Careere in shipping industry in marathi : मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलेला आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातील मुले या क्षेत्रातील नोकऱ्यांपासून वंचित राहिलेली आहेत. त्यांच्यापर्यंत पुरेशी माहिती वेळेवर पोचत नसल्याने त्यांना या क्षेत्रातील अनेक मोथया संधीपासून वंचित रहावं लागत आहे. आज आपण या क्षेत्रातील नोकऱ्यांसबंधी काही महत्वाची माहिती पाहणार आहोत, ही माहिती शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या इतर ही बांधवांपर्यंत पोचवा जेणेकरून महाराष्ट्रातील मुले Careere in shipping industry in marathi पासून वंचित राहिली नाही पाहिजेत.
Careere in shipping industry in marathi
तुम्हाला शिपिंग उद्योगांमध्ये नोकरी करायची असेल तर काही महत्वाची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. जहाजा मध्ये मूळ दोन विभाग असतात.
- डेक विभाग.
- इंजिनिअरिंग विभाग
या दोन्ही विभागांत काम करण्यासाठी अनेक ऑफिसर्स ची गरज असते आणि त्या सोबत विविध कामे करण्यासाठी संबंधित कौशल्ये असणारे कर्मचारी सुद्धा आवश्यक असतात. या दोन्ही विभागा बद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया..
- डेक विभाग

डेक विभाग हा जहाज चालविण्यासाठी प्रशिक्षित असलेल्या माणसांचा विभांग असतो. या विभागात विविध प्रकारचे अधिकारी काम करत असतात. या विभागाचा आणि संपूर्ण जहाजाचा सुद्धा प्रमुख कप्तान असतो.
डेक विभागात पुढील प्रकारचे अधिकारी पदे उपलब्ध असतात.
- कप्तान
- चीफ ऑफिसर
- सेकंड ऑफिसर
- थर्ड ऑफिसर
- शिकाऊ ऑफिसर
आता या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणती कामे करावी लागतात त्याबद्दल माहिती पाहूया.
जहाज चालवणे हे अत्यंत महत्वाचे काम या विभागाकडे आहे.
कंपनी आणि जहाजात ज्यांचे सामान आहे त्यांच्याशी सतत संपर्क ठेवणे.
जहाजातील जेवण, आरोग्य व्यवस्था व स्वच्छता सांभाळणे व आवश्यक त्या उपाययोजना करणे.
डेक व डेकवरील सर्व मशिनरी व्यवस्थित कार्यान्वित ठेवणे, तसेच त्यांची स्वच्छता तसेच त्या सुव्यवस्थितपणे चालत आहेत कि नाही हे पाहणे.
2. इंजिनियरिंग विभाग
हा विभाग जहाजाच्या ज्या यंत्रणा असतात आणि उपकरणे असतात त्यांची निगा राखणे तसेच आवश्यक तेव्हा त्यांची दुरुस्ती करणे अशी कामे करत असतो. या विभागाचा प्रमुख हा चीफ इंजिनियर असतो.
या विभागात कर्मचाऱ्यांची पुढील पदे उपलब्ध असतात.
- चीफ इंजिनियर
- सेकंड इंजिनियर
- थर्ड इंजिनियर
- शिकाऊ इंजिनियर
या विभागाचे आणखी महत्वाचे काम म्हणजे मशिनरी व्यवस्थापन आणि दुरुस्ती तसेच दुरुस्तीसाठी लागणारे स्पेअर पार्टस यांच्या नोंदी ठेवणे.
या विभागात आणखी एक महत्वाचे विशिष्ठ आणि वेगळे पद असते ते म्हणजे ईलेकट्रो टेक्नो ऑफिसर (ETO).
ETO हे पद इंजिनियनरिंग विभागाचा भाग असून जहाजातील ईलेक्ट्रॉनिक्स आणि विद्युत विभागाची संपूर्ण जबाबदारी या एकट्या ऑफिसर वर असते.
शिपिंग इंडस्ट्रि मध्ये नोकरी कशी मिळवायची ? | how to make career in shipping industry
कोणत्याही विभाग आणि कोणत्याही पदावर जाण्यासाठी काही कोर्सेस करणे महत्वाचे असते. त्य कोर्सेस ना Pre Sea Training (समुद्रपूर्व प्रशिक्षण) असे म्हटले जाते.
वरील विभागांमध्ये जाण्यासाठी काय शैक्षणिक पात्रता लागते ते पाहूया.
डेक ऑफिसर
डेक ऑफिसर हे पद मिळवण्यासाठी B. Sc Nautical हा तीन वर्षांचा कोर्स करावा लागतो. आणि त्यासाठी खालील शैक्षणिक पात्रता आवश्यक असते..
- 12 वी सायन्स (Maths विषय आवश्यक)
- वयोमार्यादा 25 वर्षे.
- चश्मा नसावा
- कोर्स कालावधी 3 वर्ष (हॉस्टेल निवास करणे आवश्यक)
- कोर्स ची फि एकूण 9-15 लाख पर्यन्त असते.
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मग एक वर्ष शिकाऊ म्हणून जहाजात ट्रेनिंग घेता येते. त्यानंतर मग सुरुवातीला थर्ड ऑफिसर व अनुभव व विभागीय परीक्षांच्या आधारे प्रमोशन मिळवत साधारण 10-13 वर्षांमध्ये कप्तान बनता येते.
इंजिनियर ऑफिसर
आता आपण इंजिनियर ऑफिसर बनण्यासाठी काय पात्रता लागते ते सुद्धा पाहूया.
