारची लहान आणि अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली योजना असून यामार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या विविध गरजांसाठी आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना उत्तम प्रकारचे बी बियाणे तसेच खते, विविध आवश्यक कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी मदत व्हावी म्हणून हि योजना सुरु करण्यात आलेली आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २००० रु. या प्रकारे थेट लाभ वितरण (DBT) प्रणालीमार्फत शेतकऱ्याच्या आधार संलघ्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. यासाठी केंद्र सरकारकडून १०० % निधी उपलब्ध करून दिला जात आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया हि संबंधित राज्य शासनामार्फत केली जाते.
PM किसान योजनेचा इतिहास | PM Kisan Yojana Hostory
सर्वप्रथम तेलंगणा सरकारने आपल्या राज्यात Ryuthu Bandhu योजना सुरू केली ज्यामध्ये शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे,तंत्रज्ञान तसेच पिकांमध्ये सुधारणा करण्यासाठी वर्षातून दोन वेळ आर्थिक मदत दिली जात होती.
हे वाचा : फेरीवाले व लहान व्यापऱ्यांसाठी केंद्र सरकारची धमाकेदार योजना | PM Svanidhi Yojana in Marathi
ही योजना सर्वांना खूप आवडली व सर्वांनी या योजनेचे कौतुक केले, कारण या योजनेमार्फत शेतकऱ्यांना थेट लाभ होत होता.
तेलंगणा सरकारच्या या Ryuthu Bandhu योजनेतून प्रेरणा घेऊन भारत सरकारने प्रधान मंत्री किसान सन्मान योजना म्हणजेच पीएम किसान योजना सुरू केली.
भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2018-19 च्या अर्थसंकल्पात ही योजना मांडली व ती 1 डिसेंबर 2018 पासून कार्यान्वित करण्यात आली.
हे वाचा : 65 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मिळणार 3000 रुपये | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
पीएम किसान योजनेतील महत्वाचे मुद्दे | PM Kisan Yojana
योजनेचे नाव | पीएम किसान योजना (पीएम किसान सन्मान निधी योजना) |
कुणी सुरू केली | केंद्र सरकार |
कधी सुरू झाली | 01 डिसेंबर 2018 |
योजनेचे उद्दिष्ठ | लहान व अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करणे |
कोण पात्र असतील | लहान व अल्प भूधारक शेतकरी |
मिळणारे लाभ | वर्षाला 12000 रुपये |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://pmkisan.gov.in/ |
योजना हेलपलाईन नंबर | ०११-२४३००६०६,१५५२६१ |
PM किसान योजनेंतर्गत मिळणारे लाभ | PM Kisan Yojana Benefits
पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6000 रुपये इतकी आर्थिक मदत थेट लाभ वितरण प्रणाली मार्फत (DBT) देण्यात येणार आहे. वर्षातून तीन वेळा 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निधीचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीची अवजारे बी बियाणे तसेच इतर साहित्य खरेदी व एकूणच पीक वाढवण्यासाठी होणार आहे.
PM किसान योजनेसाठी काय पात्रता आहे? | PM Kisan Yojna Elegibility
शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या जीवनमानात सुधारणा होऊन त्यांना सन्मानाने जीवन जागता यावे यासाथी केंद्र शासनाने पीएम किसान योजनेची सुरुवात केली आहे. अर्थातच जे पात्र शेतकरी असतील तेच या योजनेचा लाभ घेवू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
- तो शेतकरी भारतीय नागरिक असावा.
- तो शेतकरी लहान व किंवा अल्प भूधारक असावा.
- ज्यांच्या कडे लागवडियोग्य जमीन आहे असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- शेतकऱ्याचे नाव संबंधित जमिनीच्या सात बाऱ्यावर असणे आवश्यक आहे.
PM किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा ? | How to apply For PM Kisan Yojana
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. शेतकरी स्वतः अर्ज करू शकतात किंवा जवळच्या सी एस सी केंद्रावर जावून ऑनलाइन अर्ज भरून घेवू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे असणार आहे.
- सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ या वेबसाईट वर जा.
- New Farmer Registration या पर्यायांवर क्लिक करा.
- तुम्ही ग्रामीण भागातील शेतकरी असल्यास Rural Farmer Registration व शहरी भागातील शेतकरी असल्यास Urban Farmer Registration हा पर्याय निवडा.
- यानंतर आपला आधार क्रमांक , आधार संलघ्न मोबाइल क्रमांक टाका व आपले राज्य निवडा.
- यानंतर Capcha Code टाकून Get OTP पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP पुन्हा टाका व capcha Code टाका.
- यानंतर पुन्हा तुमच्या आधार संलघ्न मोबाइल वर आधार व्हेरीफीकेशन चा OTP येईल तो टाकून consent given पर्याय निवडा व Verify Aadhar OTP पर्याय निवडा.
- यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल त्यातील संपूर्ण माहिती अचूक व काळजीपूर्वक भरा.
- माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्र उपलोड करा व सबमिट करा.
