शिक्षण क्षेत्र हे खूप जणांच्या आवडीचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात काम करण्या व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळत असतो,तसेच विद्यार्थ्यांच्या रूपात एक पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. या क्षेत्रात मिळणारा पगार सुद्धा खूप चांगला असून नवीन प्रयोग करण्याची संधी सुद्धा इथे उपलब्ध असते. तुम्ही जर शिक्षक होण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी D.El.Ed, B.El.Ed, D.Ed, B.Ed यांसारखे कोर्सेस उपलब्ध आहेत. या कोर्सेस नंतर आपल्याला खाजगी तसेच सरकारी शिक्षण संस्थामध्ये विविध संधी प्राप्त होतात. या Career in teacher training after 12th in Marathi बद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
D.El.Ed, B.El.Ed कोर्स
- जर तुम्हाला प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करायची इच्छा असेल तर D.El.Ed / B.El.Ed कोर्सेस उपलब्ध आहेत.
- कोर्स करण्यासाठी उमेदवार हा 12 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- D.El.Ed म्हणजेच डिप्लोमा इनएलिमेंटरी एज्युकेशन हा 2 वर्षाचा कोर्स आहे, तर B.El.Ed म्हणजेच Bachelar in Elementary Education हा 4 वर्षांचा कोर्स आहे.
- B.El.Ed साठी प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जातो.
हे पण वाचा : 12 वी नंतर या क्षेत्रात आहेत करियर च्या उत्तम संधी | Best courses in India after 12th
कोणत्या वर्गांसाठी शिकवण्यास पात्र असतात ?
D.El.Ed कोर्स केल्यावर आपण प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यास पात्र ठरतो. तसेच B.El.Ed कोर्स केल्यावर ६ ते १२ यां वयोगटासाठी शिकविण्यास पात्र ठरतो.
शिक्षण शास्त्र पदवी | B.Ed
B.Ed म्हणजेच शिक्षणशास्त्रातील पदवी हा अभ्यासक्रम पूर्वी 1 वर्षाचा , त्यानंतर या वर्षापर्यंत २ वर्षाचा आहे. परंतु या नंतर तो पदवी सह 4 वर्षांचा असणार आहे.
- तुम्हाला B.A B.Ed किंवा B.Sc.B.Ed असा पूर्ण 4 वर्षांचा कोर्स करावा लागेल.
- B.Ed या कोर्स च्या प्रवेशासाठी संपूर्ण देशभरात सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेतली जाते.
- या कोर्स मध्ये शिक्षणशास्त्र, माध्यमिक शिक्षण पद्धती, विषय शिक्षण यांसारखे विषय शिकवले जातात.
- B.A B.Ed किंवा B.Sc.B.Ed केल्यानंतर आपण माध्यमिक शाळेमध्ये म्हणजेच इयत्ता ६ ते १० पर्यंत शिकवण्यास पात्र ठरतो.
- हे कोर्सेस केल्यानंतर शिक्षक म्हणून काम करण्यासाठी CTET किंवा TET परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.
- त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्यात अनुदानिक किंवा सरकारी शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी करायची असल्यास शासनामार्फत पवित्र प्रणालीद्वारे घेण्यात येणारी TAIT परीक्षा द्यावी लागते आणि त्यातील मेरीट नुसार आपली निवड होते.
हे पण वाचा : UPI म्हणजे काय ? | What is UPI in Marathi
राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) / केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET)
B.Ed अभ्यास क्रम पूर्ण केल्यावर शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी आपल्याला TET किंवा CTET या शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
TET किंवा CTET या परीक्षांचे प्रत्येकी 2 पेपर असतात. प्राथमिक वर्गामध्ये (ई.1 ते 5 वी) शिक्षक म्हणून काम करण्यासाठी तुम्ही यातील पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण होणे आवश्यक असते तर उच्च प्राथमिक (ई.६ ते ८ वी) या वर्गांना शिकवण्यासाठी पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
इयत्ता 9 वी ते 12 पर्यन्त शिकवण्यासाठी TET किंवा CTET सडधय तरी आवश्यक नाही परंतु तिथे सुद्धा या परीक्षा लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.
पवित्र पोर्टल शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)
महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरती मध्ये पारदर्शकता यावी व गुणवत्ताधारक शिक्षक मुलांना मिळावेत या साठी पवित्र (PAVITRA) ही ऑनलाइन प्रणाली विकसित केलेली आहे. सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये शिक्षक भरती आता आता याच पवित्र प्रणालीमार्फत करण्यात येते. त्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाते आणि मेरिट नुसार शिक्षक भरती केली जाते.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देण्यासाठी आधी तुम्ही TET किंवा CTET या परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
थोडक्यात सरकारी किंवा अनुदानित शाळेवर शिक्षक म्हणून काम करण्यासाठी फक्त शिक्षण क्षेत्रातील पदवी घेणं पुरेस नाही तर त्यानंतर TET किंवा CTET या पात्रता परीक्षा पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण व त्यानंतर शिक्षक अभियोग्यता परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यानंतरच तुमची मेरिट नुसार शिक्षक म्हणून निवड व नियुक्ती होऊ शकते.
11 वी व 12 वी ला शिकवण्यासाठी काय पात्रता लागते ?
