Best courses in India after 12th : मित्रांनो, आत्ताच 10 वी 12 वी च्या परीक्षा पार पडलेल्या आहेत. सर्वांना आता रिझल्ट ची प्रतीक्षा असेल. आपल्याला किती गुण मिळतील यांची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते. कारण या गुणांवरच पुढे आपल्याला आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळेल कि नाही हे अवलंबून असते. काही जणांनी आपल्याला 12 वी नंतर नेमक काय करायच हे ठरवलेल असतं, परंतु बऱ्याच जणांना Best courses in India after 12th याबद्दल निश्चित काही माहिती नसते. त्यामुळे मग माहिती अभावी योग्य वेळी योग्य निर्णय घेता येत नाही. यामुळे पुढे जाऊन करियर च्या बाबतीत आपण मागे पडतो. म्हणून आज आपण Best courses in India after 12th बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.
भारतातील सर्वोत्कृष्ठ कोर्सेस | Best courses in India after 12th
अभियांत्रिकी | Engineering
जर तुम्हाला इंजिनियर व्हायची इच्छा असेल तर तुम्ही 12 वी नंतर प्रवेश परीक्षा देवून इंजिनियनरिंग साठी प्रवेश घेऊ शकता. इंजिनियर्स ना समाजात एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त आहे. विज्ञान आणि गणित यांचा वापर करून वास्तविक जगातील विविध समस्या सोडविणे यांचा समावेश इंजिनियरिंग मध्ये होत असतो. इंजिनियरिंग चे प्रामुख्याने चार प्रकार आहेत.
UPI म्हणजे काय ? | What is UPI in Marathi फेसबुक वर पैसे कसे कमवायचे | Earn money from Facebook in Marathi
रसायन अभियांत्रिकी ( Chemical Engineering )
यामध्ये तुम्हाला विविध रसायने (Chemicals ), विविध रासायनिक प्रक्रिया यांचा अभ्यास करावा लागतो. खते,रंग,तेल,औषधे,प्लॅस्टिक,इत्यादींसारख्या अनेक उद्योगांमध्ये केमिकल इंजिनियर्स ना खूप मागणी असते.
स्थापत्य अभियांत्रिकी ( Civil Engineering )
रस्ते बांधणे,पूल बांधणे ,विविध इमारती,धरणे व कालवे यांची बांधणी व देखभाल,विविध बांधकामांच्या डिझाईन्स बनवणे, सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थापन प्रणाली डिझाईन व देखभाल यांसारखी अनेक कामे सिव्हिल इंजिनियर्स ना करावी लागतात.
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी | Electrical Engineering
इलेक्ट्रिक उपकरणे, इलेक्ट्रिक सिस्टीम यांचे डिझाईन करणे त्यांचा विकास करणे, तसेच इलेक्ट्रिक सिस्टीम चाचण्या घेणे इत्यादी प्रकारचे कामेही इलेक्ट्रिकल इंजिनिअरची आहेत. विद्युत क्षेत्रामध्ये सुद्धा विद्युत निर्मिती, विद्युत वहन सिस्टीम यांची डिझाईन करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअर ची आवश्यकता भासते.
यांत्रिक अभियांत्रिकी ( Mechanical Engineering )
मेकॅनिकल इंजिनियर्स हे विविध मशीन शी संबंधित कामे करत असतात. विविध यांत्रिक उपकरण डिझाईन, निर्मिती, देखभाल करणे यांचा समावेश मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये होतो. विविध मशीनचे इंजिन, औद्योगिक रोबोट, तसेच विमान यांसारख्या गोष्टी डिझाईन करण्याचे काम मेकॅनिकल इंजिनियर्स करतात.
