Insurance in marathi : माझ्या एका मित्राने नवीन मोबाईल खरेदी केला, परंतु थोड्या दिवसातच बाईक वरून जाताना त्याच्याकडून तो मोबाईल त्याच्या खिशातून पडला आणि फुटून गेला. त्याचे संपूर्ण पैसे वाया गेले आणि त्याला कोणतीही भरपाई या मोबाईल कंपनीकडून मिळाली नाही. जर त्याने मोबाईल खरेदी करताना त्या मोबाईलचा इन्शुरन्स सुद्धा केला असता तर आज त्याला त्याच्या मोबाईलची भरपाई मिळू शकले असती. मित्रांनो, हल्ली इन्शुरन्स किंवा विमा हा शब्द परवलीचा झाला आहे. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला कधीही कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ लागू शकते. अशा अडचणीच्या वेळी आपल्याकडे एखाद्या कंपनीचा विमा किंवा इन्शुरन्स असणे खूप फायद्याचे ठरते. तुम्ही सुद्धा विमा उतरवण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आजच्या या लेखांमध्ये आपण विमा म्हणजे नेमकं काय? विम्याचे प्रकार कोणते आहेत? विमा घेण्याचे फायदे काय आहेत तसेच विमा निवडताना कोणती काळजी घ्यावी लागते अशा प्रकारच्या विम्याची संबंधित सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा.
विमा म्हणजे काय? Insurance in marathi
जोखीम व्यवस्थापनाचा एक उत्तम मार्ग म्हणून आपल्याला विमा कडे पाहता येईल. विमा म्हणजे एक प्रकारे आपल्या कंपनीसोबत करार असतो की ज्यामध्ये आपण एक ठराविक रक्कम नियमितपणे त्या कंपनीला देत असतो आणि त्या बदल्यात आपल्या संकटाच्या वेळी किंवा अडचणीच्या वेळी ती कंपनी आपल्याला आर्थिक भरपाई देते.
उदाहरणार्थ जर आपण आयुर्विमा घेतला तर आपल्या मृत्यू पक्षात त्या संबंधित कंपनीकडून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते, किंवा जर आपल्याकडे अपघात विमा असेल तर जेव्हा आपला अपघात होईल त्यावेळी आपला मेडिकलचा जो खर्च असेल तो आपल्याला कंपनीकडून मिळू शकतो, त्याच प्रकारे वाहन विमा मध्ये आपल्या गाडीच्या अपघातामध्ये गाडीच्या नुकसानीचा खर्च आपल्याला मिळतो.
थोडक्यात विमा हा आपल्याला आपल्या होणाऱ्या आर्थिक नुकसानी पासून संरक्षण देतो.
विम्याचे विविध प्रकार (Different types of insurance)
. बाजारात विमाचे खूप सारे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्या प्रत्येक प्रकारांमध्ये काही विशिष्ट गोष्टी कव्हर केल्या जातात. आणि त्यानुसार त्या विम्याचे हप्ते आणि मिळणारी भरपाई यामध्ये विविधता असते. विम्याचे काही महत्त्वाचे प्रकार आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील.
1) आयुर्विमा
विम्याच्या ‘आयुर्विमा’ या प्रकारामध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक भरपाई दिली जाते. आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या मुलाबाळांचे कसे होईल हे चिंता प्रत्येक माणसाला सतावत असते, त्याला ‘आयुर्विमा’ हा उत्तम पर्याय आहे. तुमच्या मृत्यू पक्षात तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण प्रदान करण्याचं काम आयुर्विमा करतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराचा खर्च, कर्ज किंवा कुटुंबाचा दैनंदिन खर्च त्यासाठी त्या संबंधित विमा कंपनीकडून मदत मिळते. आयुर्विमा चे सुद्धा विविध प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे..
i) टर्म लाइफ इन्शुरन्स
टर्म लाइफ इन्शुरन्स हा एक मूलभूत आणि महत्त्वाचा आयुर्विमा आहे. ज्यामध्ये एका विशिष्ट कालावधी साठी तुम्हाला आर्थिक संरक्षण प्राप्त होते. त्या विशिष्ट कालावधीमध्ये जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यावेळी विमा कंपनीकडून त्या कुटुंबाला मृत्यू लाभ म्हणजेच आर्थिक भरपाई मिळते.
