Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना जाहीर केल्या जातात. महिलांचे आरोग्य सुधारावे, त्या आर्थिक दृष्टीने सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असते. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना सुरू केली आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला रुपये 1,500/- इतकी रक्कम मिळणार आहे. सदर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेची पात्रता, योजनेमधून मिळणारे लाभ, योजनेसाठी लागणारे कागदपत्रे या सर्वांबद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
हे पण वाचा : मुख्यमंत्री वयोश्री योजना | ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये | जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
महिलांचा रोजगारांमध्ये सहभाग वाढावा तसेच त्यांच्या पोषणामध्ये सुधारणा व्हावी, महिला या आर्थिक दृष्टीने स्वतंत्र व्हाव्यात तसेच महिलांची कुटुंबातील निर्णय भूमिका अधिक मजबूत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमार्फत पात्र असलेल्या महिलांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या आधार नंबरची लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीमार्फत 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल. जर ती महिला केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेद्वारे रु.1500/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर त्याची रक्कम त्या महिलेला या योजनेद्वारे मिळेल. म्हणजेच इतर कोणत्याही योजनेद्वारे एखादा महिलेला 1000 रुपये मिळत असतील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे उरलेले 500 रुपये त्या महिलेला मिळतील.
हे पण वाचा : केंद्र सरकारची फेरीवाले व लहान व्यापाऱ्यांसाठी पीएम स्वनिधी योजना | जाणून संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वाची माहिती | What is Mukhyamantri Ladaki Bahin Yojna 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासन |
कोण पात्र असतील | राज्यातील विवाहित/विधवा/घटस्फोटीत/परित्यक्त्या/निराधार महिला |
मिळणारा लाभ | दरमहा रु.1500/- |
अर्ज कधीपासून सुरू होतील | 1 जुलै 2024 |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | 15 जुलै 2024 |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश
राज्यातील महिला व मुलींना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांच्या रोजगार निर्मिती चालना मिळावी.
- महिलांचे आर्थिक तसेच सामाजिक पुनर्वसन करणे.
- राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
- राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
- महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.
योजनेचे लाभार्थी | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana Beneficiaries
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या दरम्यान वय असलेल्या विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र असतील.
योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता | Mukhyamantri Ladaki Bahin yojana Elegibility
- ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- सदर महिला विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार यापैकी असली पाहिजे.
- लाभार्थी महिलेचे वय हे 21 ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर महिलेच्या नावाचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- त्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana Documents
1) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
2) आधार कार्ड
3) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल) किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
4) कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखांपर्यंत असणे आवश्यक)
5) बँक खाते पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स
6) पासपोर्ट आकाराचा फोटो
7) रेशन कार्ड
8) हमीपत्र
योजनेसाठी अर्ज कुठे कराल | Mukhyamantri Ladaki BahinYojana Online Apply
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी हे अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका, सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांच्याकडे सोपवलेली आहे. शासनामार्फत ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी एक नवीन वेब पोर्टल सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.
मात्र महिला स्वतः ऑनलाईन आपला अर्ज भरू शकते.
अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका, सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांच्यामार्फत सर्व खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज हा सक्षम अधिकारी यांच्याकडे त्यांच्यामार्फत सादर करण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज भरताना अर्जदार महिलेने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्या महिलेचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. त्यासाठी संबंधित महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशन कार्ड)
- स्वतःचे आधार कार्ड
या महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत
- ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
- या महिलांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतात
- ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कार्यरत असलेले किंवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी हे मात्र अपात्र ठरणार नाहीत.
- ज्या महिलांनी शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेद्वारे रु.1500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे आजी किंवा माजी खासदार/आमदार आहे.
- ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक किंवा सदस्य आहेत.
- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांची एकत्रितपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहेत.
वरील सर्व प्रकारच्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र असतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये
- या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित/घटस्फोटीत/परित्यक्त्या/निराधार महिला अर्ज करू शकतात.
- लाभार्थी महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये तिच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे देण्यात येतील.
- लाभार्थी महिला इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यातून मिळणारा लाभ हा 1500 रुपयांपेक्षा कमी असेल तर राहिलेला फरक या योजनेतून त्या महिलेला देण्यात येईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख (2.50 लाख) पेक्षा जास्त नसावे.
- मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित जमीन ही पाच एकर पेक्षा जास्त नसावी.
- त्या महिलेच्या कुटुंबात एखादी व्यक्ती ही शासकीय सेवेत असेल किंवा शासकीय सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र असणार नाही.
- ज्या महिलेच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती ही विद्यमान आमदार/खासदार किंवा माजी आमदार/खासदार असेल तर अशी महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र नसणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ती महिला स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकते.
- जर त्या महिलेला स्वतः ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर अंगणवाडी सेविका/ग्रामपंचायत/सेतू सुविधा केंद्र यामार्फत अर्ज करता येईल.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न : FAQ
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे ?
महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेली योजना असून या योजनेअंतर्गत राज्यातील रहिवासी असलेल्या विवाहित/घटस्फोटीत/परित्यक्त्या/निराधार महिलांना दरमहा 1500 रु. इतकी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत ?
मुख्यमंत्री लाडके बहिण योजना हे महाराष्ट्र शासनाचे महिलांसाठी असणारी योजना असून सदर योजनेचे फॉर्म हे 01 जुलै 2024 पासून सुरू होणार आहेत तर 15 जुलै 2024 ही अर्ज भरण्याची शेवटची दिनांक जाहीर करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
घेऊनच लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यानंतर संबंधित महिलेच्या आधार कार्ड, डोमासाईल दाखला किंवा जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक ची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड तसेच सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत.
Note : मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या Instagram, Facebook, आणि फेसबूक वरील @rikama_khisa पेज ला फॉलो करा.