- तुमचा अर्ज पूर्ण झाला असून साधारण एक महिन्यात Approve झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणे सुरू होईल.
PM किसान योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? | PM Kisan Yojana Documents
पीएम किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण बघितली. आता अर्ज करून झाल्यानंतर आपल्याला काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा आपलोड करावी लागतात. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे लागणार आहेत.
- आधार कार्ड
- जमिनीचा सात बारा व 8 अ उतारा
- बँक पासबुक
PM किसान योजनेसाठी या व्यक्ती अर्ज करू शकत नाहीत
पीएम किसान योजना ही फक्त लहान व अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून पुढील व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र असणार आहेत.
- संस्थात्मक जमीनधारक असलेली व्यक्ती.
- घटनात्मक पदावर कार्यरत असलेली व्यक्ती.
- केंद्र सरकारच्या सेवेत असलेले कर्मचारी.
- राज्य सरकारच्या सेवेत असलेले सरकारी कर्मचारी.
- स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी.
- केंद्र किंवा राज्य सरकारांमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलेल्या व्यक्ती.
- लोकसभेचे आताचे व माजी सदस्य.
- विधानसभेचे आताचे व माजी सदस्य.
- जिल्हा परिषदेचे विद्यमान व माजी सदस्य.
- महापालिकेचे विद्यमान व माजी महापौर.
- मागील वर्षी आयकर भरलेली व्यक्ती.
- सेवानिवृत्त सरकारी पेन्शनधारी व्यक्ती (मल्टीटास्किंग व गट ड कर्मचारी सोडून)
पीएम किसान योजना लाभार्थी स्थिति कशी चेक करावी. | PM Kisan Beneficiary Status
- पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा प्रत्येकी 2000 रु. याप्रमाणे वार्षिक 6000 रु. आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकार्याने ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. फॉर्म अचूक भरल्यानंतर या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला सुरू होतो.
- जर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याला लाभ मिळणे सुरू झाले नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या अर्जाची स्थिति चेक करता येते.
- लाभार्थी स्थिति चेक करण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईट वर जाऊन Know Your Status वर क्लिक करा.
- यानंतर आपल्याला registration number विचारलं जाईल तो टाका.
- यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिति त्या ठिकाणी दिसून येईल.
- जर तुम्हाला registration number माहिती नसेल तर त्याठिकाणी know your registration number पर्याय आहे त्यावर क्लिक करा. आपला आधार कार्ड व आधार संलघ्न मोबाइल नंबर सोबत असू द्या. तुम्हाला OTP पाठवला जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा registration number मिळून जाईल.
पीएम किसान E KYC कशी करावी | PM Kisan E Kyc
ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांनी ई केवायसी करणे आवश्यक आहे,त्याशिवाय त्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळणार नाही. पीएम किसान पोर्टल वर E KYC करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आधार प्रमाणीकरण पद्धतीने शेतकरी E KYC त्या ठिकाणी करू शकतात. त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर शी लिंक असणे गरजेचे आहे. मोबाइल नंबर आधार शी लिंक नसेल तर CSC केंद्रामध्ये फिंगर प्रिंट द्वारे सुद्धा KYC करून दिली जाते.
सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईट वर जा.
E-Kyc पर्याय निवडा.
यानंतर आपला आधार नंबर तसेच मोबाइल नंबर आपल्याला टाकावा लागतो.
मोबाइल नंबर वर आलेला OTP वेरिफाय करा.
तुमची केवायसी होऊन जाईल.
पीएम किसान योजनेबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न
पीएम-किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय?
पीएम किसान योजना ही भारत सरकाराद्वारे लहान व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना असून यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये विविध अवजारे तंत्रज्ञान खरेदी तसेच पीक सुधारणेसाठी मदत म्हणून दिले जातात.
पीएम-किसान योजना कधी सुरू करण्यात आली?
पीएम-किसान योजना ही भारत सारकारद्वारे 1 डिसेंबर 2018 रोजी कार्यान्वित करण्यात आली
पीएम-किसान योजनेला निधी कोण पुरवतो?
पीएम-किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जो निधी पुरवला जातो त्यासाठी 100% निधी हा केंद्र सरकारद्वारा पुरवला जातो.
Note : मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या Instagram, Facebook, आणि फेसबूक वरील @rikama_khisa पेज ला फॉलो करा.
हे पण वाचा :
- आता मिळेल मोफत तीर्थ दर्शनाचा लाभ | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर | Mukhyamantri Tirth Darshan Yojana
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | महिलांना मिळणार दर महिन्याला रुपये 1,500/- | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
- पी एम किसान सन्मान निधी योजना | PM kisan yojana information in Marathi
- LG कंपनीकडून मिळणार 1 लाख रु. स्कॉलरशिप. लगेच अर्ज करा | life’s good scholarship program 2024
- फेरीवाले व लहान व्यापऱ्यांसाठी केंद्र सरकारची धमाकेदार योजना | PM Svanidhi Yojana in Marathi