Diploma courses after 12th in Marathi : मित्रांनो 12 वी बोर्डाची परीक्षा केव्हाच संपली असून आता प्रत्येकाला रिझल्ट ची उत्सुकता आहे. कित्येकांच्या मनात रिझल्ट बद्दल धाकधुकी सुद्धा आहे. 12 वी नंतर पुढे काय ? हा प्रश्न खूप जणांना सतावत असेल. प्रत्येक जणांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याची सगळ्यांची इच्छा असते,परंतु बऱ्याच जणांना 12 नंतर नक्की कोणता कोर्स करावा जेणेकरून आपल्याला लगेच जॉब मिळू शकतो,याची माहिती नसते. म्हणून आज Diploma courses after 12th in Marathi या विषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत,त्यामुळे ही माहिती संपूर्ण वाचा आणि इतरांना सुद्धा शेअर करा.
हे आहेत 12 नंतरचे सर्वोत्तम डिप्लोमा कोर्सेस | Diploma courses after 12th in Marathi
12 वी नंतर आपण विविध विषयांतील डिप्लोमा कोर्सेस करू शकतो,जे आपल्यातील कौशल्ये विकसित करतात आणि आपल्याला चांगला जॉब मिळण्यासाठी सुद्धा मदत करतात. पुढे काही प्रसिद्ध डिप्लोमा कोर्सेस ची यादी दिली आहे जे तुम्ही 12 वी नंतर करू शकता.
इंजिनियरिंग क्षेत्रातील डिप्लोमा | Diploma in Engineering
तुम्हाला जे इंजिनियरिंग क्षेत्राची आवड असेल तर तुम्ही यअ क्षेत्रातील डिप्लोमा निवडू शकता. चांगल्या इंजिनियर्स ना आपल्या देशात तसेच परदेशात सुद्धा प्रचंड मागणी आहे. यामध्ये सुद्धा पुढील डिप्लोमा चा समावेश होतो.
हे पण वाचा : 12 वी नंतर या क्षेत्रात आहेत करियर च्या उत्तम संधी
- सिव्हिल इंजिनियरिंग (Diploma in Civil Engineering)
- मेकॅनिकल इंजिनियरिंग (Diploma in Mechanical Engineering)
- इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग (Diploma in Electrical Engineering)
- कॉम्प्युटर इंजिनियरिंग (Diploma in Computer Engineering)
- इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग | Diploma in Electronics & Telecommunication)
आर्ट आणि डिझाईन मधील डिप्लोमा | Diploma in Arts and Design
तुम्हाला कलेची आवड असेल तर त्याच रूपांतर तुम्हाला करियर मध्ये करता येऊ शकतो. विशेषतः तुम्हाला डिजायनिंग वैगेरे चांगली जमत असेल तर या क्षेत्रातील डिप्लोमा तुम्हाला फायद्याचा ठरेल. नोकरी बरोबर स्वतःचा व्यवसाय देखील तुम्ही या डिप्लोमा नंतर करू शकता. आर्ट आणि डिझाईन मधील विविध प्रकारचे डिप्लोमा पुढीलप्रमाणे आहेत.
- ग्राफिक डिझायनिंग ( Diploma in Graphic Designing)
- फॅशन डिझायनिंग (Diploma in Fashion Designing)
- ज्वेलरी डिझायनिंग (Diploma in Jwellary Designing)
- इंटेरियर डिझायनिंग (Diploma in Interior Designing)
- अनिमेशन (Diploma in Animation)
बिझनेस मॅनेजमेंट मधील डिप्लोमा
जर तुमच्यात नेतृत्व गुण सोबत व्यवस्थापन कौशल्ये असतील तर या क्षेत्रात तुम्ही चांगले यश मिळवू शकता. यामध्ये पुढील प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध असतात
- फायनान्स मॅनेजमेंट (Diploma in Finance Management)
- मार्केटिंग मॅनेजमेंट (Marketing Management)
- ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट (Human Resource Management)
- सप्लाय चैन मॅनेजमेंट (Supply Chain Management)
IT क्षेत्रातील डिप्लोमा
आयटी क्षेत्र हे सतत डेव्हलप होणारे क्षेत्र आहेत. गलेगठ्ठ पगार आणि आकर्षक सुविधा यांमुळे हल्ली प्रत्येक जण या क्षेत्रात करियर कण्याची इच्छा ठेवतो. तुम्हाला सुद्धा आयटी क्षेत्राची आवड असेल तर तुम्ही खालील विषयात डिप्लोमा कोर्स करू शकता.
