diploma courses after 10th information in marathi : आजकाल प्रत्येकजण करीयरच्या बाबतीत जागरूक आहे. १० वी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडायचा याबाबत विद्यार्थी तसेच पालक वर्ग चिंताग्रस्त असतात. आपण निवडलेला अभ्यासक्रम योग्य आहे कि नाही,त्याला स्कोप आहे कि नाही किंवा निवडलेल्या अभ्यासक्रमानंतर आपल्याला योग्य नोकरी मिळेल कि नाही याबद्दल अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात असतात. यासाठीच या लेखामध्ये diploma course after 10 बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे,जेणेकरून १० वी नंतर तुम्हाला योग्य अभ्यासक्रम निवडणे सोपे जाईल.
हे पण वाचा : जहाजांमध्ये नोकरी कशी मिळवायची ? | Careere in shipping industry in marathi
diploma courses after 10th information in marathi
आपले करियर निवडतांना सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपण जे क्षेत्र निवडणार आहोत त्याची आपल्याला आवड आहे कि नाही हे तपासने गरजेचे असते. पुढे विविध क्षेत्रातील डिप्लोमा कोर्स विषयी माहिती दिली आहे,आपण आपल्या आवडीनुसार योग्य अभ्यासक्रम निवडणे योग्य ठरेल.
तुम्हाला हे पण आवडेल : 12 वी कॉमर्स नंतर करा सर्वात जास्त पगार मिळवून देणारे हे कोर्स | Courses after 12th commerce with high salary in Marathi
Best diploma courses after 10th with high Salary
1) डिप्लोमा इन फाइन आर्ट्स | Diploma in fine arts
डिप्लोमा इन फाइन आर्ट्स हा कला क्षेत्रात आपले करियर घडविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध करून देणारा सर्वोत्तम डिप्लोमा कोर्स आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना पेंटिंग, ड्रॉइंग, मूर्तिकला, ग्राफिक डिझाइन आणि इतर अनेक प्रकारच्या कलांचे प्रशिक्षण उपलब्ध करून देतो.

फाइन आर्ट्समध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये काय शिकतो?
पेंटिंग: विविध तंत्रांचा आणि माध्यमांचा वापर करून पेंटिंग करणे.
ड्रॉइंग: पोर्ट्रेट, लँडस्केप आणि अमूर्त चित्रकला सारख्या विविध प्रकारच्या रेखाचित्रे काढणे.
मूर्तिकला: विविध साहित्यांचा वापर करून मूर्ती तयार करणे.
ग्राफिक डिझाइन: संगणक सॉफ्टवेअरचा वापर करून ग्राफिक्स डिझाइन करणे.
फोटोग्राफी: विविध प्रकारच्या कॅमेऱ्यांचा वापर करून छायाचित्र काढणे.
फाइन आर्ट्समध्ये पदव्युत्तर पदवी नंतर करियरच्या संधी
- ग्राफिक डिझाइनर: जाहिरात, वेबसाइट आणि इतर डिजिटल माध्यमांसाठी ग्राफिक्स डिझाइन करणे.
- इंटीरियर डिझाइनर: घरे, कार्यालये आणि इतर इमारतींचे अंतर्गत डिझाइन करणे.
- अॅनिमेटर: अॅनिमेटेड चित्रपट, व्हिडिओ गेम आणि इतर माध्यमांसाठी अॅनिमेशन तयार करणे.
- फोटोग्राफर: फॅशन, जाहिरात आणि इतर क्षेत्रांमध्ये छायाचित्र काढणे.
- कला शिक्षक: शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये कला शिकवणे.
2) इंजिनीअरिंगचा डिप्लोमा | Diploma in Engineering
ज्या विद्यार्थ्यांना इंजिनियरिंग म्हणजेच अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये करियर घडवायचा आहे त्यांच्यासाठी Diploma in Engineering मध्ये विशेष ज्ञान व कौशल्ये दिली जातात.तसेच या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान पुरविण्यावर भर दिला जातो. सर्वसाधारणपणे या मध्ये पुढील प्रकारच्या Diploma courses in Engineering चा समावेश होतो.

