How to apply for job in google company in marathi : मित्रांनो गूगल हे नाव प्रत्येकाने ऐकल आहे. आपण प्रत्येक जन दररोज एकदा तरी गूगल हे नाव आपल्या मोबाइल वर किंवा कॉम्प्युटर स्क्रीन वर पाहातोच. गूगल ही तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठी बहुराष्ट्रीय कंपनी असून गूगल शिवाय इंटरनेट ची आपण कल्पनाच करू शकत नाही. दरवर्षी हजारो लाखो विद्यार्थी उच्च शिक्षण पूर्ण करतात, आणि प्रत्येकालाच गुगल सारख्या मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असते.
आपल्याला प्रत्यक्ष गूगल कंपनी सोबतच काम करायला मिळालं तर ? प्रत्येकाला हे एक स्वप्न वाटेल पण स्वतः गूगल ही संधी आपल्याला उपलब्ध करून देत आहे. आपण आपल्या क्वालिफिकेशन नुसार गूगल मध्ये जॉब साठी अर्ज करू शकतो. How to apply for job in google company साठी अर्ज कुठे करायचं ? त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक असते? डॉक्युमेंट्स कोणती लागतात ? याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.
How to apply for job in google company in marathi
- गूगल मध्ये नोकरी साठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी पुढील लिंक वर क्लिक करा. https://www.google.com/about/careers/applications/jobs/results/
- ही वेबसाइट ओपन केल्यानंतर सर्वात आधी Sign in बटण वर क्लिक करून आवश्यक ती माहिती टाकून Log in करायच आहे,
- Log in केल्यानंतर तुमच्यासमोर जो फॉर्म येईल तो काळजीपूर्वक भरायचा आहे.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून त्या वेबसाइट वर अपलोड करायची आहेत.
- त्यानंतर तुम्हाला Upload Resume असा सुद्धा पर्याय दिसेल. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं Resume करायचं आहे. Resume अपलोड करतांना दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्या. Resume हा पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचं आहे.
- Resume अपलोड करून झाल्यानंतर आपण सर्व माहिती अचूक भरली असल्याची पुन्हा खात्री करून घ्या, व माहिती अपूर्ण असल्यास पूर्ण करून घ्या,अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल.
- यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.
अशाप्रकारे google च्या अधिकृत वेबसाईट वर आपला प्रोफाईल बनवून आणि Resume अपलोड करून कुणीही नोकरी प्राप्त करू शकतो.
गुगल मध्ये कोणत्या प्रकारचे जॉब उपलब्ध असतात? | Google Jobs
गुगल हि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहेत. त्यामुळे साहजिक आहे की गुगल मध्ये जास्त जॉब्स हे तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असतील. परंतु फक्त तंत्रज्ञान क्षेत्रातीलच जॉब इथे उपलब्ध आहेत अस नाही, तर Content Writing, SEO, Accounting, डिझाइनिंग, यांसारखे जॉब सुद्धा असतात. गुगल टेक्निकल तसेच नॉनटेक्निकल जॉब सुद्धा ऑफर करते. आता आपण गुगल मध्ये उपलब्ध असणाऱ्या जॉब ची यादी पाहू या..
- Software Tester
- UX Designer
- SEO Jobs
- Copy writer
- Network Engineer
- Account Manager
- Data Scientis
- Administrative Assistant
- Junior Software Engineer
- Software Developer
या आणि अशा अनेक प्रकारचे जॉब गुगल मध्ये उपलब्ध आहेत. इथे आम्ही फक्त उदाहरणादाखल काही नावे दिली आहेत. अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईट ला भेट द्या.
https://www.google.com/about/careers/applications/
गुगल मध्ये जॉब मिळवण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत ?
- गुगल हि बहुराष्ट्रीय कंपनी आहे.इथे काम करण्यासाठी तुमच इंग्रजी चांगलं असणं आवश्यक आहे. इंग्रजी तून उत्तम संवाद साधता येत असेल तर तुम्हाला गुगल मध्ये नोकरी मिळण्यासाठी खूप फायदा होईल.
- तुम्हाला कॉम्पुटर चा चांगल ज्ञान त्याबरोबरच या क्षेत्रातील नवीन नवीन तंत्रज्ञानाशी तुम्ही परिचित असं फायद्याच ठरेल.
- उत्तम व्यक्तीमत्वाबरोबरच मेहनत जिद्द आणि संयम हे गुण तुम्हाला गुगल मध्ये करियर करण्यात यशस्वी करतील.
गुगल मध्ये वर्क फ्रॉम होम जॉब मिळू शकतो का ? | Google Work From Home Job
आता वर्क फ्रॉम होम चा जमाना आहे. गुगल मध्ये सुधा तुम्ही वर्क फ्रॉम होम जॉब मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे पुढील सुविधा असणं आवश्यक आहे.
- चांगली कॉम्पुटर सिस्टम किंवा laptop
- चांगलं इंटरनेट कनेक्शन
- प्रिंटर , स्कॅनर
- मोबाईल स्मार्टफोन
- इन्वर्टर
या सर्व सुविधा तुमच्या घरी उपलब्ध असतील तर निश्चितच तुम्ही गुगल मध्ये वर्क फ्रॉम होम चा जॉब सुद्धा मिळवू शकता.
