१२ वी नंतर पत्रकार कसे बनायचे? | Journalism course information in Marathi |

Journalism course information in Marathi : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असे म्हणतात. निश्चितच, पत्रकार लोकांचा समाजात एक दबदबा असतो. लोकमान्य टिळक,आगरकर, बाबासाहेब आंबेडकर, स्वातान्त्र्यवीर सावरकर यांसारखी थोर व्यक्तिमत्वे पत्रकारितेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्या साठी आवाज उठवताना आपण इतिहासात वाचलेले आहे. अनेक पत्रकारांनी राजकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रात सुद्धा आपले नशीब आजमावून त्या क्षेत्रात ते उच्च पदावर पोहोचले आहेत. जात तुम्हाला समाजासाठी काम करण्याची आवड असेल तर पत्रकारिता हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. १२वी नंतर पत्रकार बनण्यासाठी अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. भारतात पत्रकार होण्यासाठी कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहे त्यांची माहिती आज आपण पाहुया.

दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi

जहाजांमध्ये नोकरी कशी मिळवायची ? | Careere in shipping industry in marathi

Table of Contents

पत्रकारिता म्हणजे काय ? What is journalism in marathi

पत्रकारिता हे एक असे ज्ञानपूर्ण क्षेत्र आहे, ज्यात तुम्हाला समाजातील विविध घटनांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. पत्रकार म्हणून तुम्ही लोकांना माहिती देण्याचे आणि त्यांच्या मनात जागरुकता निर्माण करण्याचे काम करू शकता. तुम्हाला साहसी आणि थ्रील असणारा जॉब करायची इच्छा असेल तर पत्रकारिता योग्य निर्णय असेल.

भारतात पत्रकारिताचे अभ्यासक्रम | journalism courses in india

भारतामध्ये तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यांवर पत्रकारितेचे विविध कोर्सेस करू शकता. त्यातीलच काही महत्वाच्या कोर्सेस ची माहिती खाली दिली आहे.

NEET परीक्षा न देता सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचं आहे? मग हे कोर्सेस करा | Medical Courses after 12th without NEET in marathi

12 वी कॉमर्स नंतर करा सर्वात जास्त पगार मिळवून देणारे हे कोर्स | Courses after 12th commerce with high salary in Marathi

पत्रकारितामध्ये डिप्लोमा | Diploma in Journalism

काळावधी: १-२ वर्षे

अभ्यासक्रम: पत्रकारिता तत्त्वे, बातमी लेखन, रिपोर्टिंग आणि संपादन यांचे मूलभूत ज्ञान.

पात्रता: १०+२ किंवा समकक्ष

पत्रकारिता आणि जनसंचार माध्यम संवादामध्ये डिप्लोमा | Diploma in Journalism and Mass Communication

काळावधी: १-२ वर्षे

अभ्यासक्रम: पत्रकारिता, जाहिरातबाजी, जनसंपर्क आणि जनसंचार माध्यमांचे इतर पैलू यांचा व्यापक अभ्यासक्रम.

पात्रता: १०+२ किंवा समकक्ष

पत्रकारिता पदवी (बी.जे.) | Bachelor of Journalism (BJ)

काळावधी: ३ वर्षे

अभ्यासक्रम : मुद्रित, प्रसारण आणि ऑनलाइन माध्यमांसह पत्रकारितेचा सखोल अभ्यास.

पात्रता: १०+२ किंवा समकक्ष

पत्रकारिता आणि जनसंचार माध्यम संवाद पदवी (बी.जे.एम.सी.) | Bachelor of Journalism and Mass Communication (BJMC)

काळावधी: ३ वर्षे

अभ्यासक्रम पत्रकारिता, जाहिरातबाजी, जनसंपर्क आणि जनसंचार माध्यमांचे इतर पैलू यांचा व्यापक अभ्यासक्रम.

पात्रता: १०+२ किंवा समकक्ष

जनसंचार माध्यम पदवी (बी.एम.एम.) | Bachelor of Mass Media (BMM)

काळावधी: ३-४ वर्षे

अभ्यासक्रम: पत्रकारिता, जाहिरातबाजी, जनसंपर्क, चित्रपट आणि दूरदर्शन यासह जनसंचार माध्यमांचे विविध पैलूंचा व्यापक अभ्यासक्रम.