- सिव्हिल इंजिनिअरिंग: रस्ते, पूल, इमारती इत्यादी बांधकाम संरचनांचे डिझाइन आणि बांधकाम.
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग: यंत्रसामग्री, वाहने, औद्योगिक उपकरणे इत्यादींचे डिझाइन आणि उत्पादन.
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: विद्युत ऊर्जा निर्माण, प्रसारण आणि वितरण.
- इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग: इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सर्किट आणि सिस्टमचे डिझाइन.
- कंप्युटर इंजिनिअरिंग: संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे डिझाइन आणि विकास.
3) डिप्लोमा इन स्टेनोग्राफी
स्टेनोग्राफी ही एक अशी कला आहे जिच्यामध्ये बोललेली भाषा संक्षिप्त लिपीमध्ये लिहिली जाते. स्टेनोग्राफीचा डिप्लोमा हा एक असा कोर्स आहे जो तुम्हाला या कलामध्ये पारंगत बनण्यास मदत करतो.
स्टेनोग्राफी कोर्सनंतर करियरच्या संधी
- सरकारी नोकरी: केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये विविध पदांवर नोकरी मिळू शकते.
- खाजगी कंपन्या: सचिव, सहाय्यक, रिपोर्टर इत्यादी पदांवर खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते.
- स्वयंरोजगार: स्वतंत्र स्टेनोग्राफर म्हणून काम करू शकता.
4) डिप्लोमा इन आर्किटेक्चर
आर्किटेक्चरमध्ये डिप्लोमा हा एक असा कोर्स आहे जो विद्यार्थ्यांना इमारती आणि इतर संरचनांचे डिझाइन, नियोजन आणि बांधकाम या क्षेत्रात करियर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करतो. हा कोर्स सामान्यतः तीन वर्षांचा असतो आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव देण्यावर भर दिला जातो.
डिप्लोमा कोर्सनंतर करिअरचे पर्याय
- आर्किटेक्ट असिस्टंट: एक आर्किटेक्ट असिस्टंट आर्किटेक्टला डिझाइन आणि बांधकाम दस्तऐवज तयार करण्यास मदत करतो.
- इंटीरियर डिझायनर: एक इंटीरियर डिझायनर इमारतीच्या अंतर्गत भागांचे डिझाइन करतो.
- प्रोजेक्ट मॅनेजर: एक प्रोजेक्ट मॅनेजर बांधकाम प्रकल्प व्यवस्थापित करतो.
- कन्स्ट्रक्शन सुपरवायझर: एक कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम कार्याचे निरीक्षण करतो.
- CAD ऑपरेटर: एक CAD ऑपरेटर संगणक सहाय्यित डिझाइन सॉफ्टवेअर वापरून डिझाइन तयार करतो.
5) डिप्लोमा इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन
Diploma in Business Administration हा असा कोर्स आहे ज्यामध्ये एखाद्या व्यवसायातील विविध पैलू समजावून सांगितले जातात. विविध व्यवसायांशी संबंधित ज्ञान व कौशल्ये विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन बिझनेस अॅडमिनिसट्रेशन मध्ये शिकविळी जातात.

डिप्लोमा इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशननंतर कोणते करियर पर्याय आहेत?
- मार्केटिंग मॅनेजर: उत्पादने किंवा सेवांचे बाजारपेठेत प्रचार करणे आणि विक्री वाढवणे.
- अकाउंटंट: कंपनीचे लेखा व्यवहार हाताळणे.
- मानव संसाधन मॅनेजर: कंपनीतील कर्मचारी संबंधित सर्व बाबींचे व्यवस्थापन करणे.
- ऑपरेशन्स मॅनेजर: कंपनीच्या दैनंदिन कार्यांचे व्यवस्थापन करणे.
- उद्योजक: स्वतःचा व्यवसाय सुरू करणे.
6) डिप्लोमा इन फॉर्मसी
डिप्लोमा इन फॉर्मसी या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना विविध औषधे बनवणे,त्यांचे वितरण तसेच व्यवस्थापन यांबद्दलचे शिक्षण दिले जाते. तसेच हा कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःचे मेडिकल शॉप सुद्धा सुरू करता येते.

डिप्लोमा इन फार्मेसीनंतर कोणते करियर पर्याय आहेत?
- फार्मासिस्ट: औषधालयात काम करून रुग्णांना औषधे देणे.
- औषध कंपनीतील कर्मचारी: औषध कंपन्यांमध्ये उत्पादन, विक्री किंवा मार्केटिंग विभागात काम करणे. आरोग्य संस्थांमधील फार्मासिस्ट: रुग्णालये, क्लिनिक इत्यादी ठिकाणी काम करून रुग्णांना औषधांची माहिती देणे.
- औषध निरीक्षक: औषध कंपन्यांच्या उत्पादनांचे गुणवत्ता नियंत्रण करणे.
- औषध संशोधक: नवीन औषधांचा शोध लावणे.
Note : मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या Instagram, Facebook, आणि फेसबूक वरील @rikama_khisa पेज ला फॉलो करा.
- Agristack : भारतातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल
- पायलट बनण्याचे स्वप्न असे करा पूर्ण | How to become Pilot after 12th
- १२ वी नंतर फोटोग्राफर बनायचं आहे ? मग हे कोर्स करा | career in photography after 12th
- १२ वी नंतर पत्रकार कसे बनायचे? | Journalism course information in Marathi |
- NEFT म्हणजे काय ? | what is NEFT in Marathi
- नेट बँकिंग म्हणजे काय ? | Net banking information in marathi
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024
- चेक चे हे प्रकार माहिती नसतील तर तुमची फसवणूक होऊ शकते | Types of cheque in Marathi