- वेब डेव्हलपमेंट (Web Development)
- डेटा सायन्स (Deta Science)
- डेटा अनालिस्ट (Deta analyst)
- सायबर सेक्युरिटी (Cyber Security)
- डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)
- सॉफ्टवेअर टेस्टिंग (Software Testing)
- कॉम्प्युटर हार्डवेअर (Computer Hardware)
- कॉम्प्युटर नेटवर्किंग (Computer Networking)
फोटोग्राफी | Photography
कला आणि तंत्रज्ञानाचा उत्कृष्ठ मिलाफ म्हणजे फोटोग्राफी. हल्ली इमेज बाजार सारख्या अनेक वेबसाईट्स आहेत ज्यावर तुम्हाला तुम्हाला हजारो रुपये खर्च करून फोटो विकत घ्यावे लागतात,यावरून या क्षेत्रातील पैसा तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला फोटोग्राफी ची आवड असेल आणि तुम्ही यात करियर करू इच्छित असाल तर तुम्ही प्रोफेशनल फोटोग्राफी शिकणे आवश्यक आहे. काही डिप्लोमा कोर्सेस हे विशिष्ठ प्रकारच्या फोटोग्राफी वर लक्ष केंद्रित करतात, जसे कि लॅंडस्केप फोटोग्राफी, पोर्ट्रेट फोटोग्राफी किंवा फॅशन फोटोग्राफी, इव्हेंट फोटोग्राफी इत्यादि… यासाठी तुम्ही पुढील कोर्सेस करू शकता.
- फोटोग्राफितील डिप्लोमा (Diploma in Photography)
- डिप्लोमा ईन अप्लाइड फोटोग्राफी (Diploma in applied Photography)
- डिप्लोमा ईन कमर्शियल फोटोग्राफी (Diploma in Commercial Photography)
- डिप्लोमा ईन फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी (Diploma in Photography and Vediography)
- डिप्लोमा ईन फाईन आर्ट फोटोग्राफी (Diploma in Fine art Photography)
पत्रकारिता | Journalism
पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ मानला जातो. भारतामध्ये पत्रकारितेची खूप मोठी परंपरा आहे. अनेक दिग्गज लोकांनी पत्रकारितेच्या आणि देशाच्या इतिहासावर आपला ठसा उमटविलेला आहे. समाजात महत्वाची भूमिका आणि जबाबदारी पत्रकार बजावत असतो. तुम्हाला जर पत्रकारीतेमध्ये आवड असेल तर तुम्ही यामधील काही कोर्सेस करू शकता जिथे पत्रकारीतेसाठी आवश्यक कौशल्ये शिकवली जातात. यातील डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही पत्रकार,संपादक,उपसंपादक,रिपोर्टर किंवा कॉपी एडिटर यांसारख्या पदावर काम करू शकता.
- पत्रकारीतेतील डिप्लोमा (Diploma in Journalism)
- ब्रॉडकास्टिंग मध्ये डिप्लोमा (Diploma in Broadcasting)
- पत्रकारिता आणि लोकसंपर्क यातील डिप्लोमा (Diploma in Journalism and Public Relations)
- डिजिटल पत्रकारीतेमधील डिप्लोमा (Diploma in Digital journalism)
- मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा (Diploma in mass communication)
हॉटेल मॅनेजमेंट
हॉटेल व्यवसाय हा सर्वकाळ चालणारा व्यवसाय आहे. देशात आणि परदेशात सुद्धा हॉटेल मॅनेजमेंट अभ्यास क्रम पूर्ण कलेल्या विद्यार्थ्यांना प्रचंड मागणी आहे. यअ क्षेत्रात नोकरी बरोबर स्वतःचा व्यवसाय सुद्धा आपल्याला करता येतो. तुम्हाला जर लोकांना सेवा देणे,विविध खाद्यपदार्थ बनवणे यांसारख्या गोष्टींची आवड असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी आहे. हॉटेल मॅनेजमेंट मधील डिप्लोमा पूर्ण करून या क्षेत्रात तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढील पदांवर नोकरीची संधी मिळू शकते.
