Courses after 12th commerce with high salary in Marathi : नमस्कार मित्रांनो, आताच 12 वी चे निकाल जाहीर झालेले आहेत. आणि प्रत्येक जण आता पुढील शिक्षण कोणत्या फील्ड मध्ये घ्यायचा याचा विचार करत असेल. आपण बघतोय कि, दिवसेंदिवस कॉमर्स शाखेकडे मुलांचा कल वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो. 10 वी नंतर कॉमर्स शाखा निवडणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अर्थातच, बँकिंग फायनान्स मॅनेजमेंट यांसारखे अत्यंत महत्वाचे विषय कॉमर्स शी संबंधित असल्याने या क्षेत्रात करियर च्या संधी ही खूप उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण नक्की कोणता कोर्स करावा याबाबत अनेक विद्यार्थी कंफ्यूज आहेत. कॉमर्स मध्ये कोणता कोर्स केल्यानंतर आपल्याला जास्त पगाराची नोकरी मिळू शकते याबाबत अनेक जणांना प्रश्न पडत असतो. म्हणूनच आज आपण Courses after 12th commerce with high salary याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही योग्य कोर्स निवडून आपले करियर चांगल्या प्रकारे घडवू शकता.
list of courses after 12th commerce with high salary
12 वी कॉमर्स नंतर असे अनेक चांगले कोर्सेस आहेत जे केल्यानंतर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी मिळवा शकता आणि आपल्या करियर मध्ये एक वेगळी ऊंची गाठू शकता. पुढे अशाच काही महत्वाच्या कोर्सेस ची यादी दिली आहे.
Courses after 12th commerce with high salary in Marathi
1. B.Com
बी. कॉम म्हणजेच बॅचलर ऑफ कॉमर्स हा 3 वर्षांचा पदवी कोर्स आहे. या कोर्स मध्ये अकाउंट्स,फायनान्स, करप्रणाली(Tax),ऑडिट, मॅनेजमेंट या विषयांच मूलभूत शिक्षण दिला जातो. अनेक उद्योगांमध्ये या विषयांच ज्ञान हे अत्यावश्यक असल्याने या विषयातील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना खूप मागणी असते.
बँकिंग आणि फायनान्स मध्ये जर B.Com केले तर यामध्ये आपल्याला उत्तम पॅकेज देणारे करियर घडविण्याची खूप मोठी संधी आहे. या विद्यार्थ्यांना विविध फायनान्शियल इंस्टिट्यूट, फर्म , कंपन्या तसेच सरकारी कार्यालयांमध्ये नोकरीच्या संधी आहेत.
पात्रता : 12 वी कॉमर्स
कालावधी : 3 वर्ष
नोकरीच्या संधी : विविध सरकारी आणि खाजगी बँका, वित्तीय संस्था , कॉर्पोरेट कंपन्या व विविध सरकारी संस्था
पगार : फ्रेशर्स साठी वार्षिक 3.5 ते 6 लाख रुपये.
2. Chartered Accountancy
चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये सी.ए म्हणतो. चार्टर्ड अकाऊंटंट हा एक प्रतिष्ठित हा खूप जास्त पगार मिळवून देणार करियर मानला जातो. साहजिकच सी.ए होण तितक सोप सुद्धा नाही. परंतु तुमच्यात जर जिद्द असेल आणि काहीतरी मोठं करून दाखविण्याची इच्छा असेल तर 12 वी कॉमर्स नंतर चार्टर्ड अकाउंटंट हा उत्तम पर्याय होऊ शकतो.
चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी तीन स्तरावर परीक्षा घेतली जाते. एक म्हणजे फाउंडेशन, दुसरी इंटरमिडियएट आणि तिसरी फायनल. या तीनही परीक्षा क्लियर केल्यावर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट बनता. या तीनही स्तरांचं नियोजन आणि आखणी Institute of Chartered Accountancy Of India मार्फत केली जाते.
पात्रता : 12 वी (कॉमर्स असेल तर उत्तम), कमीतकमी 50%
कालावधी : 3 वर्ष
नोकरीच्या संधी : KPMG, Deloitte, BDO International, RSM International, Earnst & Young, Grant Thornton International, विविध सरकारी संस्था
पगार : फ्रेशर्स साठी वार्षिक 7-8 लाख रुपये.
