GDP meaning in Marathi : मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण बातम्यांमध्ये ऐकत असतो कि भारताचा GDP स्थिर राहिला, एखाद्या देशाच्या पुढे गेला , GDP मध्ये वाढ झाली किंवा घट झाली. GDP (Gross Domestic Product) म्हणजे सकाळ देशांतर्गत उत्पादन हा कोणत्याही देशाची आर्थिक स्थिति आणि अर्थव्यवस्थेची प्रगती समजण्याचे महत्वाचे साधन आहे. हा GDP म्हणजे नेमक काय असतो? तो कसं मोजला जातो? GDP कहर प्रकार कोणते असतात या विषयी संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
जीडीपी म्हणजे काय? | GDP Information in Marathi
उदाहरणार्थ एखादा ठराविक वर्षात त्या देशांमध्ये तयार होणाऱ्या चपला, शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य, किंवा डॉक्टर, वकील यांनी पुरवलेल्या सेवा या सर्वांच्या विक्री मूल्याची एकूण बेरीज म्हणजेच जी.डी.पी किंवा सकल राष्ट्रीय उत्पादन होय.
उदाहरणार्थ, 2023 या वर्षांमध्ये भारताचा GDP जर 200 लाख कोटी असेल तर याचा अर्थ असा आहे की 2023 या वर्षात भारत या देशांमध्ये एकूण 200 लाख कोटी इत्यादी किंमतीच्या वस्तू व सेवांची निर्मिती किंवा उत्पादन झाले.
GDP – ग्रॉस डोमस्टिक प्रॉडक्ट हे कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती मोजण्याचे साधन आहे. GDP मध्ये वाढ झाली यांचा अर्थ त्य देशाच्या अर्थ व्यवस्थेची प्रगती झाली आणि देशातील नागरिकांच्या उत्पन्नात वाढ झाली. तसेच GDP मध्ये घट झाली यांचा अर्थ त्य देशाची अर्थव्यवस्था मंदावत आहे आणि देशातील नागरिकांना कमी उत्पन्न मिळत आहे.
भारत देशात वर्षातून दर तीन महिन्यांनी GDP – ग्रॉस डोमस्टिक प्रॉडक्ट मोजले जाते. म्हणजेच वर्षातून 4 वेळा देशातील वस्तु व सेवा यांच्या उत्पादनाचे मोजमाप करून सकल राष्ट्रीय उत्पादनाचा मागोवा घेतला जाते.
कृषी, सेवा, उद्योग या क्षेत्रातील प्रगतीचा वापर करून सकल राष्ट्रीय उत्पादन मोजले जाते. या तीन क्षेत्रांबरोबरच आता यामध्ये सरकारने बँकिंग, शिक्षण, संगणक, आरोग्य या क्षेत्रांचा सुद्धा समावेश केला आहे.
म्युच्युअल फंड बाबत संपूर्ण माहिती येथे वाचा.
SIP म्हणजे काय यांची संपूर्ण माहिती येथे वाचा.
GDP चे प्रकार | Types Of GDP In Marathi
मित्रांनो, आता तुम्हाला GDP म्हणजे नेमकं काय हे नीटपणे समजले असेल. आता आपण जीडीपी चे प्रकार कोणते कोणते असतात याबद्दल माहिती घेऊया.
1) वास्तविक GDP – Real Gross Domestic Product
वास्तविक जीडीपी किंवा वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन मोजताना एखाद्या आधार वर्षातील वस्तू आणि सेवांच्या बाजार किमती चा विचार केला जातो. देशाच्या अर्थव्यवस्थेचा अचूक अंदाज येण्यासाठी वास्तविक जीडीपी हा महत्त्वाचा घटक आहे.
2) नाममात्र GDP – Nominal Gross Domestic Product
नाममात्र GDP किंवा नाममात्र सकल राष्ट्रीय उत्पादन काढताना वस्तू आणि सेवांच्या चालू वर्षातील बाजार किमतींचा विचार केला जातो, आणि त्या आधारे GDP मोजला जातो. या प्रकारात अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे नाममात्र मोजमाप केले जाते.
3) दरडोई GDP
या प्रकारामध्ये जीडीपीचे विभाजन देशातील लोकसंख्येनुसार केले जाते. दरडोई GDP ने देशातील सरासरी आर्थिक उत्पादन क्षमतेचे मोजमाप करता येते.
4) GDP वाढीचा दर
जीडीपी वाढीचा दर हा एका वर्षात जीडीपीच्या टक्केवारी मध्ये झालेला बदल दाखवतो. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत च्या वाढीची गती मोजली जाते.
GDP कसा मोजला जातो | How GDP Calculated
GDP म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन मोजण्याच्या तीन महत्त्वाच्या पद्धती आहेत आणि त्यांचे वेगवेगळ्या सूत्र सुद्धा आहेत.
