CIBIL Score In Marathi : नमस्कार मित्रांनो, बऱ्याचदा आपण ट्रेनमध्ये किंवा ऑफिसमध्ये सिबिल स्कोर बद्दल चर्चा ऐकत असतो. प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कर्ज (Loan ) घेण्याची आवश्यकता भासत असते. मग ते घरासाठी, गाडीसाठी, व्यवसायासाठी किंवा अजून कोणत्या महत्त्वाच्या कारणासाठी. परंतु बँका किंवा कोणत्याही वित्तीय संस्था आपल्याला ते कर्ज सहजासहजी देत नाहीत. प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्था कोणत्याही माणसाला कर्ज देण्याआधी त्याचा CIBIL स्कोर तपासून बघत असते. जर त्या माणसाचा CIBIL स्कोअर समाधानकारक असेल तरच त्या माणसाला बँकेमार्फत कर्ज दिले जाते. म्हणजेच जितका CIBIL स्कोअर जास्त तितका त्या माणसाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि याउलट जर सिबिल स्कोअर कमी असेल तर अशा व्यक्तींना बँका सहसा कर्ज देण्याचे टाळतात. पण हा CIBIL Score म्हणजे नेमकं काय ? तो कसा ठरवला जातो ? कर्ज मिळण्यासाठी किती सिबिल स्कोर आवश्यक असतो ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या लेखामध्ये मिळणार आहेत, म्हणून हा लेख संपूर्ण वाचा.
CIBIL चा फुल फॉर्म | Cibil score full form in Marathi
CIBIL या शब्दाचा फुल फॉर्म आहे ‘ क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ ( Credit Information Bureo India Limited ) असा आहे. सिबिल स्कोर ला क्रेडिट स्कोर असेही म्हटले जाते.
Cibil Score Meaning in Marathi
CIBIL म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही भारतातील एक प्रमुख पत मापन करणारी (Credit Rating) संस्था आहे जीची स्थापना सन 2000 मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या शिफारसी ने झाली आहे.
ही भारतातील अशी एक क्रेडिट ब्युरो आहे की जी कोणत्याही व्यक्ती, कंपनी किंवा संस्था यांनी किती कर्ज घेतले, घेतलेले कर्ज वेळेवर फेडले किंवा नाही, तसेच त्यांची कोणत्या कोणत्या बँकेमध्ये खाती आहेत यांची संपूर्ण माहिती गोळा करून साठवते व बँकांच्या मागणीनुसार त्यांना पुरवते.
सिबिल मार्फत व्यक्ती, संस्था आणि कंपन्यांचा पत अहवाल म्हणजेच क्रेडिट रिपोर्ट तयार केले जाते. त्यासाठी CIBIL त्या व्यक्तींची, संस्थांची किंवा कंपन्यांची कर्ज व्यवहाराशी संबंधित माहिती गोळा करते, आणि त्या आधारे हे क्रेडिट रिपोर्ट तयार केले जातात. त्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये त्या व्यक्तीची, संस्थेची किंवा कंपनीची कर्ज फेडण्याची क्षमता, कर्जाची सवय आणि कर्जाचा इतिहास अशा प्रकारची माहिती असते.
हे पण वाचा 👉 जीडीपी म्हणजे काय ?
विमा म्हणजे काय ? जाणून घ्या विम्याविषयी संपूर्ण माहिती?
CIBIL Score म्हणजे काय ?
जितका तुमचा Cibil Score जास्त म्हणजेच 900 च्या जवळ असेल तितका तुम्हाला कर्ज सहज आणि लवकर मिळू शकते व त्यावर व्याजदर ही कमी लागते. 750 किंवा 750 च्या वर असलेला Cibil Score चांगला मानला जातो. जर Cibil Score त्यापेक्षा कमी असेल तर कर्ज मिळणे कठीण असते, किंवा मिळाले तरी त्यावर जास्त व्याजदर आकारले जाते. बऱ्याचदा कमी Cibil Score असलेल्या व्यक्तींना बँक कर्ज देणे नाकारते. त्यामुळे कोणतेही कर्ज मिळण्यासाठी तुमचा Cibil Score चांगला असणे गरजेचे असते.
