adivasi vikas vibhag bharti 2024 | adivasi vikas vibhag bharti 2024 | https //tribal.maharashtra.gov.in recruitment | आदिवासी विकास विभाग भरती 2024 | adivasi vikas vibhag vacancy 2024
मित्रांनो, सर्व सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना एक आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 611 जागांसाठी भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे. यामध्ये आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक व त्यांच्या अंतर्गत अप्पर आयुक्त, कार्यालय नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर यांच्या आस्थापनेवरील वर्ग-3 संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक/संशोधन सहाय्यक/उपलेखापाल-मुख्य लिपिक-सांख्यिकी सहाय्यक(वरिष्ठ)/आदिवासी विकास निरीक्षक(नॉन पेसा)/वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी/लघुटंख लेखक/गृहपाल-स्त्री/गृहपाल-पुरुष/अधीक्षक स्त्री/अधीक्षक पुरुष/ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल/प्रयोगशाळा सहाय्यक/कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक इत्यादी सरळ सेवेची पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 12. 10. 2024 पासून लिंक उपलब्ध होणार आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरच आपला अर्ज भरून घ्या. या भरतीसाठी कोणती पात्रता लागणार आहे तसेच परीक्षा फी, आवश्यक कागदपत्रे, वयाची मर्यादा या सर्वांची माहिती खाली दिली आहे.
adivasi vikas vibhag bharti 2024 पदांचा तपशील
पदाचे नाव | नाशिक | नागपूर | अमरावती | ठाणे |
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | 7 | 4 | 4 | 3 |
संशोधन सहाय्यक | 4 | 3 | 5 | 7 |
उपलेखापाल-मुख्य लिपिक | 16 | 10 | 8 | |
आदिवासी विकास निरीक्षक | 1 | |||
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | 61 | 44 | 43 | 57 |
लघुटंखलेखक | 3 | 4 | 3 | |
गृहपाल(पुरुष) | 14 | 19 | 13 | 16 |
गृहपाल(स्त्री) | 10 | 6 | 8 | 5 |
अधीक्षक(पुरुष) | 9 | 4 | 16 | |
अधीक्षक(स्त्री) | 17 | 8 | 3 | 27 |
ग्रंथपाल | 24 | 1 | 15 | |
प्रयोगशाळा सहाय्यक | 12 | 5 | 13 | |
उपलेखापाल/मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक(वरिष्ठ) | 3 | 12 | ||
कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर | 1 | |||
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | 24 | 21 | ||
सहाय्यक ग्रंथपाल | 10 | |||
उच्च श्रेणी लघुलेखक | 3 | – | – | – |
निम्न श्रेणी लघुलेखक | 14 | – | – | – |
एकूण | 611 |
adivasi vikas vibhag bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता
1. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक : मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण शास्त्र पदवी. संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणे आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
2. संशोधन सहाय्यक : मान्यता प्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
3. उपलेखापाल-मुख्य लिपिक : , मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
4. आदिवासी विकास निरीक्षक : मान्यता प्राप्त विद्यापीठाचे जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदवी उत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
5. वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक : मान्यता प्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील.
6. लघु टंकलेखक : ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट, या अरहतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल.(महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडे प्रमाणपत्र)
7. अधीक्षक(पुरुष) : मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार.
8. अधिक्षक(स्त्री) : मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा.
9. गृहपाल(पुरुष) : मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार.
10. गृहपाल(स्त्री) : समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार.
11. ग्रंथपाल : यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यता प्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतु ग्रंथालय शास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील.
12. सहाय्यक ग्रंथपाल : यांनी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.
13. प्रयोगशाळा सहाय्यक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.(10 पास)
14. कॅमेरा मन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर : यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे, जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासनमान्य संस्थेतील फोटोग्राफी, प्रिंटिंग, एन लार्जिंग आणि त्याच्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडिओ विज्युअल मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतका अनुभव औद्योगिक प्रशिक्षक संस्था/शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे.
15. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही विद्या शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा याबाबतीत शासनाने तिच्याशी समतोल्य असल्याचे घोषित केलेली अन्य कोणतीही अरहता असलेले.
16. उच्च श्रेणी लघुलेखक : 1) शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस एस सी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम 2) a) उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी) – शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी लपुलेखन परीक्षा उत्तीर्ण b) उच्च श्रेणी लघुलेखक(मराठी) – शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे 120 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. वरील क्रमांक 2) मधील a व b करिता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रतिमिनिट असल्यास प्राधान्य). 3) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रति मिनिट. 4) टंकलेखन(मराठी) 30 शब्द प्रतिमिनिट. 5) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक परीक्षा वा समक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 6) सदर पदासाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल.
17. निम्न श्रेणी लघुलेखक : 1) शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस एस सी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम 2) a) उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी) – शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी लपुलेखन परीक्षा उत्तीर्ण b) उच्च श्रेणी लघुलेखक(मराठी) – शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे 100 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. वरील क्रमांक 2) मधील a व b करिता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 100 शब्द प्रतिमिनिट असल्यास प्राधान्य). 3) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रति मिनिट. 4) टंकलेखन(मराठी) 30 शब्द प्रतिमिनिट. 5) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक परीक्षा वा समक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 6) सदर पदासाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल.
Adivasi vikas vibhag भरती 2024 साठी वयोमर्यादा
आदिवासी विकास विभाग भरतीसाठी वयोमर्यादा 29 सप्टेंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
Adivasi vikas vibhag भरती 2024 साठी भरती प्रक्रिया
भरती प्रक्रिया हि online असून IBPS मार्फत परीक्षा घेण्यात येईल.
Adivasi vikas vibhag भरती 2024 साठी परीक्षा फी
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये फी असून ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसटी, ट्रान्सजेंडर, पूर्व सैनिक महिलांसाठी 900 रुपये इतकी परीक्षा फी असणार आहे. . अर्ज शुल्क भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
(GEN/OBC/EWS) : 1000/-
(SC/ST/PWD/ESM) : 900/-
आदिवासी विभागाची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
adivasi vikas vibhag bharti 2024 apply online
online अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.
adivasi vikas vibhag bharti 2024 pdf
आदिवासी विकास विभाग भरतीची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी जाहिरात पहा. आदिवासी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर संपूर्ण जाहिरात दिलेली आहे.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
You may also like :
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024