Bank in Marathi : मित्रांनो, आताच्या युगात क्वचितच एखादा माणूस असा असेल की ज्याचा बँकेची परिचय नसेल. प्रत्येक माणूस हा बँकेचे व्यवहार करत असतो. आता तर लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण बँकेमध्ये आपले खाते उघडून त्याद्वारे विविध योजनांचा लाभ घेत असतो. शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या जनधन योजना सारख्या कार्यक्रमामुळे आपल्या देशातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे खाते बँकेमध्ये उघडले आहे. बँक ही संस्था आत्ताच्या जगामध्ये मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे. लहान मुलांच्या विविध योजना, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कॉलरशिप योजना, तसेच महिला, शेतकरी, कामगार वर्ग यांच्या साठी असणाऱ्या सर्व योजनांचे पैसे आता संबंधित व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट वर्ग केले जातात. त्यामुळे प्रत्येक माणसाचा बँकेची संबंध येत असतो आणि प्रत्येक जण बँकेमध्ये जाऊन व्यवहार करत असतो. तर थोडक्यात प्रत्येकाला बँक म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणती काम केली जातात याबद्दल कल्पना आहे. आज आपल्या या लेखांमध्ये आपण बँकेविषयी संपूर्ण माहिती, बँकेची कार्य, बँकांचे प्रकार, तसेच बँक पुरवत असलेल्या सेवा याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.(What is Bank in Marathi, Bank information in marathi)
बॅंक म्हणजे काय? bank meaning in marathi
‘बँक’ ही अशी एक आर्थिक संस्था आहे जी लोकांकडून ठेवी स्वीकारते, त्या ठेवींचा रक्षण करते, लोक जेव्हा मागणी करतील तेव्हा त्यात ठेवी परत करते आणि गरजेनुसार लोकांना कर्ज सुद्धा देते.
बँक ही अशी वित्त संस्था आहे यांची पैशाचे व्यवहार करते, म्हणजेच पैशा देवाण-घेवाण करते.
बँकेमध्ये लोक आपले पैसे म्हणजेच ठेवी जमा करत असतात. बँक त्या ठेवींच रक्षण करण्याचं काम करते. लोकांकडून ठेवी स्वीकारणे, लोकांना कर्ज देणे याबरोबरच इतर अनेक आर्थिक सेवा बँका पुरवत असतात. जसे की, पैसे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणे, किंवा दुसऱ्या ठिकाणावरून पैसे प्राप्त करणे, ग्राहकांना आर्थिक सल्ला देणे इत्यादी.
देशाच्या आर्थिक विकासात आणि अर्थव्यवस्थेत बँकांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. बचत आणि गुंतवणुकीसाठी लोकांना प्रेरित करण्याचं काम या बँका करत असतात. देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेत बँक या संस्थेस अनन्यसाधारण महत्त्व आहे.
बँकांद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य तसेच बियाणे घेण्यासाठी कर्ज पुरवले जातात, तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी सुद्धा कर्ज पुरवले जातात आणि यातूनच देशाची अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होत असते.
बँकेचा इतिहास | Bank History in Marathi
भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून बँकिंग व्यवस्था त्या त्या काळानुसार अस्तित्वात होती असे आपल्याला दिसून येते. अगदी मौर्य आणि गुप्त शासन काळामध्ये सुद्धा सावकारी किंवा हुंडी व्यवहार यांसारखे बँकिंग व्यवहाराचे पुरावे आढळून आले आहे. त्याकाळी सुद्धा काही मोठे सावकार हे राजे महाराजांना सुद्धा कर्जे देत असत. या सर्वांवरून प्राचीन काळातील माणसे सुद्धा बँकिंग व्यवस्थेशी परिचित होती हे आपल्याला समजते.