CIBIL Score का महत्त्वाचा आहे ?
Cibil Score म्हणजे काय याची माहिती आपण बघितली. Cibil Score चांगला असणे या अनेक गोष्टींसाठी आवश्यक असते, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश होत असतो.
- कर्ज मिळवणे
आपण कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज मागायला गेलो तर आधी आपला Cibil Score तपासला जातो. आपल्याला कर्ज मंजूर होईल की नाही, झाल्यास किती होईल, त्याला किती व्याजदर लागेल त्या सर्व गोष्टी आपल्या Cibil Score वर अवलंबून असतात.
- क्रेडिट कार्ड मिळवणे
हल्ली क्रेडिट कार्ड वापरणे ही फॅशन झाली आहे. बऱ्याचदा हे क्रेडिट कार्ड आपल्याला महत्त्वाच्या वेळी उपयोगी सुद्धा पडत असतात. क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी Cibil Score चांगला असणे गरजेचे असते. तसेच त्या क्रेडिट कार्डवर आपल्याला किती क्रेडिट मर्यादा मिळेल, हे सुद्धा Cibil Score वर अवलंबून असते.
- नोकरी मिळवण्यासाठी
हल्ली तुम्हाला जर चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवायचे असेल, तर तिथे सुद्धा Cibil Score तपासला जातो. Cibil Score चांगला असणे, हे चांगले आर्थिक शिस्त असण्याचे लक्षण आहे. Cibil Score चांगला असल्यास अशा कंपन्यांत तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.
Cibil Score कसा काढला जातो ? How is CIBIL score calculated?
Cibil Score हा मागील सहा महिन्यांच्या क्रेडिट हिस्टरी वरून काढला जातो. Cibil Score ठरवताना पुढील गोष्टी विचारात घेतल्या जातात.
- Payment History | कर्जाचा इतिहास
तुम्ही आधी कोणतेही कर्ज घेतले असेल (उदाहरणार्थ गृह कर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज इत्यादी) तर त्याची परतफेड वेळच्यावेळी केली आहे का, त्याचे हप्ते वेळेवर भरले आहेत का ? किंवा कर्ज भरण्यासाठी किती उशीर केला आहे या गोष्टी Cibil Score ठरवण्यासाठी महत्त्वाचा असतात. तुम्ही घेतलेले कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी भरले असतील तर तुमचा सिबिल स्कोर चांगला होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर त्याचे सुद्धा हप्ते आपण वेळेवर भरलेत की नाही यावर आपला Cibil Score ठरत असतो.
- Credit Limit | कर्ज मर्यादा
आपण जेव्हा क्रेडिट कार्ड काढतो, तेव्हा त्या कार्डवर आपल्याला मिळालेले क्रेडिट हे एक प्रकारचे कर्जच असते. आपल्याला त्या क्रेडिट कार्डवर मिळालेल्या क्रेडिट पैकी जास्तीत जास्त पैसे आपण जर वापरले, तर आपला Cibil Score कमी होतो. आणि त्या क्रेडिट पैकी कमीत कमी रक्कम जर आपण वापरली तर आपला Cibil Score चांगला होण्यास मदत होते. Cibil Score काढताना क्रेडिट लिमिट ला 25% प्राधान्य दिले जाते.
- Credit Type | कर्जाचा प्रकार
कर्जाचे विविध प्रकार असतात, ज्यामध्ये सुरक्षित कर्ज (Secured Loan ) आणि असुरक्षित कर्ज (Unsecured Loan ) असे प्रकार असतात. सुरक्षित कर्जामध्ये गृह कर्ज, एज्युकेशन लोन किंवा वाहन कर्ज या प्रकारचे कर्ज की जे घेताना पूर्ण प्रक्रिया फॉलो केली जाते, संपूर्ण कागदपत्र घेतली जातात आणि अप्रूव्हल घेऊन कर्ज मंजूर केले जाते. आणि असुरक्षित कर्ज म्हणजे अशा प्रकारचे कर्ज की जे घेताना कोणतेही कागदपत्रे घेतली जात नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचे Approval घेतले जात नाहीत (उदाहरणार्थ पर्सनल लोन, ऑनलाइन घेतलेले लोन). जर तुम्ही घेतलेल्या सुरक्षित कर्जाचे प्रमाण असुरक्षित कर्ज पेक्षा जास्त असेल तर आपला Cibil Score वाढण्यास मदत होते. जर असुरक्षित कर्जाचे प्रमाण सुरक्षित कर्जा पेक्षा जास्त असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या Cibil Score वर होत असतो. म्हणून कोणतेही कर्ज घेताना आपण नेमकं कोणत्या प्रकारचे कर्ज घेत आहोत याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. Cibil Score ठरवताना Credit Type ला 25% प्राधान्य दिले जाते.