संगणक अभियांत्रिकी | Computer Engineering
सध्याच्या जगामध्ये खूप मागणी असलेले हे क्षेत्र आहे. कॉम्प्युटर्स डिझाईन करणे त्यांची देखभाल करणे, सॉफ्टवेअर अप्लिकेशन्स बनवणे, वेब अप्लिकेशन्स बनवणे, मोबाईल ॲप्लिकेशन्स बनवणे तसेच इतर अनेक कॉम्प्युटर उपकरणे तसेच कॉम्प्युटर सिस्टिम्स डिझाईन करणे त्यांची देखभाल करणे अशा प्रकारची कामे कम्प्युटर इंजिनियर्स करत असतात. तुम्हाला जर कम्प्युटर क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगचा विचार करू शकता.
वैद्यकीय क्षेत्र | Medical
डॉक्टर हे आजही आपल्या समाजात एक मानाचे पद असते. विविध रोगांचे आणि आजारांचे निदान करून त्यावर उपचार करणे, तसेच रोगांचे प्रतिबंध व्हावे म्हणून उपाययोजना करणे इत्यादी कामे वैद्यकीय क्षेत्रात असतात. कामाबरोबरच समाजासाठी आणि लोकांसाठी काहीतरी केल्याचे समाधान आपल्याला या क्षेत्रात नक्की मिळते. यासाठी तुम्हाला बारावीनंतर पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) ही परीक्षा पास व्हावे लागते. NEET संपूर्ण देश पातळीवर घेण्यात आली परीक्षा असून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.
वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही डॉक्टर, सर्जन, शिक्षक, संशोधक तसेच वैद्यकीय व्यवस्थापक यांसारख्या अनेक पदांवर काम करू शकता.
औषधनिर्माण शास्त्र | Pharmacy
औषध निर्माण शास्त्र या क्षेत्रामध्ये विविध औषधांची निर्मिती, विकास तसेच चाचण्या यांचा अभ्यास केला जातो. विविध आजारांवर आणि रोगांवर औषधे तयार करणे, औषधांचे डोसेस तयार करणे अशा प्रकारचे कामे या क्षेत्रात येतात.
औषध निर्माण शास्त्र यामध्ये शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला इयत्ता बारावी गणित आणि विज्ञान विषयासह उत्तीर्ण व्हावे लागते. त्यानंतर बॅचलर इन फार्मसी (B.Pharm) तसेच मास्टर्स इन फार्मसी (M. Pharm) हे कोर्सेस तुम्ही करू शकता.
कृषी शास्त्र | Aggricultur science
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये कृषी उत्पादनांची खूप मागणी नेहमीच राहिलेले आहे. विविध कृषी उत्पादने, अन्नधान्य , फळे, भाज्या, फायबर इत्यादींचे उत्पादन तसेच व्यवस्थापन याचा अभ्यास कृषी क्षेत्रामध्ये केला जातो. यामध्ये व्यवसायाबरोबरच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तसेच कृषी शास्त्रातील पदवी घेतल्यानंतर तुम्ही शासकीय नोकरी सुद्धा करू शकता.
कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्ही 12 वी सायन्स उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. काही महाविद्यालय असे सुद्धा आहेत की जे बारावी कला किंवा कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश देतात. बारावीनंतर तुम्ही बीएससी एग्रीकल्चर (B. Sc Agri.) किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एग्रीकल्चर (B. Tech in Agriculture) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता.
संगणक विज्ञान | Computer Science
संगणक विज्ञान किंवा कम्प्युटर सायन्स या क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर्स आणि कम्प्युटर सॉफ्टवेअर यांचा अभ्यास केला जातो. तसेच त्यामध्ये कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, डेटा स्ट्रक्चर, प्रोग्रामिंग, ऑपरेटिंग सिस्टीम, कृत्रिम बुद्धिमत्ता /आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा समावेश होतो.
या क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी तुम्ही बारावी विज्ञान किंवा गणितामध्ये उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कम्प्युटर सायन्स B. Tech (CS) किंवा B. Sc (CS) सारखी पदवी घेऊ शकता. तसेच जर तुम्ही आर्ट्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड मधून असाल, तरी सुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रातील विविध कोर्सेस करून तुम्ही या क्षेत्रामध्ये यश मिळवू शकता.
संगणक क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टिंग, यूजर इंटरफेस डिझाईन यांसारख्या क्षेत्रात काम करू शकता.