- हॉटेल मॅनेजर (Hotel Manager)
- फ्रंट ऑफीस मॅनेजर (Front Office manager)
- फूड आणि बेव्हरेज मॅनेजर (Food & Beverage Manager)
- मानव संसाधन मॅनेजर (Human Resource Manager)
- हाऊस कीपिंग मॅनेजर (House Keeping Manager)
- मार्केटिंग मॅनेजर (Marketing Manager)
- रेस्टॉरंट मॅनेजर (Restaurant Manager)
- इव्हेंट मॅनेजर (Event Manager)
- टुर ऑपरेटर (Tour Operator)
- एअरलाइन्स केटरिंग मॅनेजर (Airlines Catering Manager)
इव्हेंट मॅनेजमेंट
आपण बघत असतो रोज टीव्ही वर मोठ मोठे इव्हेंट अरेंज केले जातात. एखाद्या कंपनीचा नवीन प्रॉडक्ट लॉंच करणे असो व एखाद्या नवीन उद्योगाची स्थापना,एखादा पुरस्कार सोहळा, राजकीय सभा किंवा लग्न सोहळा हे सर्व इव्हेंट मॅनेज करण्याच काम इव्हेंट मॅनेजर करत असतो. तुमच्यात जर मॅनेजमेंट ची कौशल्ये असतील आणि या क्षेत्राची आपल्याला आवड असेल तर आपण या क्षेत्रातील डिप्लोमा करून आपले करियर इथे घडवू शकतो.
फॉरेन लँग्वेज
आपल्याला माहिती आहेत कि संपूर्ण जग हे आता तंत्रज्ञानामुळे जवळ आलेलं आहे. अनेक कंपन्या aani संस्था या एका पेक्षा अनेक देशांत काम करत असतात. त्याबरोबरच साहित्य कला यांची आता आपापसात देवाणघेवाण होत असते. इंटरनेट वर सुद्धा आता इंग्रजी भाषेबरोबरच इतर भाषांचा वापर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एखादी परदेशी भाषा शिकून घेण आपल्याला खूप फायद्याच ठरू शकतो. इतकंच नव्हे तर आपण एक उत्तम करियर फॉरेन लँग्वेज च्या आधारावर साकार करू शकतो.तुम्हाला नवीन भाषा शिकणे आवडत असेल तर तुम्ही पुढीलपैकी एखादा फॉरेन लँग्वेज डिप्लोमा करू शकता.
- फॉरेन लँग्वेज डिप्लोमा (Diploma in Foreign Language)
- फ्रेंच भाषेमध्ये डिप्लोमा (Diploma in French)
- जर्मन भाषेमध्ये डिप्लोमा (Diploma in German)
- चीनी भाषेमध्ये डिप्लोमा (Diploma in Chinese)
- स्पॅनिश भाषेमध्ये डिप्लोमा (Diploma in Spanish)
- जापानी भाषेमध्ये डिप्लोमा (Diploma in Japanese)
अशाच प्रकारे जगातील इतर भाषा शिकून एक चांगल करियर आपल्याला घडवता येईल.
निष्कर्ष
आज या आर्टिकल मध्ये आम्ही काही प्रसिद्ध Diploma courses after 12th in Marathi ची माहिती दिलेली आहे. ज्यांना वरील डिप्लोमा कोर्सेस करण्यात इंटरेस्ट असेल त्यांनी त्याविषयी आधिक माहिती घ्यावी तसेच त्या कोर्सेस ची फी वाईगरे पाहून उत्तम इंस्टिट्यूट मधूनच कोर्स करावा जेणे करून उत्तम कोचिंग बरोबर पुढे नोकरीच्या संधी देखील लगेच उपलब्ध होतील. तुमच्यात योग्य कौशल्ये असतील तर तुम्ही गुगल मध्ये सुद्धा जॉब साठी अप्लाय करू शकता. 12 वी नंतर शिक्षक होण्याचा सुद्धा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला ही माहिती काशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा.
धन्यवाद !!
हे पण वाचा :
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024