- कर्ज न घेता फक्त चौकशी करणे
बऱ्याच वेळा काही लोक प्रत्यक्ष कर्ज न घेता फक्त आपल्याला कर्ज मिळू शकते का किंवा किती मिळू शकते याबाबत सतत बँकांमध्ये चौकशा करत असतात. असे लोक वारंवार बँकांमधे जाऊन आपले कागदपत्र जमा करत असतात व कर्जाबाबत चौकशा करत असतात. ही संपूर्ण माहिती बँका CIBIL कडे पोहोचवत असतात. यामुळे सुद्धा आपल्या Cibil Score वर नकारात्मक परिणाम होऊन तो कमी होण्याची शक्यता असते.
सिबिल स्कोर कसा तपासायचा | How to Check CIBIL Score ?
आता आपला Cibil Score तपासणे अगदी सोपे झाले आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन मोबाईलवर सुद्धा आपला Cibil Score अगदी मोफत तपासू शकता. त्यासाठी अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत. तसेच CIBIL च्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा जाऊन आपण तिथे आपली योग्य माहिती पुरवून आपला Cibil Score तपासून पाहू शकतो. तसेच अन्य एखाद्या वित्तीय संस्थेमार्फत किंवा बँकेमार्फत सुद्धा आपण आपला Cibil Score तपासू शकतो
CIBIL Score सुधारण्यासाठी काय उपाय करावे ?
आपल्याला माहित आहे की कोणतेही कर्ज मिळण्यासाठी आपला CIBIL Score चांगला असणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपण पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे.
- कर्ज वेळेवर फेडणे
आपण घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरून आपले कर्ज वेळेत फेडले तर त्याने आपला CIBIL Score चांगला होण्यास मदत होते. कर्ज चुकवणे किंवा हप्ते उशिरा भरणे यांनी आपल्या CIBIL Score बर नकारात्मक परिणाम होत असतो.
- कर्जाचे प्रमाण कमी करा
वारंवार कर्ज घेण्याच्या सवयीमुळे आपला CIBIL Score खराब होत असतो. त्यामुळे अगदी आवश्यक असेल तेव्हाच आणि आवश्यक तेवढेच कर्ज घ्या. विनाकारण कर्ज घेणे टाळा.
- आपल्या क्रेडिट माहितीवर लक्ष ठेवा
कोणतेही कर्ज घेताना किंवा इतर वेळी आपली क्रेडिट माहिती तपासत जा आणि आवश्यकता वाटल्यास त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
CIBIL Score चा फुल फॉर्म काय आहे ?
CIBIL या शब्दाचा फुल फॉर्म आहे ‘ क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ ( Credit Information Bureo India Limited ) असा आहे.
सिबिल ही सरकारी संस्था आहे का?
CIBIL ही अर्ध सरकारी संस्था असून तीला रिझर्व बँक ऑफ इंडिया चे मान्यता आहे.
सिबिल स्कोर किती ते किती अंकांच्या दरम्यान असतो?
सिबिल स्कोर हा एक तीन अंकी नंबर असून तो 300 ते 900 च्या दरम्यान असतो.
निष्कर्ष : Cibil Score in Marathi
आजच्या आपल्या या Cibil Score In Marathi बद्दलच्या लेखामधून सिबिल स्कोर हा प्रत्येक व्यक्तीसाठी किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. आजच्या या लेखांमध्ये मी आपल्याला सिबिल स्कोर बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला सिबिल स्कोर बद्दल अजून काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद !
Related :
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024