budget in marathi | budget in marathi meaning | 2024 budget in marathi | interim budget in marathi | antarim budget in marathi | meaning of budget in marathi |budget in marathi 2024 | union budget in marathi | 2024 budget in marathi pdf | today’s budget in marathi
आपण नेहमीच शासनाकडून बजेट/अर्थसंकल्प जाहीर होण्याबाबतच्या बातम्या टीव्ही चॅनेल वर ऐकत असतो. बऱ्याच वेळा बजेट च्या माध्यमातू सत्ताधारी पक्ष हा विविध योजना जाहीर करून लोकांना किंवा समाजातील विविध घटकांना खुश करण्याचे काम करत असतो तर विरोधी पक्ष हा नेहमीच यंदाचा बजेट कशाप्रकारे निरुपयोगी आहे हे सांगतांना दिसत असतो. मात्र सर्वसामान्य लोकांना बऱ्याच वेळा या बजेट किंवा अर्थसंकल्पामधील किचकट गोष्टी कळत नसतात. आज आपण या लेखाच्या माध्यमातून बजेट / अर्थसंकल्प म्हणजे नेमक काय आणि त्यांचे प्रकार कोणते असतात, ते कोणामार्फत आणि कधी सदर केले जाते याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत,त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुमच्या बजेट बद्दलच्या सर्व शंका दूर होतील.
budget mhanje kay in marathi
GDP म्हणजे काय ? | GDP meaning in marathi
बजेट म्हणजे काय ? | Budget in Marathi
बजेट म्हणजे मराठी मध्ये अर्थसंकल्प किंवा अगदीच अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये त्याला आपण आयाव्यायाचे अंदाजपत्रक असे म्हणू शकतो. प्रत्येक देशाचे सरकार हे साधारणपणे आगामी एका वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करून संसदेमध्ये मांडत असते.
देशाला आगामी वर्षात किती पैसा मिळू शकेल व त्यातून तो नेमका कुठे आणि कशा प्रकारे खर्च करता येईल याचे नियोजन म्हणजेच अर्थसंकल्प असेही सोप्या भाषेत आपल्याला संगत येईल.
विशिष्ठ आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादानुसार जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प.
बजेट हा शब्द इंग्रजी असून तो मूळच्या फ्रेंच भाषेतील Bougette (लहानशी थैली) या शब्दावरून आलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला किंवा संघटनेला आपला अर्थसंकल्प आखावाच लागतो.
आपण ज्या प्रकारे आपल्या घरी येणारे वार्षिक उत्पन्न व त्यानुसार कोणत्या गोष्टींवर किती खर्च करायचं याचे नियोजन करत असतो, तसेच प्रत्येक देशाचे सरकार सुद्धा त्यांना मिळणाऱ्या पैशाचे नियोजन करीत असते.
बजेट का महत्वाचं असतं ? Why Budget is important ?
कोणत्याही देशासाठी बजेट हे खूपच महत्वाचं असतं. कारण त्यामुळे देशाच्या प्रगतीची दिशा ठरवता येते.
देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने कोणत्या बाबींवर अधिक खर्च करणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रगती साधता येईल, याचे नियोजन करणे बजेट मुले शक्य होते. उदा. शिक्षण,आरोग्य, पायाभूत सुविधा.
बजेट किंवा अर्थसंकल्पामुळे सरकारला आपल्या देशाची आर्थिक स्थिति समजते व त्यामुळे खर्चावर नियंत्रण व पैशाचे योग्य नियोजन करून सर्वसमावेशक विकास करणे शक्य होते.
बजेट च्या माध्यमातूनच शासन हे लोकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणि सवलती जाहीर करत असते. थोडक्यात लोकांच्या ईच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करीत असते.
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे देशाची आर्थिक दिशा थरविण्याचे अत्यंत महत्वाचे काम बजेट च्या माध्यमातून केले जाते. विशिष्ठ परिस्थितीनुसार कोणत्या क्षेत्रात जास्त गुंतवणूक करणे आवश्यक आहे किंवा कोणत्या क्षेत्रातील गुंतवणूक कमी करणे गरजेचे आहे हे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ठरवले जाते.
अर्थसंकल्पात काय असतं ? budget in marathi meaning
अर्थाचा म्हणजेच पैशाचा संकल्प म्हणजे अर्थसंकल्प होय. अर्थसंकल्पात विविध महत्वाच्या गोष्टींचा समावेश असतो.
शासन कोणत्या वस्तूंवर किती कर लावणार आहे व कोणत्या वस्तूंवरील कर कमी करणार आहे तसेच विविध उत्पन्न गटातील व्यक्तींवरील करांची रचना कशाप्रकारे असेल याची माहिती बजेट मध्ये असते.
अर्थसंकल्पामध्ये शासनाला विविध कर, सेवा शुल्क व संपत्ती विक्री च्या माध्यमातून किती पैसा मिळू शकेल यांचा अंदाज अर्थसंकल्पात असतो.
तसेच सरकार विविध क्षेत्रावर जसे कि शिक्षण,आरोग्य,विविध योजनांवरील सबसिडी यांवर किती खर्च करणार आहे यांची सुद्धा माहिती बजेट मध्ये असते.
सरकारने घेतलेल्या कर्ज व त्यांवरील व्याज, तसेच नवीन कर्ज घेण्याची आवश्यकता याविषयी माहिती सुद्धा बजेट मध्ये असते.
टर्म इन्श्युरन्स म्हणजे काय ? What is Term Insurance in Marathi
वरील महितीप्रमानेच शासन सुरू करत असलेल्या नवीन योजना,त्यांवरील खर्चाची तरतूद या सगळ्यांची माहिती बजेट मध्ये असते.
अर्थसंकल्प कोण सादर करतो ? who present budget in parliament
देशाचा अर्थमंत्री संसदेमध्ये अर्थसंकल्प सदर करतो. तो संसदेमध्ये अर्थसंकल्पीय भाषण करून सरकारच्या विविध आर्थिक योजनांची माहिती लोकांना देतो.
आताच 23 जुलै 2024 रोजी भारताच्या अर्थमंत्री श्रीम. निर्मला सितारामन यांनी 2024-2025 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्प कसा तयार होतो ? how budget is prepared ?
अर्थसंकल्प किंवा बजेट बनवणे ही प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असून यामध्ये विविध मंत्रालईन विभाग, शासकीय विभांग तसेच अनेक तज्ञ व्यक्तींचा सहभाग असतो
Note : मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या Instagram, Facebook, आणि फेसबूक वरील @rikama_khisa पेज ला फॉलो करा.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024