गुगल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी खास टिप्स
गुगल ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित कंपनी आहे. कामाबरोबरच ही कंपनी शिस्त,नीटनेटकेपणा याला सुद्धा प्राधान्य देते. गुगल मध्ये जॉब मिळण्यासाठी अर्ज करतांना आपण काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
रिझ्यूमे : आपला Resume व्यवस्थित व वाचण्यास सुलभ असाल,त्यावरील फॉन्ट वाचण्यासाठी सोपं असावा. तसेच शक्यतो रिझ्यूमे हा एका पेज वरच असावा. त्यात आपले क्वॉलिफिकेशन ,अनुभव, वैयक्तिक माहिती इ. व्यवस्थित टाकावी.
कव्हर लेटर : गुगल मध्ये नोकरीसाठी Application देतांना कव्हर लेटर ही खूप महत्वाचा असतो. कव्हर लेटर हे आकर्षक व इतरांपेक्षा तुम्हाला वेगळे सिद्ध करणारे 3-4 पॅराग्राफ चे असावे.
मुलाखत : तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे तेथील काम व जबाबदारी संपूर्ण माहिती करून घ्या. तसेच तुम्ही रेझ्यूमे मध्ये लिहिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून त्याची पूर्वतयारी करून घ्या.
कौशल्यांचा विकास : गुगल सारख्या कंपनीत जॉब करण्यासाठी फक्त पदवी पुरेशी नाही तर अगदी बरोबरच आपल्यामध्ये विविध कौशल्य सुद्धा असणे आवश्यक आहे. जसे की चांगले संवाद कौशल्य, टीम वर्क, निर्णय क्षमता, लीडरशिप, सारासार विचार क्षमता इत्यादी..
गुगल मध्ये जॉब करण्याचे फायदे
- गुगल तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून ती एक प्रतिष्ठित कंपनी आहे. या कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आकर्षक सोयी सुविधा मिळतात.
- गुगलमध्ये नोकरी करणाऱ्यांना पगार आहे खूप चांगला दिला जातो.
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणाचं आनंदमय वातावरण. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूप आरामशीर वातावरण निर्माण केलं जातं, जेणेकरून ते कुठल्याही तणावा शिवाय तिथे काम करू शकतात.
- गुगल सारख्या कंपनीत काम करताना आपल्याला खूप सार्या गोष्टी शिकायला मिळतात व आपण अनुभवाने समृद्ध होत जातो.
- गुगल हा एक मोठा ब्रँड असून त्याची एक विश्वासारखा पूर्ण जगामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी काम केल्यानंतर सहाजिकच तुम्हाला येथील अनुभवाचा तुमच्या भविष्यातील करिअरसाठी चांगला उपयोग होतो.
FAQ – नेहमी विचारले जाणार प्रश्न
Google मध्ये नोकरीसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
संबंधित विषयातील पदवी असल्यास आपण गुगलमध्ये जॉब साठी अर्ज करू शकतो. पदवी बरोबर आपल्याकडे इतर कौशल्य असल्यास तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज, प्रोग्रामिंग, डेटा सायन्स इत्यादींबाबत विशेष ज्ञान असल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल
बीएच्या विद्यार्थ्याला गुगलमध्ये नोकरी मिळू शकते का?
बी ए च्या विद्यार्थ्याला सुद्धा गुगलमध्ये नोकरी मिळू शकते. गुगलमध्ये फक्त तंत्रज्ञान संबंधित जॉब असतात असं नाही. इतरही सर्व प्रकारचे जॉब्स गुगलमध्ये उपलब्ध आहेत. कोणताही विद्यार्थी आपल्या कॉलिफिकेशन नुसार आपण ज्या पदासाठी पात्र आहोत तिथे अर्ज करू शकतो.
फ्रेशर्सना गुगलमध्ये नोकऱ्या मिळू शकतात का?
फ्रेशर्स सुद्धा आपल्या पात्रतेनुसार गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात. गुगलच्या रिक्वायरमेंट मध्ये जर ते बसत असतील तर त्यांना सुद्धा निश्चितच गुगलमध्ये नोकरी मिळू शकते.
निष्कर्ष : गुगल सारख्या प्रतिष्ठित आणि मोठ्या कंपनीमध्ये जॉब करणे हे बरेच जणांचे स्वप्न असते. आपल्यामध्ये जर चांगले कौशल्य आणि आवश्यक ते शैक्षणिक पात्रता असेल तर निश्चितच आपण गुगलमध्ये जॉब मिळू शकतो. भारतासारख्या देशांमध्ये टॅलेंट ची कमी नाहीये. आणि गुगल कंपनी सुद्धा अशाच टॅलेंट च्या शोधात नेहमी असते. त्यामुळे निश्चितच भारतीयांना गुगल सारख्या विदेशी कंपन्यांमध्ये नेहमीच मोठी मागणी राहिलेली आहे. तुम्हाला जर शिक्षक म्हणून नोकरी करण्याची इच्छा असेल तर शिक्षक होण्यासाठी कोणते कोर्स करायचे याबद्दल ही माहिती वाचू शकता. करिअर आपल्याला चांगल्या पद्धतीने घडवायचे असेल तर आपल्याला बारावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण पुढे जाऊन गुगल सारख्या मोठ्या कंपनीमध्ये काम करण्यास सक्षम बनवू शकतो. माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद!!
हे पण वाचा :
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024