जर आपण आधुनिक काळाचा विचार केला तर आधुनिक काळात भारतात बँकांची सुरुवात ब्रिटिशांनी केली असे सांगता येईल. ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी आणि व्यापार वाढीला चालना देण्यासाठी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये बँका स्थापन करण्यास सुरुवात केली. त्यांच्यामार्फत इसवी सन 1770 मध्ये भारतातील पहिली बँक ‘ बँक ऑफ हिंदुस्थान’ ही स्थापन झाली. तसेच त्यानंतरच्या काळात 1809 साली बँक ऑफ बंगाल, 1840 साली बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 साली बँक ऑफ मद्रास सारख्या बँका स्थापन केल्या गेल्या.
त्यानंतर 19 व्या शतकाच्या शेवटी तसेच विसाव्या शतकामध्ये सुद्धा भारतामध्ये अनेक राष्ट्रीय बँका स्थापन केल्या गेल्या. सन 1861 मध्ये ‘भारतीय स्टेट बँक’ भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेची स्थापना झाली.
1947 मध्ये जेव्हा भारत ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला तेव्हा भारतातील अनेक खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. म्हणजेच या बँका सरकारने ताब्यात घेतल्या. 1969 मध्ये भारतातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
1990 मध्ये भारताने उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे सूत्र अंगीकारले आणि भारतीय अर्थव्यवस्था मुक्त झाली. यावेळी भारतात खाजगी बँकांच्या स्थापनेला पुन्हा परवानगी देण्यात आली, यातून बँकिंग व्यवस्थेमध्ये स्पर्धा निर्माण होऊन अनेक चांगल्या सोयी सुविधा ग्राहकांना मिळू लागल्या.
आज भारतीय बँकिंग व्यवस्था ही अत्यंत विकसित स्वरूपात कार्यरत आहेत. अनेक राष्ट्रीय बँकांबरोबरच खाजगी बँका सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेला बळ देत सक्षमपणे कार्य करीत आहेत आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
बँकेची कार्य | How Bank Works
आपण वर बघितल्याप्रमाणे ‘बँक’ ही संस्था आधुनिक युगामध्ये महत्त्वाची भूमिका आमच्यावर आहेत. बँकेला अनेक प्रकारचे कार्य करावे लागतात. बँकेची महत्त्वाची कामे पुढीलप्रमाणे आहेत.
1) बँकेचे प्राथमिक कार्य (Primary Functions Of Bank)
बँकेची प्राथमिक कार्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील.
अ) ठेवी स्वीकारणे
बँका लोकांकडून विविध प्रकारे ठेवी स्वीकारत असतात. त्या ठेवींचा रक्षण करण्याची जबाबदारी बँकेची असते. बँक त्या ठेवींवर ग्राहकांना योग्य व्याज सुद्धा देते.. बँकेचे ग्राहक बँकांमध्ये विविध प्रकारच्या खात्यांमध्ये आपल्या ठेवी ठेवत असतात. जसे की, बचत खाते , चालू खाते किंवा मुदत ठेवी.
बचत ठेवी
नावाप्रमाणे बचत ठेवी चा मुख्य उद्देश लोकांमध्ये बचतेची सवय व शिस्त लागावी हा असतो. मुख्यत्वे सामान्य कर्मचारी वर्ग, शेतकरी, कामगार वर्ग, पगारी वर्ग अशा प्रकारचे लोक बँकेमध्ये बचत खाते उघडतात. या बचत ठेवींवर बँकेद्वारे व्याज सुद्धा दिले जाते परंतु त्याचा दर कमी असतो. या बचत खात्यातून ठेवीदार त्यांचे पैसे काही अटींच्या अधीन राहून त्यांना हवे तेव्हा काढू शकतात. या प्रकारच्या ठेवींमुळे लोकांमध्ये बचतीची सवय दृढ होते.
चालू ठेवी
चालू ठेवी या चालू खात्यांमध्ये ठेवल्या जातात. या प्रकारच्या खात्यामध्ये दिवसातून कितीही वेळा आणि कितीही पैसे काढले किंवा टाकले जाऊ शकतात. मुख्यत्वे व्यापारी वर्ग, उद्योजक, सार्वजनिक संस्था, शैक्षणिक संस्था, प्रमंडळ यांची चालू खाते बँकांमध्ये असतात. या प्रकारच्या चालू ठेवींवर कुठलाही प्रकारचा व्याज बँकेद्वारे दिला जात नाही.