3. Company Secretary
कंपनी सेक्रेटरी हा 12 वी कॉमर्स नंतरचा सर्वात जास्त पगार देणार करियरचा उत्तम पर्याय आहे. कंपनी सेक्रेटरी हा कंपनी मधील अत्यंत महत्वाचे पद असून कंपनीच्या सर्व कायदेशीर बाबी सांभाळण्याचे महत्वाचे काम त्यांच्यावर असते. आपली कंपनी सर्व नियम आणि कायद्यानुसार काम करते हे पाहण्याच काम कंपनी सेक्रेटरी करतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना करियरच्या खूप साऱ्या संधी विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध होतात.
पात्रता : 12 वी कॉमर्स (50 % गुणांसह )
कालावधी : 3 वर्ष
पगार : फ्रेशर साठी 3-4.5 LPA
4. B.A. Economics
बी. ए. इकॉनॉमिक्स हा सुद्धा 12 वी कॉमर्स नंतर करियर चा उत्तम आणि खांत्रीशीर पर्याय आहे. हा 3 वर्षांचा पदवी कोर्स असून बँकिंग फायनान्स आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याची स्वप्न बघणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याने कोणत्याही शाखेतून कमीत कमी 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
हे वाचा : हे कोर्स करा आणि बँकेमध्ये जॉब मिळवा | Top demanded courses in banking Information in Marathi
बी. ए. इकॉनॉमिक्स हा उच्च पगार मिळवून देणारा 12 वी नंतरचा पदवी कोर्स असून हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी Investment Banker, Financial Consultant , Auditor यांसारख्या वित्तीय क्षेत्रातील विविध पदांवर खाजगी किंवा सरकारी कंपन्यांमध्ये काम मिळवू शकतात.
पात्रता : 12 वी उत्तीर्ण ( कमीत कमी 50 % गुणांसह )
कालावधी : 3 वर्ष
नोकरीच्या संधी : विविध सरकारी तसेच खाजगी कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, आयटी कंपन्या, सरकारी तसेच खाजगी बँका
पगार : फ्रेशर्स साठी 2-3 LPA
5. Banking & FinTech
BBA Banking & FinTeck हा 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम / कोर्स असून 12 वी कॉमर्स नंतर जास्त पगार मिळवून देणारा कोर्स शोधत असाल तर हा उत्तम पर्याय आहे. यात बँकिंग फायनान्स आंतरराष्ट्रीय बँकिंग टॅक्स यांबद्दलचा मूलभूत अभ्यासक्रम शिकवला जातो.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर Financial Analyst, Financial Adviser, Tas Assistant म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
पात्रता : 12 वी पास ( कॉमर्स प्राधान्य ) कमीत कमी 50% गुणांसह
कालावधी : 3 वर्ष
पगार : 3-6 LPA
नोकरीच्या संधी : ICICI Lombard, SBI Life Insurance, TaTa AIG, Deloitte, KPMG & PwC, विविध सरकारी व खाजगी वित्तीय संस्था.
6. Actuarial Science
दिवसेंदिवस Actuarial Science मधील कुशल कर्मचाऱ्यांची गरज वित्तीय सेवा पुरविणाऱ्या संस्थांमध्ये वाढत आहे. कोविड च्या काळापासून ही मागणी आणखी वाढली आहे. भारतामध्ये B. Sc Actuarial Science हा कोर्स 12 वी कॉमर्स नंतर उत्तम पर्याय आहे जो तुम्हाला एक उच्च पगार मिळवून देणारं करियर घडवून देवू शकतो.
पात्रता : कोणत्याही शाखेतून 12 वी (कमीतकमी 50% गुणांसह ) उत्तीर्ण
कालावधी : 3 वर्ष
पगार : 3-6 LPA
नोकरीच्या संधी : ICICI Lombard, SBI Life Insurance, Tata AIG, Deloitte, KPMG & PwC
7. Business Studies
BBS बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज हा Courses after 12th commerce with high salary मधील एक बेस्ट कोर्स आहे. या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना बिझनेस , मार्केटिंग, फायनान्स याबद्दल अभ्यासक्रम शिकवलं जातो. हा कोर्स पूर्ण केल्यावर विद्यार्थी Business Analyst, Business Consultant, Business Development Manager, Reaserch Analyst, Human Resource Manager, Accountant यांसारख्या पदांवर काम करू शकतात.
पात्रता : 12 वी (कॉमर्स ला प्राधान्य ) – कमीत कमी 50% गुणांसह
कालावधी : 3 वर्ष
पगार : 4-5 LPA (सुरुवातीला)
नोकरीच्या संधी : विविध वित्तीय संस्था, कंपन्या, सरकारी कंपन्या आणि बँका,AT & T, Accenture,MC Kinsey, Deloitte, EY, HCL, TCS, IBM
8. Fashion Design
Fashion Design हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आणि खूप मागणी असलेला कोर्स आहे. तुम्ही सुद्धा फॅशन डिझाईन मध्ये करियर बनवायचं स्वप्न पहात असाल तर 12 वी नंतर B. Sc Fashion Design हा अभ्यासक्रम निवडता येईल. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मोठ मोठ्या फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात, किंवा स्वतःचा व्यवसाय करण्याचा पर्याय सुद्धा विद्यार्थ्यांकडे असतो.