जर तुम्हाला ज्युनियर कॉलेज मध्ये 11 वी व 12 वी या वर्गांसाठी अध्यापन करायचे असेल तर संबंधित विषयात पदवयूत्तर पदवी व B. ED हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
शिक्षण क्षेत्रात करियर करण्याचे फायदे
- चांगला पगार आणि भत्ते यामुळे मिळणारी आर्थिक स्थिरता
- विद्यार्थ्यांच्या मनात संस्कार रुजवून चांगली पिढी घडविण्यात योगदान देण्याची संधी
- सतत काहीतरी नवीन शिकण्याची संधी
- समाजात मिळणारे सन्मानाचे स्थान
- विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची संधी
- सर्जनशीलता,कलात्मकता आणि कल्पनाशक्ती ला वाव
- विविध शिक्षण संस्थांमध्ये शिकवण्याची संधी. कामांमध्ये विविधता आणि नाविन्यता.
- विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिल्यानंतर त्यांच्याकडून मिळणारा आदर आणि त्यातून मिळणारे समाधान
- कामांमध्ये लवचिकता आणि निर्णय घेण्याचा अधिकार. मुलांना कोणत्या पद्धतीने शिकवायचा हा निर्णय शिक्षक घेऊ शकतो.
- पदोन्नतीने पुढे आणखी वरच्या पदावर काम करण्याची संधी.
शिक्षण क्षेत्रात करियर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये
आपल्याला माहीत आहे कि शिक्षक हे जारी मान सन्मानाचे पद असले तरी शिक्षकांवर खूप मोठी जबाबदारी सुद्धा असते. चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांमध्ये पुढील कौशल्ये फायद्याचे ठरते
- शिक्षक क्षेत्राची आवड व सतत नवीन शिकण्याची आवड
- आपल्या विषयाचे सखोल ज्ञान व त्या विषया तील अद्ययावत माहिती
- विद्यार्थ्यांबद्दल प्रेम व आपुलकी व विद्यार्थ्यांना समजून घेण्याची क्षमता
- चांगले संवाद कौशल्य
- वाचन व बहुश्रुतता हे गुण असल्यास अधिक चांगल्या व मनोरंजकपणे विषय मुलांपर्यंत पोचवता येतो.
- कला,खेळ यांची आवड असल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने खूप फायदा होतो
- चांगले व्यक्तिमत्व व विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याची क्षमता
अशाप्रकारचे गुण असल्यास शिक्षण क्षेत्र काम करताना आपल्याला खूप फायदा होतो व या क्षेत्रात आपण आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो.
शिक्षण क्षेत्रात उपलब्ध असणारी पदे
शिक्षण क्षेत्रात शिक्षक या पदाबरोबरच इतरही अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
शिक्षक : विविध शाळांवर किंवा महाविद्यालयांवर शिकवण्याचे काम करतात.
शिक्षणतज्ज्ञ : विविध शाळा कॉलेज व सरकारी संस्थानामध्ये अभ्यासक्रम विकास सुधारणा तसेच मूल्यांकन करण्याचे काम करतात.
समुपदेशक : विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार कोणते करियर निवडावे किंवा त्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करतात
प्राध्यापक : महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये अध्यापणाचे काम तसेच विद्यार्थ्यांना संशोधनात मदत करण्याचे काम करतात.
संशोधक : शिक्षण क्षेत्रात नवीन पद्धती आणि सिद्धांत विकसित करण्याचे काम करतात.
अभ्यासक्रम विकासतज्ज्ञ : अभ्यासक्रम विकसित करून अमलात आणण्याचे काम करतात.
शिक्षण तंत्रज्ञान तज्ज्ञ : शिक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा करण्याचे काम करतात.
ऑनलाइन शिक्षण विकासक : हल्ली ऑनलाइन शिक्षण घेण्याचा जमान आहे. बरेचसे अभ्यासक्रम हे ऑनलाइन शिकवले जातात. यासाठी ऑनलाइन शिक्षण विकासक काम करतात.
Career in teacher training after 12th in marathi
शिक्षण क्षेत्र हे सातत्याने सुरू आणि अत्यावश्यक तसेच सतत वाढणारे क्षेत्र असून यामध्ये नोकरीच्या खूप संधी उपलब्ध आहेत. आजकाल खूप साऱ्या खाजगी शैक्षणिक संस्था सुरू झाल्या असून इथे गुणवत्ता पूर्ण शिक्षकांची मागणी नेहमीच राहणार आहे. तसेच नोकरीव्यतिरिक्त हल्ली यूट्यूब सारख्या समाज माध्यमांवर सुद्धा अनेक शिक्षक विविध विषयांवर व्हिडिओ बनवून त्या माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोचवत आहेत आणि त्या माध्यमातून चांगले पैसे सुद्धा कमावत आहेत. ऑनलाइन शिक्षणात सुद्धा शिक्षकाना खूप मोठी संधी उपलब्ध हॉट आहे. एकूणच शिक्षण क्षेत्र हे खूप व्यापक क्षेत्र असून तिथे आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कौशल्यानुसार अनेक संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला आम्ही दिलेले ही माहिती काशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा व माहिती उपयुक्त वाटली असेल तर शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !!