Medical Courses after 12th without NEET in marathi : 12 वी नंतर जर तुम्हाला मेडिकल क्षेत्रात करियर करायची इच्छा असेल तर नॅशनल एलिजीबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच NEET परीक्षा द्यावी लागते हे आपल्याला माहिती आहे. परंतु ही NEET परीक्षा इतकी सोपी सुद्धा नाही कि कुणीही विद्यार्थी सहजपणे पास होऊन जाईल. NEET परीक्षेमध्ये पुरेशा गुणांअभावी बऱ्याच विद्यार्थ्यांना मेडिकल किंवा वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याच स्वप्न सोडून द्यावे लागते. परंतु तुम्हाला माहीत आहे का कि NEET परीक्षा न देता सुद्धा आपण वैद्यकीय क्षेत्रात करियर घडवू शकतो. मेडिकल क्षेत्रात असे खुपसे कोर्सेस आहेत ज्यासाठी आपण NEET परीक्षा न देता सुद्धा प्रवेश घेऊ शकतो आपणी मेडिकल क्षेत्रातील करियर च स्वप्न पूर्ण करू शकतो.
आज आम्ही तुम्हाला मेडिकल क्षेत्रातील अशाच काही कोर्सेस ची माहिती देणार आहोत जे करण्यासाठी तुम्हाला NEET परीक्षा देण्याची गरज नाही.
career options after 12th science pcb without neet
राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET) ही मेडिकल क्षेत्रातील शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी देशातील सर्वात मोठी परीक्षा आहे. दरवर्षी सुमारे 15 लाख विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. MBBS, BDS, BAMS, BHMS यांसारख्या वैद्यकीय कोर्सेस मध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET परीक्षा द्यावी लागते, परंतु खूपच कमी विद्यार्थ्यांना ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करता येते. परंतु उर्वरित विद्यार्थ्यांनी निराश होण्याची आजिबात आवश्यकता नाही. असे अनेक कोर्सेस आहेत ज्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET ची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला अशा कोर्सेस ची माहिती देणार आहोत जे करून तुम्ही NEET परीक्षा न देता सुद्धा आरोग्य क्षेत्रात उत्तम करियर घडवू शकता. चला तर मग, अशा अभ्यासक्रमांची यादी पाहू या..
बॅचलर इन फार्मसी | B.Pharmacy
बॅचलर इन फार्मसी किंवा बी. फार्म हा कोर्स 12 वी सायन्स नंतर करता येतो. या अभ्यासक्रमामध्ये औषधांचा अभ्यास, औषधे तयार करणे, तसेच औषधांवर संशोधन इत्यादी शिकवले जाते. जर तुम्हाला फार्मासिस्ट व्हायचे असे तर बॅचलर इन फार्मसी हा कोर्स करावा लागतो. भारतामध्ये 12 वी नंतर या कोर्स ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे.
Related Post :
हे कोर्स करा आणि बँकेमध्ये जॉब मिळवा | Top demanded courses in banking Information in Marathi
हे आहेत 12 नंतरचे सर्वोत्तम डिप्लोमा कोर्सेस | Diploma courses after 12th in Marathi
या कोर्स च्या प्रवेशासाठी विविध संस्था आणि विद्यापीठे आपली स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात, आणि या प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. ज्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे NEET परीक्षा आगहेटली जाते त्या NTA द्वारे सुद्धा फार्मसी अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाते.
फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना विविध फार्मा कंपन्या, सौन्दर्य प्रसाधने उत्पादन करणाऱ्या कंपन्या,हर्बल उद्योग यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच संशोधन क्षेत्रात सुद्धा करियर करण्याच्या संधी आहेत. तसेच विविध सरकारी विभागांमध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवता येते.
बीएससी नर्सिंग
आरोग्य क्षेत्रात डॉक्टर हा जसा महत्वाचा घटक आहे तसंच नर्स म्हणजेच परिचारिका हा सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक आहे. रुग्णांची काळजी घेणे, त्यांना औषधे देणे, इंजेक्शन देणे आशाअ प्रकारची कामे या कोर्स मध्ये शिकवली जाते. रुग्णसेवेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीएससी नर्सिंग हा चार वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर अनेक सरकारी तसेच खाजगी रुग्णालये, शासकीय संस्था, नर्सिंग कॉलेज,विविध स्वयंसेवी संस्था यांमध्ये नोकरीच्या खूप संधी आहेत. तसेच हा कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना पगार सुद्धा चांगला मिळतो.
हे पण वाचा : नर्सिंग मध्ये करियर करायचं आहे ? हे आहेत नर्सिंग मधील सर्वोत्तम कोर्सेस
बीटेक इन बायोमेडिकल
बीटेक इन बायोमेडिकल इंजिनियरिंग हा सुद्धा 12 वी सायन्स नंतर 4 वर्षांचा कोर्स आहे. यअ कोर्स ची फी 50000 ते 2 लाख पर्यन्त असू शकते. सरकारी विद्यालयामध्ये खाजगी विद्यालयाच्या मानाने कमी फी आकारली जाते.