व्यवसाय प्रशासन | Business Administration
यामध्ये विविध व्यवसायांची मूलभूत तत्वे, व्यवसाय कौशल्य, नेतृत्व कौशल्य तसेच व्यवसायामधील विविध समस्या सोडविणे इत्यादी कौशल्य शिकवले जातात. विविध उद्योगांमध्ये मॅनेजर, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स यांसारखे पर्याय करिअर म्हणून आपल्याला उपलब्ध होतात.
12 वी विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण केल्यानंतर तुम्ही BBA म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा MBA ( मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ) सारख्या पदव्या घेऊ शकता.
हॉटेल व्यवस्थापन | Hotel Management
हॉटेल इंडस्ट्री ही सध्या संपूर्ण जगामध्ये वाढत असलेले क्षेत्र आहे तसेच या क्षेत्रामध्ये करिअरच्या खूप सारे संधी उपलब्ध आहेत. विविध हॉटेलचे व्यवस्थापन, तेथील विविध ऑपरेशन या सगळ्याचा समावेश या अभ्यासक्रमात येतो. हॉटेल व्यवस्थापन मध्ये पदवी घेतलेले विद्यार्थी हॉटेल उद्योगात फ्रंट डेस्क ऑपरेशन, खाद्य आणि पेय, हाउसकीपिंग, सेल्स आणि मार्केटिंग, तसेच इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रात काम करतात.
या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी बारावी नंतर बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (BHM) किंवा ॲडव्हान्स डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट (AHM) यांसारख्या पदवी घेऊ शकतात.
मीडिया आणि पत्रकारिता | Mass Media and Journalism
मीडिया आणि पत्रकारिता या चित्रांमध्ये सुद्धा करिअरच्या खूप चांगल्या संधी उपलब्ध असतात. विविध वृत्तपत्रे, टेलिव्हिजन, रेडियो, तसेच इंटरनेट याद्वारे करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात. तुमच्या वक्तृत्व चांगला असेल किंवा तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकत असाल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य मिळू शकते. त्या क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही पत्रकार, निवेदक, संपादक, प्रसारक, कॅमेरा ऑपरेटर, साऊंड इंजिनिअर व्हिडिओ एडिटर अशा प्रकारचे अनेक कामे करू शकता.
या क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही बारावीनंतर बॅचलर इन मास मीडिया किंवा जर्नलिझम मधील पदवी घेऊ शकता.
फॅशन तंत्रज्ञान | Fashion Technology
फॅशन तंत्रज्ञान यामध्ये विविध संगणक आधारित डिझाईन (CAD), 3 D प्रिंटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करून फॅशन डिझाईन, उत्पादन, आणि विक्री मध्ये सुधारणा केली जाते.
तुम्हाला तर फॅशन आणि तंत्रज्ञान यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत त्यात फॅशन डिझाईन, उत्पादन, विक्री, तसेच मार्केटिंग सुद्धा समावेश आहे.
या क्षेत्रातील अधिक माहिती साठी पुढील वेबसाईट्स चा वापर करू शकता.
फॅशन टेक: https://www.tg3ds.com/blog/what-is-fashion-technology
द फॅशन टेक्नॉलॉजी लेब: https://www.facebook.com/xfashionlab/
फॅशन टेक मॅगझिन: https://www.theinterline.com/fashion-technology-news-from-the-interline/
निष्कर्ष :
Best courses in India after 12th मध्ये आपण काही लोकप्रिय कोर्सेस चा समावेश केलेल्या आहे. अजूनही खूप सारे चांगले पर्याय 12 वी नंतर उपलब्ध आहेत. आपण कोणत्याही अभ्यासक्रम निवडतांना आपला कल आणि आवड तसेच येणारा खर्च,उपलब्ध विद्यालय आणि तिथे मिळणाऱ्या सुविधा या सर्वांचा व्यवस्थित विचार करणे आवश्यक आहे. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांचीकपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचून त्यांना फायदा होईल.
धन्यवाद !!