पात्रता : कोणत्याही शाखेतून 12 वी उत्तीर्ण (कमीतकमी 50% गुणांसह)
कालावधी : 3 वर्ष
पगार : 4-5 LPA
नोकरीच्या संधी : फॅशन कंपन्या – Aditya Birla, ITC Limited, Marks & Spencer, Lifestyle, Raymond, Pantaloons इ.
9. Hospital & Healthcare Management
हॉस्पिटल आणि हेल्थ केअर क्षेत्रं हे दिवसेंदिवस वाढत असून या क्षेत्रातील कुशल लोकांची गरज आणि मागणी वाढत आहे. या क्षेत्रातील मॅनेजमेंट कौशल्य शिकण्यासाठी BBA in Hospital & Healthcare Management हा कोर्स 12 वी नंतर Courses after 12th commerce with high salary साठी उत्तम पर्याय आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यवस्थापन कौशल्ये शिकवणारा हा कोर्स असून मेडिकल क्षेत्रात अनेक नोकरीच्या संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.
हे पण वाचा : नर्सिंग मध्ये करियर करायचं आहे ? हे आहेत नर्सिंग मधील सर्वोत्तम कोर्सेस | Nursing course information in marathi
पात्रता : 12 वी उत्तीर्ण (कॉमर्स ला प्राधान्य ) – कमीतकमी 50% गुणांसह.
कालावधी : 3 वर्ष
पगार : 3-5 LPA
नोकरीच्या संधी : विविध हॉस्पिटल्स – fortis hospitals ltd, Vivo Hospital, Ingenious Hospital, Apollo Healthcare, Medanta, Max, Tata, Duncans इत्यादी.
10. Digital Marketing
आताच्या डिजिटल युगामध्ये सोशल मिडियावर आपल्या व्यवसायाची जाहिरात करणे हे प्रत्येक बिझनेस साथी आवश्यक गोष्ट झाली आहे. Courses after 12th commerce with high salary चा विचार केला तर BBA in Digital Marketing हा कोर्स या क्षेत्रात करियर करण्यासाठी 12 वी नंतरचा बेस्ट पर्याय आहे.
या कोर्स मध्ये सोशल मीडिया मार्केटिंग, ई मेल मार्केटिंग, Search Engine Optimization, कंटेंट मार्केटिंग यांसारखी डिजिटल मार्केटिंग ची तंत्रे शिकवली जातात.
पात्रता : कोणत्याही शाखेतून कमीत कमी 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
कालावधी : 3 वर्ष
पगार : 3-5 LPA
नोकरीच्या संधी : विविध आयटी कंपन्या – Wipro , Infosys , TCS, Amazon, Google, Microsoft इत्यादी..
11. Aviation Management
तुम्हाळ जर Aviation क्षेत्रात करियर करायचं असेल तर BBA in Aviation हा कोर्स करून आपण इथे आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर विविध विमानतळांवर नोकरीच्या संधी निर्माण होतील. Courses after 12th commerce with high salary चा विचार करता या क्षेत्रात देशात आणि विदेशात उच्च पगारांच्या नोकऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.
पात्रता : कोणत्याही शाखेतून 12 वी (कमीत कमी 50% गुणांसह)
कालावधी : 3 वर्ष
पगार : 3-8 LPA
नोकरीच्या संधी : एअर इंडिया , इंडिया जेट एअरवेज ,एअर हेरिटेज ,एअर डेक्कन, इंडिगो, स्पाइस जेट यांसारख्या एअरलाइन्स कंपन्या.
FAQ : Courses after 12th commerce with high salary in Marathi
12वी कॉमर्स नंतर सर्वात जास्त पगार देणारा कोर्स कोणता आहे?
12 वी कॉमर्स नंतर B.Com, Charterd Accountancy, Economics, Banking & FinTech, Actuarial Science, Business Studies, fashin Design, Digital Marketing, Hospital & Healthcare Management हे कोर्सेस सर्वात जास्त पगार देणारे आहेत.
Note : मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या Instagram, Facebook, आणि फेसबूक वरील @rikama_khisa पेज ला फॉलो करा.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024