आता मिळेल मोफत तीर्थ दर्शनाचा लाभ | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर | Mukhyamantri Tirth Darshan Yojana

Mukhyamantri Tirth Darshan Yojana : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून अनेक महान संत महात्मे या पवित्र भूमीत होऊन गेले आहेत. हिंदू धर्मा प्रमाणेच इतर अनेक धर्माचे आणि पंथांचे अनुयायी महाराष्ट्रात राहतात. वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची परंपरा महाराष्ट्रात अविरत सुरू आहे.महाराष्ट्रात तसेच देशात अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत ज्या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी जाऊन यावे अशी अनेकांची इच्छा असते. जसे कि, हिंदू धर्मामध्ये चार धाम यात्रा,अमरनाथ यात्रा,केदारनाथ यात्रा करण्याच स्वप्न अनेक नागरिक पाहत असतात. परंतु पुरेशा पैशांअभावी किंवा साधन सामुग्री अभावी किंवा सोबत घेऊन जाणारे कुणी नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने बऱ्याच सणांची ही इच्छा अपूर्ण रहाते. हीच बाब लक्षात घेऊन देशातील सर्व धर्मातील लोकांना अशा तीर्थस्थळी भेट देवून आपली आध्यात्मिक शांती प्राप्त करता यावी यासाठी 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरू केली आहे. या योजने द्वारे 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना मोफत तीर्थ दर्शन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

काय आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना | Mukhyamantri Tirth Darshan Yojana

Mukhyamantri Tirth Darshan Yojana

महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना भारतातील तीर्थ क्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करता यावी यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे उद्दिष्ठ

महाराष्ट्रातील नागरिकांना तीर्थक्षेत्र भेटीची सुविधा मोफत उपलब्ध करून देणे.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबद्दल महत्वाची माहिती | Mukhyamantri Tirth Darshan Yojana Information

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र भेट घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना घेता येईल.

या योजनेत पात्र असलेल्या व्यक्तीला योजनेचा लाभ फक्त एक वेळ घेता येईल.

या योजनेत प्रवास खर्चाची कमाल मर्यादा 30,000 रुपये इतकी असून त्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास,भोजन आणि निवास या गोष्टी समाविष्ट असणार आहेत.

महाराष्ट्रातील सर्व धर्मातील नागरिकांसाठी ही योजना लागू असणार आहे.

महिलांना दर महिन्याला मिळणार १५०० रुपये. लगेच अर्ज करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता | Mukhyamantri Tirth Darshan Yojana Eligibilty

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे वय हे 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असू नये.

65 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मिळणार 3000 रुपये | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

आवश्यक कागदपत्रे | Mukhyamantri Tirth Darshan Yojana Documents

(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
(२) लाभार्थ्यांचे आधार कार्ड व रेशन कार्ड
(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
(लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐर्जी त्या लाभार्थ्यिचे १५ वर्षांपूर्वीचे
१. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३.शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या चारपैकी
कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.)
(४) उत्पन्नाचा दाखला (2.50 लाखांपर्यंत उत्पन्न) किंवा पिवळे/केशरी रेशन कार्ड
(५) वैद्यकीय प्रमाणपत्र.
(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
(७) जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमाांक
(8) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

फेरीवाले व लहान व्यापऱ्यांसाठी केंद्र सरकारची धमाकेदार योजना | PM Svanidhi Yojana in Marathi

योजनेतील लाभार्थी निवडीबाबत महत्वाची माहिती

लाभार्थ्याची निवड ही संगणकीय लॉटरी द्वारे केली जाईल. तसेच अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी (Waiting List) सुद्धा केली जाईल.
निवडलेला प्रवासी प्रवासाला न केल्यास प्रतिक्षा यादीतील समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासाला पाठवता येईल.

फक्त निवडलेल्या व्यक्तीस तीर्थक्षेत्र यात्रेला जाता येईल, त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाता येणार नाही.

पती-पत्नी पैकी फक्त एकाचीच लॉटरीमध्ये निवड झाली असल्यास दुसऱ्या जोडीदारास सुद्धा यात्रेवर पाठवण्याचा निर्णय आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत घेतला जाऊ शकतो.

हे ठरणार अपात्र

सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणली असली तरीही यामध्ये काही निकष ठरवून दिलेले आहेत. आणि या निकषानुसार काही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. या मध्ये पुढील व्यक्तींचा समावेश असणार आहे.

  1. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरणारा आहे.
  2. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कायम कर्मचारी आहे किंवा निवृत्तीवेतन घेत आहे.
  3. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहेत.
  4. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  5. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नावावर चार चाकी वाहने (ट्रॅक्टर सोडून) आहेत.
  6. प्रवासासाठी लाभार्थी व्यक्ती ही शारीरिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसीस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग अशा प्रकारचे आजार असणाऱ्या व्यक्ती या अपत्य असणार आहेत.
  7. ज्या व्यक्ती लॉटरीमध्ये तीर्थदर्शन प्रवासासाठी निवडला गेल्या होत्या परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही ज्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा अर्जदारांना देखील अपात्र ठरवले जाणार आहे.
  8. खोटी माहिती देऊन किंवा सत्य माहिती लपवून अर्ज करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा अपात्र ठरविण्यात येणार आहे.

Mukhyamantri tirth darshan yojana gr pdf

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.

हे पण वाचा :