ii) संपूर्ण जीवन विमा
संपूर्ण जीवन विमा या आयुर्विमा योजनेमध्ये संबंधित व्यक्तीचे पूर्ण आयुष्य कवर केले जाते. म्हणजे कोणत्याही कालावधीमध्ये व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मृत्यू लाभ दिला जातो.
iii) युनिव्हर्सल लाइफ इन्शुरन्स
युनिव्हर्सल लाइफ इन्शुरन्स हा आयुर्वेदाचा एक लवचिक प्रकार आहे. यामध्ये विमाधारक व्यक्ती कोणत्याही वेळी त्याच्या गरजेनुसार कव्हर करण्यात आले रक्कम आणि विम्याचे हप्ते यामध्ये बदल करू शकतो.
iv) व्हेरिएबल लाइफ इन्शुरन्स
हा आयुर्वेदाचा असा एक प्रकार आहे ज्यामध्ये विमाधारकाला कंपनीकडून सब खात्यांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळते. आणि मिळणारा मृत्यूलाभ हा त्या गुंतवणूक केलेल्या संबंधित पॉलिसी च्या कामगिरीवर अवलंबून असतो.
2) आरोग्य विमा
आरोग्य विमा हा आपल्या आरोग्य खर्चाच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये आपल्या आरोग्यासाठी येणारा खर्च आपल्याला संबंधित विमा कंपनीकडून दिला जातो. यामध्ये सुद्धा व्यक्तिगत आरोग्य विमा, कौटुंबिक आरोग्य विमा, आणि क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स यांसारख्या अनेक योजनांचा समावेश होतो.
3) वाहन विमा
वाहन विमा यामध्ये आपल्या गाडीला जर अपघात झाला किंवा गाडीची चोरी झाली किंवा गाडीला नुकसान झाले तर विमा कंपनीकडून त्या संबंधित विमाधारकाला त्याची भरपाई मिळते. यामध्ये सुद्धा व्यावसायिक वाहन विमा, तृतीय पक्ष विमा, व्यापक विमा तसेच दुचाकी वाहन विमा यांसारख्या अनेक योजना अंतर्भूत आहेत.
4) इतर विमा योजना
वर उल्लेख केलेल्या काही महत्त्वाच्या विमा प्रकारांबरोबरच इतर अनेक प्रकारचे विमा आताच्या काळात उपलब्ध आहेत. यामध्ये घराचा विमा, संपत्ती विमा, व्यवसाय विमा, प्रवासी विमा किंवा शेतकऱ्यांसाठी असलेला पिक विमा असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील.
इतकेच नाही, तर हल्लीच्या काळामध्ये काही प्रसिद्ध व्यक्ती आपले केस, त्वचा, नखे, गळा यासारख्या शारीरिक अवयवांचा सुद्धा विमा उतरवताना आपल्याला बघायला मिळतात. काही लोक आपल्या पाळीव प्राण्यांचा सुद्धा विमा उतरवतात.
विमा घेण्याचे फायदे (Benefits of having insurance)
मित्रांनो, वरील सर्व माहितीवरून तुम्हाला समजले असेलच की विमा म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्या आयुष्यासाठी किती फायदेशीर आहे. विमा काढण्याचे काही महत्त्वाचे फायदे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील.
1) आर्थिक संरक्षण
मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की हल्ली धावपळीच्या युगामध्ये व्यक्तीवर कोणते संकट कोणत्या वेळी येईल हे सांगू शकत नाही. अपघात, आजारपण, आकस्मित मृत्यू, चोरी अशा प्रकारच्या अनेक वाईट घटनांचा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये सामना करावा लागतो. अशा गरजेच्या वेळी आपल्याला आर्थिक संरक्षण पुरवण्याचं काम ‘विमा’ करतो. जर आपला अपघात झाला, आजारपण किंवा विमाधारकाचा मृत्यू झाला तर संबंधित कुटुंबाला आर्थिक भरपाई विमा कंपनीकडून दिली जाते.