मुदत ठेवी
या प्रकारच्या ठेवींमध्ये जास्त कालावधीसाठी ठराविक रक्कम बँकांमध्ये ठेवली जाते. हा कालावधी पाच वर्ष व त्यापेक्षा अधिक सुद्धा असू शकतो. ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतर ठेवीदार त्याचे पैसे काढून घेऊ शकतो. या प्रकारच्या मुदत ठेवींवर सर्वात जास्त व्याजदर बँकांकडून दिला जातो.
ब) कर्ज देणे
लोकांकडून ठेवी स्वीकारून त्यांचा रक्षण करणे याबरोबरच लोकांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज पुरवणे हे सुद्धा बँकांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. बँका त्यांच्याकडे जमा झालेल्या ठेवीतून शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी यांना कर्ज देत असतात. यामध्ये व्यवसाय कर्ज, गृह कर्ज, शिक्षण कर्ज, वाहन कर्ज अशा प्रकारच्या कर्जांचा समावेश होतो. अशा प्रकारचे कर्ज दिल्यानंतर बँका संबंधित व्यक्तींकडून त्या दिलेल्या कर्जावर व्याज सुद्धा वसूल करत असतात आणि हाच बँकेचा नफा असतो.
क) पत निर्मिती
पतनिर्मिती म्हणजेच पैशाची निर्मिती. बँकांमध्ये लोक विविध स्वरूपात आपल्या ठेवी जमा करत असतात. म्हणजेच बँकांमध्ये पैसा जमा होत असतो आणि हाच पैसा पुन्हा लोकांना कर्जाच्या स्वरूपात वाटप केला जातो. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये पैसा फिरवत ठेवण्याचा काम बँका करत असतात.
2) बँकांची दुय्यम कार्ये
बँकांचे महत्वाचे प्राथमिक कार्य आपण वर बघितले. या प्राथमिक कार्यांबरोबरच इतर अनेक सेवा बँका आपल्या ग्राहकांना पुरवत असतात त्यांचा समावेश आपण बँकांच्या दुय्यम कार्यामध्ये करू शकतो. बँकांची दुय्यम कार्य पुढीलप्रमाणे आहेत.
अ) पैसे हस्तांतरित करणे
बँका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे हस्तांतरित करण्यासाठी विविध प्रकारच्या सेवा ग्राहकांना खूप असतात. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो.
DD – Demand Draft
RTGS – Real time Gross Settlement
NEFT – National Electronic Fund Transfer
ब) व्यापारी सेवा
बँक व्यापारी वर्गासाठी आयात निर्यात रिक्त तसेच चलन विनिमय यांसारख्या अनेक सेवा पुरवत असतात.
क) एजन्सी सेवा
विमा पॉलिसी तसेच शेअर बाजारातील शेअर्सचे खरेदी विक्री करणे अशा प्रकारच्या एजन्सी सेवा सुद्धा बँका ग्राहकांना पुरवत असतात.
तुम्हाला जर शेअर बाजाराबद्दल माहिती हवी असेल तर ‘शेअर बाजाराबद्दल संपूर्ण माहिती‘ हा लेख जरूर वाचा.
ड) कल्याणकारी योजना
शासनाच्या विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचून त्या राबवण्याचं काम आता बँकांमार्फत होत असतं. जसे की जनधन योजना, पिक विमा योजना किंवा वृद्धपकाळातील पेन्शन योजना.
इ) वित्तीय सल्ला
बँका विविध ग्राहकांना तसेच व्यावसायिकांना वित्तीय सल्ला देण्याचे सुद्धा काम करत असतात.
बँकेचे प्रकार | Types of Bank
बँकांच्या कार्यानुसार आणि स्वरूपानुसार बँकांचे सामान्यतः पुढील प्रकार पडतात.
