bmc recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध खात्यांमध्ये “कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नाव – लिपिक)” या पदाच्या तब्बल 1846 जागांसाठी भरती होत आहे. सदर पदांची संपूर्ण जाहिरात https://portal.mcgm.gov.in/for prospects/Careers-All/Recruitment/Chief Personnel Officer या लिंक वर उपलब्ध आहे. या भरती साठी उमेदवारांना 20-08-2024 ते 09-09-2024 या तारखेदरम्यान ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. या पदावर निवड झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्याला 25,000-81,100 रु. इतका पगार असणार आहे. फॉर्म भरातांना काही अडचण आल्यास उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी 9513253233 हा फोन नंबर महापालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक (आधीचे नाव – लिपिक)
एकूण पदसंख्या : 1846
पगार (वेतनस्तर) – स्तर-M15-रु.25000 – 81,100 (BMC Recruitment 2024 Clerk salary)
गट – क
हे पण वाचा : पालघर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक पदाच्या 1891 जागांसाठी भरती | Palghar ZP Bharati 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता | मुंबई महानगरपालिका भरती 2024
1) 10 वी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पहिल्या प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण
2) 10 वी परीक्षा 100 गुणांचे मराठी व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक.
3) इंग्रजी व मराठी टायपिंग (30 श. प्र . मि) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
4) MS-CIT किंवा संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक. (सेवेत लागल्यानंतर 2 वर्षांच्या आत प्रमाणपत्र द्यावे लागेल.)
5) सांगणकातील ऑपरेटिंग सिस्टिम,वर्ड प्रोसेसिंग,स्प्रेडशिट, प्रेझेंटेशन,डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल व इंटरनेट विषयी उत्तम ज्ञान असणे आवश्यक.
वयोमार्यादा
आराखीव ( खुला प्रवर्ग) – किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्ष
मागास वर्ग – किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष
www.mcgm.gov.in recruitment 2024
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू झाल्याची तारीख 20-08-2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09-09-2024 (11.59.59 वा.)
ऑनलाइन परीक्षा शुल्क
अराखीव (खुला) प्रवर्ग – रु.1000/- व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.900/- इतके परीक्षा फि असणार आहे.
BMC Recruitment 2024 Clerk
बृहन्मुंबई महानगरपालिका माहिती pdf
सदर भरतीची संपूर्ण जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज कुठे कराल ? | bmc recruitment 2024 apply online
सदर भरतीसाथी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी पुढील Apply Online या पर्यायांवर क्लिक करा.
मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक पद भरातीबाबत महत्वाची माहिती
सदर पदभरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. ऑनलाइन अर्ज भरतांना उमेदवारांकडे स्वतःचा चालू स्थितील वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
सदर पद भरती ही संगणकीय बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षे मार्फत होणार असून सदर परिक्षेमधील गुणांच्या मेरिट नुसार व विहित सामाजिक/समांतर आरक्षणा नुसार निवड यादी लावण्यात येणार आहे.
अनेक सत्रा मध्ये परीक्षा घेतली तर सामान्यीकरण पद्धत (Normalisation) वापरण्यात येणार आहे.
Note : मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या Instagram, Facebook, आणि फेसबूक वरील @rikama_khisa पेज ला फॉलो करा.
हे पण वाचा :
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024