हा कोर्स पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना बायोमेडिकल इंजीनियर, माइक्रोबायोलॉजिस्ट, प्रोजेक्ट मैनेजर, बायोकेमिस्ट, बायोमेडिकल मैनेजर, रिसर्च एनालिस्ट, बायोमेडिकल टेक्निशियन इत्यादी पदांवर नोकर करण्याची संधी मिळते.
बीएससी न्यूट्रिशन
हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून यामध्ये पोषण व आहार विज्ञानाविषयी संपूर्ण ज्ञान दिले जाते. बीएससी न्यूट्रिशन हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विविध बहुराष्ट्रीय कंपन्या, आरोग्य केंद्रे, दवाखाने यांमध्ये नोकरीच्या संधी आहेत.
हल्लीच्या आधुनिक काळामध्ये आरोग्याविषयी होणाऱ्या जागृतीमुळे पोषण व आहार या बाबतीत लोक जागरूक झाले आहेत. वाढणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांमुळे आहारतज्ञ यांचा सल्ला घेण्याला लोक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे निश्चितच पोषण व आहारशास्त्रात बीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात सुद्धा प्रचंड मागणी राहणार आहे.
बी ए मानसशास्त्र
बदलत्या ताणतनावाच्या जिवानशैलीमुळे मानसिक आरोग्य स्थिर राखणे हे अत्यंत महत्वाचे आणि कठीण काम होऊन बसले आहे. प्रत्येकच वयोगटातील व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा वेळी मानसोपचार तज्ञांचा सल्ला आणि उपचार घेणे क्रमप्राप्त ठरते. शेवटी ज्याचे मन सुदृढ असेल त्यांचे शरीर सुद्धा निरोगी बनते.
12 वी नंतर बी ए मानसशास्त्र हा 3 वर्षांचा कोर्स करून तुम्ही या क्षेत्रातील करियर ची सुरुवात करू शकता. यासाठी 12 वी सायन्स मधून उत्तीर्ण असणे आवश्यक नाही. आर्ट्स किंवा कॉमर्स मधून 12 वी केली असेल तरी सुद्धा या कोर्स मध्ये प्रवेश घेता येते.
मानसशास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर आरोग्य क्षेत्रात मानसोपचार तज्ञ, कन्सलटंट , तसेच पोलिस खात्यामध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये कौन्सिलर म्हणून सुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
बीएससी फिजिओथेरपी (BSc Physiotherapy)
12 वी सायन्स नंतर बीएससी फिजिओथेरपी (BSc Physiotherapy) हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून NEET न देता आरोग्य क्षेत्रात करियर करण्यासाठी हा कोर्स उत्तम पर्याय आहे. या कोर्सनंतर विद्यार्थी फिजिओथेरपिस्ट, संशोधक, संशोधन सहाय्यक, थेरपी मॅनेजर क्रीडा फिजिओ रिहॅबिलिटेटर किंवा या क्षेत्रात व्याख्याता म्हणूनही काम करू शकतात.
अजून काही महत्वाचे पर्याय | courses after 12th science without neet
वरील कोर्स व्यतिरिक्त अजून खूप सारे कोर्स आहेत जे आपण NEET न देता सुद्धा करू शकतो आणि वैद्यकीय क्षेत्रातील करियरची सुरुवात करू शकतो. पुढे अशाच काही महत्वाच्या कोर्सेस ची यादी दिली आहे.
बीएससी बायोटेक्नॉलॉजी (BSc Biotechnology)
बीएससी अॅ ग्रीकल्चर सायन्स
बीएससी कार्डिओ-व्हस्कुलर टेक्नॉलॉजी (BSc Cardio-Vascular Technology)
बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी (B.O.Th) (Bachelor of Occupational Therapy)
बीएससी बायोटेक्नॉलॉजी (BSc Biotechnology)
फॉरेन्सिक सायन्स
बीएससी क्लिनिकल रिसर्च
बीएससी क्लिनिकल सायकॉलॉजी
बीएससी पॅरामेडीकल टेक्नॉलॉजी
निष्कर्ष : Medical Courses after 12th without NEET in marathi
तर मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कुणाला 12 वी सायन्स नंतर वैद्यकीय क्षेत्रात करियर करायच असेल परंतु NEET परीक्षा उत्तीर्ण नसाल तर वरील पैकी कोणताही योग्य पर्याय निवडून आरोग्य क्षेत्रात करियर करण्याच स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतांना योग्य ते कॉलेज,त्या कॉलेज मध्ये मिळणाऱ्या सुविधा,शिक्षक वर्ग तसेच अभ्यासक्रमासाठी असणारी फी ही सर्व महत्वाची माहिती जरूर तपासून पहा,जेणेकरून तुम्ही केलेल्या कोर्स चा योग्य फायदा तुम्हाला होऊ शकतो.
Note : मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या Instagram, Facebook, आणि फेसबूक वरील @rikama_khisa पेज ला फॉलो करा.