यासाठी आपल्याला Btech Marine Engineering हा कोर्स पूर्ण करावा लागतो. आणि त्यासाठी पुढील पात्रता आवश्यक आहे.
- 12 वी सायन्स (फिजिक्स,केमिस्ट्री आणि मॅथ्स आवश्यक)
- वयोमार्यादा 25 वर्ष
- चश्मा असेल तरी चालतो
- कोर्स चा कालावधी 4 वर्ष (हॉस्टेल निवास आवश्यक)
- कोर्स ची फि अंदाजे 10 ये 15 लाख रुपये.
कोर्स पूर्ण झाल्यावर मग एक वर्ष शिकाऊ इंजिनियर म्हणून जहाजात शिक्षण आणि त्यानंतर फोर्थ इंजिनियर ऑफिसर आणि त्यानंतर अनुभव आणि विभागीय परीक्षा यांच्यामाध्यमातून प्रमोशन मिळवत 10-12 वर्षात चीफ इंजिनियर ऑफिसर बनता येते.
वरील दोनही विभागांमध्ये जाण्यासाठी 12 वी मध्ये PCM हे विषय असणे आवश्यक असते. दरवर्षी 12 वी चा निकाल जाहीर झाल्यानंतर काहीच दिवसांत IMU (इंडियन मेरिटाईम युनिव्हार्सिटी) मार्फत CET साठी जाहिरात प्रकाशीत केली जाते. ही CET परीक्षा दिल्यानंतर त्यातील मार्क्स नुसार आपल्या वरील कॉलेजांत प्रवेश मिळतो, त्यानंतर आपण हवा तो विभांग निवडायचा असतो.
हे जहाजी (Shipping) कॉलेजेस सध्या तरी फक्त मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत. उदा. पुणे,मुंबई,कोचीन,विषाखापट्टणम,कलकत्ता,मद्रास इ. याठिकाणी CET मधील मार्क्सनुसार आपल्याला प्रवेश दिला जातो. ही CET परीक्षा सहसा दरवर्षी जुलै मध्ये होते.
इलेकट्रो टेक्निकल ऑफिसर | How to become Electro-Technical Officer
Electro-Technical Officer हे पद मिळवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा अथवा पदवी असणे आवश्यक असते.
या कोर्स चा कालावधी 4 महिन्यांचा असून कोर्स ची फि 2-4 लाख रुपयांपर्यंत असते.
कोर्स पूर्ण झाल्यावर या विभागाची लेखी व तोंडी परीक्षा द्यावी लागते, ती पास झाल्यावर साधारण 6 महीने जहाजात ट्रेनिंग व त्यानंतर मुख्य Electro-Technical Officer म्हणून रुजू करून घेतात.
ETO या पदानंतर वर कोणतीही पदीनणती मिळत नसते,कारण या पदाच्या वर किंवा खाली कोणतेही पद नसते.
कामगार / क्रू विभाग | shipping crew jobs
कामगार विभाग यालाच General Purpose Rating असे सुद्धा म्हणतात. या मध्ये सुद्धा वरीलप्रमाणे डेक विभाग तसेच इंजिन विभाग असे विभांग आहेत. तसेच यात जेवण विभांग म्हणजेच Catering Department चे सुद्धा कोर्सेस उपलब्ध आहेत.
या विभागात काम करण्याच्या कोर्सेस ची पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
- 10 वी पास असणे आवश्यक.
- वयोमार्यादा 18 ते 25 वर्षे
- चश्मा असू नये
- कोर्स चा कालावधी 6 महीने
- कोर्स फि 1.5 ते 3 लाख पर्यन्त.
कोर्स चा प्रवेश घेताना तुम्हाला कोणत्या विभागात काम करायचे आहे हे आपण ठरवू शकता.
STCW Courses in Shipping
वरील पैकी कोणतेही कोर्स करून आपण जहाजांमध्ये ऑफिसर किंवा कामगार म्हणून काम करू शकतो. परंतु याव्यतिरिक्त आणखी एक खूप महत्वाचा कोर्स जो यापैकी प्रत्येकाला करावाच लागतो तो म्हणजे STCW कोर्स. या कोर्स मध्ये पुढील गोष्टी शिकवल्या जातात ज्या खूप महत्वाच्या असतात.
- आग व्यवस्थापन (Fire Fighting)
- मेडिकल परिस्थिति हाताळणे (Medical Course)
- पाण्यात बुडताना जीव कसा वाचवायचा याचे प्रशिक्षण (Sea Survival Technique)
- जहाजात खूप दिवस राहावे लागते त्यामुळे तिथे इतर लोकांसोबत एक कुटुंब म्हणून कसे राहायचे याचे प्रशिक्षण (PSSR)
- जहाजावर दहशतवादी किंवा समुद्री चाच्यानी हल्ला केल्यावर स्वतःचा जीव कसा वाचवायचा याचे शिक्षण (Safety and Security Course)
या कोर्स चा कालावधी 15-20 दिवसांचा असून त्यांची फि 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत असते.
प्रत्येक कर्मचारी मग तो नवीन असो वा जुना त्या प्रत्येकाला हा कोर्स करावाच लागतो. तसेच या कोर्स चा सर्टिफिकेट हा फकर 5 वर्ष वैध असतो त्यामुळे दर 5 वर्षांनी हा कोर्स करावा लागतो.
Note : मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या Instagram, Facebook, आणि फेसबूक वरील @rikama_khisa पेज ला फॉलो करा.