2) जीवनातील शांतता
मित्रांनो, विमा हा तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाचे काय होईल, गंभीर आजारपणाच्या वेळी काय होईल किंवा एखाद्या जीव घेण्या अपघाता वेळी उद्भवणारे आर्थिक प्रश्न यांपासून चिंतामुक्त करतो आणि तुम्हाला शांतता प्रदान करतो. कारण तुम्ही जेव्हा विमा काढता तेव्हा तुम्हाला हे माहीत असते की तुमच्या पश्चात हे तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत ही त्या विमा कंपनीकडून मिळणार आहे.
3) कर लाभ
मित्रांनो, विमा काढल्यानंतर तुम्हाला करातून सूट सुद्धा मिळू शकते. विम्याचे हप्ते हे करपात्र असू शकतात मात्र विमा पासून मिळणारा जो लाभ आहे तो करमुक्त असू शकतो.
4) गुंतवणुकीचा पर्याय
काही काही कंपन्यांकडून विमाधारकांना विमा योजना बरोबरच गुंतवणुकीसाठी सुद्धा पर्याय उपलब्ध करून दिले जातात, ज्याचा फायदा विमाधारकांना गुंतवणुकीच्या चढउताराप्रमाणे अधिक लाभ मिळण्यामध्ये होतो.
हे पण वाचा👉
तुम्हाला जर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर शेअर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती येथे वाचा.
SIP बद्दल संपूर्ण माहिती येथे वाचा.
विमा योजना निवडणे (Choosing an insurance plan)
विमा ही आपल्या जीवनासाठी आवश्यक गोष्ट असली तरीही विमा योजना निवडताना आपण काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत आणि काही गोष्टींची काळजी सुद्धा घेतली पाहिजे,. यामध्ये आपल्याला पुढील गोष्टी सांगता येतील.
1) आपल्या गरजा ओळखा
विमा योजना निवडताना आपल्या नेमक्या गरजा काय आहेत हे ओळखणे खूप गरजेचे आहे. आपल्याला नेमका कोणत्या गोष्टीसाठी विमा हवा आहे उदाहरणार्थ आयुर्विमा, अपघात विमा, वाहन विमा किंवा आरोग्य विमा याचा आपण विचार करायला हवा. आपल्या वयानुसार, आरोग्य आणि शारीरिक परिस्थितीनुसार तसेच आर्थिक स्थिती नुसार आपल्याला अनुरूप होईल अशी विमा योजना आपल्याला निवडणे हितकारक होईल.
2) बजेट
कोणतीही विमा योजना निवडताना आधी आपला बजेट किती आहे, आपण किती रुपयापर्यंत विमा हप्ता भरू शकतो याचा अंदाज घेणे गरजेचे आहे. आपल्या बजेटनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजना आपल्यासाठी उपलब्ध आहेत.
3) विविध विमा योजनांची तुलना करा
हल्ली बाजारात अनेक कंपन्या विविध प्रकारच्या विमा योजना ग्राहकांसाठी ऑफर करत असतात. त्या विमा योजनांचे लाभ, विमा प्रीमियम किंवा विमा कव्हरेज आणि इतर फायदे या सर्वांची आपण तुलना करून आपल्यासाठी आणि आपल्या बजेटला अनुरूप अशी विमा योजना निवडणे आवश्यक आहे.
4) विमा कंपनीची विश्वासार्हता
विमा योजना निवडण्यापूर्वी संबंधित विमा कंपनीची विश्वासार्हता, त्यांची ग्राहक सेवा यंत्रणा, किंवा त्यांची दावा निवारण यंत्रणा किती सक्षम आहे तसेच पूर्वीच्या ग्राहकांच्या अनुभवाचे अवलोकन करून आपण योग्य कंपनीचा विमा निवडणे आपल्या फायद्याचे ठरेल.
5) विम्याच्या अटी आणि शर्ती
विमा योजना निवडताना त्या संबंधित विम्याच्या अटी आणि शर्ती नीट बारकाईने वाचून घेणे आवश्यक आहे. आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये विमा लाभ मिळेल, त्याला अपवाद कोणत्या असतील, किंवा दावा निवारण प्रक्रिया कशा प्रकारे असेल या सर्व गोष्टींची बारकाईने माहिती करून घेणे आवश्यक आहे.
6) विमा सल्लागाराचा सल्ला घ्या
आपल्याला जर कोणते विमा योजना निवडावे याबद्दल संभ्रम असेल किंवा आपल्याकडे योग्य माहिती नसेल तर एखाद्या चांगल्या विमा सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तो विमा सल्लागार आपल्याला आपल्या बजेटनुसार आणि गरजेनुसार योग्य विमा योजना सुचवू शकतो.