1) व्यवसायिक बँका
या सामान्य प्रकारच्या बँका असून त्या ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक सेवा पुरवण्याचा काम करत असतात. यामध्ये ग्राहक बचत खाते किंवा चालू खाते हे व मुदत ठेवेन प्रकारच्या सेवा मिळू शकतात. या बँका ग्राहकांना कर्ज देणे तसेच गुंतवणूक उत्पादने यांसारख्या सुविधा सुद्धा पुरवतात.
2) सहकारी बँका
सहकारी बँका या अनेक लोक एकत्र येऊन बनलेल्या असतात. या बँका सदस्यांच्या मालकीच्या असून त्या सदस्याद्वारे चालले जातात. या बँका सुद्धा व्यावसायिक बँकांसारख्याच आपल्या ग्राहकांना विविध आर्थिक सेवा पुरवत असतात. सहकारी बँका या इतर व्यावसायिक बँकांपेक्षा कमी व्याजदरात आपल्या ग्राहकांना कर्ज देतात तसेच लोकांच्या बचत ठेवीवर सुद्धा जास्त प्रमाणात व्याज देतात.
3) खाजगी बँक
खाजगी गुंतवणूकदारांच्या मालकीच्या असून त्या नफा मिळवण्याच्या उद्देशाने बनलेल्या असतात. या बँका सुद्धा इतर बँका प्रमाणे आर्थिक सेवा ग्राहकांना पुरवतात परंतु या ठिकाणी त्यांचा व्याजदर जास्त असल्याचा संभव आहे.
4) विदेशी बँका
काही बाहेर देशातील बँका सुद्धा आपल्या देशामध्ये काम करत असतात की ज्यांची मुख्यालय हे बाहेरच्या देशात असतात, अशा प्रकारच्या बँकांना विदेशी बँका म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापार, देवाणघेवाण किंवा आंतरराष्ट्रीय गुंतवणूक इत्यादी प्रकारच्या व्यवसायांसाठी लागणाऱ्या विविध वित्तीय सेवा पुरवण्याचे काम या विदेशी बँका करत असतात.
5) केंद्रीय बँका
केंद्रीय बँका या सरकारच्या मालकीच्या असून त्या सरकारतर्फे चालवल्या जातात. यावर सरकारचे नियंत्रण असून देशाचा अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन आणि देशाच्या चलनाचे मूल्य राखणाचे महत्त्वाची जबाबदारी या बँकांवर असते.
FAQ | नेहमी विचारले जाणारे प्रश्न
बँक म्हणजे काय?
बँक ही पैशाचे व्यवहार करणारे आर्थिक संस्था आहे, जी लोकांच्या ठेवी स्वीकारते आणि त्यांचे संरक्षण करते, तसेच लोक मागणी करतील तेव्हा त्यांच्या ठेवी त्यांना परत करते, आणि लोकांना कर्ज सुद्धा देते.
बँक काय काम करते?
बँका या विविध प्रकारच्या आर्थिक सेवा ग्राहकांना पुरवतात, जसे की ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, आर्थिक सल्ला देणे तसेच विविध सरकारी योजनांचे अंमलबजावणी करणे.
1969 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले?
1969 मध्ये भारतातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले.
निष्कर्ष | Bank in Marathi
बँकिंग व्यवस्था आहे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार हे बँकांच्या मार्फत केले जात असतात. भारतासारख्या खंडप्राय देशांमध्ये सुद्धा अनेक सोयीसुविधा आणि योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकिंग व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक माणसाचा केव्हा ना केव्हा बँकेशी संबंध येत असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला बँक म्हणजे काय, तिचे कार्य कसे चालते, बँकेचे प्रकार कोणते असतात याबद्दल माहिती असणे आत्ताच्या युगामध्ये गरजेचे आहे. आजच्या या लेखांमध्ये मी तुम्हाला बँकिंग व्यवस्थित विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. ती माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती वाचण्यासाठी rikamakhisa.com या आमच्या वेबसाईटला रोज भेट देत जा!
धन्यवाद!!👏
Related Posts