1. उत्पादन पद्धत :
या पद्धतीमध्ये जीडीपी चे सूत्र पुढीलप्रमाणे आहे
GDP (Gross Domestic Product) = C + I + G + NX
- C – Consumption : वस्तू व सेवांवरील खर्च
- I – Investment : एकूण गुंतवणूक
- G – Government Expenses : सरकारी खर्च
- NX – Net Export : निव्वळ निर्यात (निर्यात – आयात)
2. व्यय पद्धत
GDP (Gross Domestic Product) = C + G + I + (X – M)
- C – Consumption : वस्तू व सेवांवरील खर्च
- G – Government Expenses : सरकारी खर्च
- I – Investment : एकूण गुंतवणूक
- X – Export : निर्यात
- M – Import : आयात
3. उत्पन्न पद्धत
GDP (Gross Domestic Product) = W + R + π + T
- W : कर्मचाऱ्यांवरील पगार आणि वेतनाचा खर्च
- R : भाडे आणि व्याज
- π : उद्योगांचा नफा
- T – Tax : जमा झालेला कर
हे वरील तीनही सूत्र जवळजवळ सारखेच असून ते आपण सोप्या भाषेमध्ये पुढील प्रमाणे मांडू शकतो
GDP (सकल देशांतर्गत उत्पादन)= उपभोग्य वस्तू किंवा सेवांवरील खर्च + गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात – आयात)
अशा प्रकारे वरील सूत्रानुसार सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP मोजला जातो.
2023 मधील भारताचा GDP | Indian GDP in 2023
भारतामध्ये GDP (सकल राष्ट्रीय उत्पादन) हे अनेक प्रकारे मोजले जाते.
नाममात्र GDP :
2023 या वर्षामध्ये भारत देशाचा नाममात्र GDP – सखल राष्ट्रीय उत्पादन हे $3.5 ट्रिलियन म्हणजेच भारतीय चलनामध्ये 263 लाख कोटी इतका होता.
नाममात्र GDP नुसार भारताचा संपूर्ण जगामध्ये पाचवा क्रमांक लागतो.
वास्तविक GDP :
2023 या वर्षामध्ये भारत देशाचा वास्तविक जीडीपी हा $3.1 ट्रिलियन म्हणजेच भारतीय चलनामध्ये 234 लाख कोटी इतका होता, तर या वास्तविक GDP च्या वाढीचा दर 7.2% इतका होता.
दरडोई GDP :
2023 या वर्षांमध्ये भारत देशाचा दरडोई GDP (सकल राष्ट्रीय उत्पादन) हा $2,500 म्हणजेच भारतीय चलनामध्ये 1.9 लाख रुपये इतका होता, आणि यानुसार भारताचा जगामध्ये 128 वा क्रमांक लागतो.
2023 मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा दर हा 7.2% होता. आणि या वाढी बरोबरच भारत हा जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.
GDP चे फायदे | Benefits of GDP in Marathi
मित्रांनो, आता वरील संपूर्ण माहितीवरून तुम्हाला नेमका GDP म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आहेत तसेच जीडीपी मोजण्याच्या पद्धती कोणता आहेत याबद्दल पुरेशी माहिती मिळाली असेल. परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की या जीडीपी मोजण्याचा नेमका फायदा काय? तर मित्रांनो जी डी पी मोजण्याचे खूप फायदे आहेत ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील.
जीडीपीमुळे आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेची नेमकी स्थिती समजते. म्हणजे आपली अर्थव्यवस्था चांगली काम करत आहे की नाही, किंवा आपले अर्थव्यवस्थेचा दर वाढतोय की मंदावतोय याबद्दल आपल्याला कल्पना मिळते.
जीडीपीमुळे आपण आपल्या देशाची इतर देशांच्या अर्थव्यवस्थेबरोबर तुलना करून आपल्या देशाची इतर देशांच्या तुलनेत नेमकी स्थिती माहिती करून घेऊ शकतो.
आपल्या अर्थव्यवस्थेची नेमकी स्थिती लक्षात आले की त्या आधारावर शासनाला आपले धोरण ठरवणे सोपे जाते. जीडीपी मोजल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये संभाव्य मंदी चे संकट ओळखता येऊन त्यावर ताबडतोब उपाय करणे शक्य होते.
अशा प्रकारे जीडीपी मोजल्यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती समजते. आपला देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय की अधोगतीच्या याचा अंदाज आपल्याला जीडीपी वरून येऊ शकतो.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
GDP म्हणजे काय ?
GDP म्हणजेच ग्रॉस डोमस्टिक प्रॉडक्ट (Gross Domestic Product) म्हणजेच मराठी मध्ये सकल देशांतर्गत उत्पादन होय. एका विशिष्ठ कालावाढीत (साधारणतः एका वर्षामध्ये) देशामध्ये उत्पादित झालेल्या सर्व वस्तु व सेवांचे मूल्य म्हणजेच GDP – सकल देशांतर्गत उत्पादन होय.
GDP चे प्रकार कोणते ?
नाममात्र GDP, वास्तविक GDP व दरडोई GDP हे GDP चे प्रकार आहेत.
भारताचा GDP कसा मोजला जातो?
GDP (सकल देशांतर्गत उत्पादन)= उपभोग्य वस्तू किंवा सेवांवरील खर्च + गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात – आयात) या सूत्राने GDP मोजला जातो.
निष्कर्ष : gdp meaning in marathi
मित्रांनो, आपण बघितले कि GDP म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन हे संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा असतो. एखाद्या देशाची अर्थव्यवस्था पुढे जात आहेत कि मंदावत आहे हे आपल्याला GDP वरुण दिसून येते. तसेच GDP वरुन इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाची नेमकी स्थिती आपल्याला समजते. तसेच देशाच्या प्रगतीचे दृष्टीने शासकीय धोरण ठरविण्यासाठी GDP आकडेवारीचा खूप उपयोग होतो. आज आपण या लेखामध्ये GDP बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. GDP बद्दल तुम्हाला आणखी काही माहिती जाणून घ्यायची इच्छा असेल किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि हा लेख तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका! अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी आपल्या रिकामा खिसा या वेबसाइटला नेहमी भेट देत रहा !
धन्यवाद !!
Related :
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024