विमा दाखल करणे
विमा योजना घेतल्यानंतर जेव्हा आपल्याला विमा चा दावा दाखल करण्याची वेळ येते तेव्हा विमा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सोपी असून आपल्याला संबंधित कंपनीशी संपर्क साधून त्यांना योग्य ती कागदपत्रे द्यावी लागतात. विमानाचा दावा दाखल करताना आपण पुढील स्टेप्स फॉलो करू शकतो.
✅विमा कंपनीला संपर्क करा
सगळ्यात आधी विमा दाखल करताना आपण संबंधित कंपनीला संपर्क करणे आवश्यक आहे. आपण त्या कंपनीला फोन, ई-मेल किंवा संबंधित कंपनीच्या वेबसाईटवरून त्या कंपनीशी संपर्क करू शकतो.
✅फॉर्म भरा
विम्याचा दावा दाखल करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून तुम्हाला दिलेला फॉर्म व्यवस्थित भरून घ्या. त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, विमा पॉलिसीची माहिती तसेच दावा दाखल करण्याचे कारण इत्यादी संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल.
✅आवश्यक कागदपत्रे जमा करा
विम्याचा दावा दाखल करताना आवश्यक कागदपत्रे सुद्धा संबंधित कंपनीकडे आपल्याला जमा करणे आवश्यक आहे. यामध्ये विमा पॉलिसी, वैद्यकीय अहवाल, अपघात झाला असेल तर पोलिसांचा अहवाल, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि इतर कंपनीने मागणी केलेली कागदपत्रे यांचा समावेश असू शकतो.
✅ कंपनीच्या दावा प्रक्रियेचे अनुसरण करा
तुम्ही प्रक्रियेनुसार दावा दाखल केल्यानंतर संबंधित कंपनी तुमचा दावा मंजूर करण्याचा निर्णय घेईल. याबरोबरच कंपनीच्या प्रक्रियेनुसार आवश्यक असणारी इतरत्र माहिती सुद्धा कंपनीला द्या.
आपल्याला विमा चा दावा दाखल करण्यासंबंधी काही माहिती किंवा अडचणी आल्यास आपण विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) च्या वेबसाईटला भेट देऊ शकतो. ही संस्था भारतातील विमा क्षेत्राचे पर्यवेक्षण व विकास यासाठी संसदेच्या कायद्याने बनवण्यात आलेली आहे. सर्व विमा क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम ही संस्था करते.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
विमा म्हणजे काय आणि त्यांचे महत्व?
विमा म्हणजे एक प्रकारे आपल्या कंपनीसोबत करार असतो की ज्यामध्ये आपण एक ठराविक रक्कम नियमितपणे त्या कंपनीला देत असतो आणि त्या बदल्यात आपल्या संकटाच्या वेळी किंवा अडचणीच्या वेळी ती कंपनी आपल्याला आर्थिक भरपाई देते.
विम्याचे किती प्रकार आहेत?
तसे पाहिले तर विम्याचे खूप सारे प्रकार आहेत. यात प्रामुख्याने आयुर्विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, अपघात विमा यांसारख्या विमा प्रकारांचा समावेश होतो.
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
टर्म लाइफ इन्शुरन्स हा एक मूलभूत आणि महत्त्वाचा आयुर्विमा आहे. ज्यामध्ये एका विशिष्ट कालावधी साठी तुम्हाला आर्थिक संरक्षण प्राप्त होते. त्या विशिष्ट कालावधीमध्ये जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यावेळी विमा कंपनीकडून त्या कुटुंबाला मृत्यू लाभ म्हणजेच आर्थिक भरपाई मिळते.
निष्कर्ष : Insurance in marathi
मित्रांनो, विमा हा आपल्या जीवनामध्ये संकटाच्या वेळी आणि गरजेच्या वेळी आपल्याला आर्थिक संरक्षण पुरविण्याच महत्वाचं काम करत असतो. आजच्या या ब्लॉग मध्ये आम्ही विमयांबद्द संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे. तुम्ही सुद्धा विमा काढण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला विम्या संबंधी काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असे तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद!!👏
Related :
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024