पात्रता: १०+२ किंवा समकक्ष

पत्रकारिता पदव्युत्तर पदवी (एम.जे.) | Master of Journalism (MJ)

काळावधी: २ वर्षे

अभ्यासक्रम: पत्रकारिता, संशोधन आणि तपासणीदार पत्रकारिता, फोटोजर्नालिझम किंवा प्रसारण पत्रकारिता यासारख्या विशेष क्षेत्रांचा उच्च अभ्यास.

पात्रता: कोणत्याही विषयातील पदवी

पत्रकारिता आणि जनसंचार माध्यम संवाद पदव्युत्तर पदवी (एम.जे.एम.सी.) | Master of Journalism and Mass Communication (MJMC)

काळावधी: २ वर्षे

अभ्यासक्रम: पत्रकारिता आणि जाहिरातबाजी, जनसंपर्क आणि माध्यमांचे व्यवस्थापन यासारख्या जनसंचार माध्यमांचे इतर पैलूंचा उच्च अभ्यास.

पात्रता: कोणत्याही विषयातील पदवी

भारतातील पत्रकारिता अभ्यासक्रम ऑफर करणारी संस्था | Institutes Offering Journalism Courses in India

  • Indian Institute of Mass Communication (IIMC), New Delhi
  • Indian Institute of Journalism & New Media (IIJNM), Bengaluru
  • Xavier Institute of Communications (XIC), Mumbai
  • Asian College of Journalism (ACJ), Chennai
  • Symbiosis Institute of Media and Communication (SIMC), Pune
  • Amity School of Communication, Noida
  • Christ University, Bengaluru
  • St. Joseph’s College of Communication, Bengaluru
  • Jamia Millia Islamia, New Delhi

पत्रकारिता अभ्यासक्रम निवडताना तुमच्या आवडीनुसार, करिअर ध्येय आणि पत्रकारितेच्या कोणत्या विशिष्ट क्षेत्रात (राजकीय,खेळ, उद्योग, अर्थ,आरोग्य ) विशेषज्ञ व्हायचे आहे याचा विचार करा. विविध संस्था, त्यांचे प्राध्यापक, अभ्यासक्रम आणि प्लेसमेंट रेकॉर्ड्स यांचा सुद्धा बारकाईने विचार करा.

पत्रकारिता कोर्सेस ची फी | journalism courses, fees

पत्रकारितेसाठी विविध संस्थामध्ये आकारण्यात येणारी फी वेगवेगळी असू शकते. तुम्ही कोणता कोर्स करत आहात तसेच संस्थर्द्वारे देण्यात येणा-या सुविधा तसेच संस्था सरकारी आहे कि खाजगी या सर्व गोष्टींवर फी अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे या कोर्सेस ची फी पुढीलप्रमाणे असू शकते.

डिप्लोमा: 10,000 रुपये ते 50,000 रुपये

पदवी: 30,000 रुपये ते 2,00,000 रुपये

पदव्युत्तर: 50,000 रुपये ते 3,00,000 रुपये

पत्रकार बनण्यासाठी काही उपयुक्त टिप्स

  • मजबूत लेखन आणि संवाद कौशल्ये विकसित करा.
  • तुमच्या कार्याचे मजबूत पोर्टफोलिओ तयार करा.
  • क्षेत्रातील व्यावसायिकांशी संपर्क साधा.
  • चालू घडामोडी आणि उद्योगातील ट्रेंड्सबद्दल अद्ययावत रहा.

पत्रकारितेमधील योग्य क्षेत्र निवडून आणि काही महत्वाचे गुण तुम्ही जर आत्मसात केले तर या आव्हानात्मक क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकता.

पत्रकार बनण्यासाठी आवश्यक असलेले गुण

  • चांगले लेखन कौशल्य
  • संशोधन करण्याची क्षमता
  • मुलाखत घेण्याची कला
  • चांगले निरीक्षण करण्याची क्षमता
  • सत्यवादी आणि निष्पक्ष असणे
  • दबाव सहन करण्याची क्षमता
  • चांगले संवाद कौशल्य

निष्कर्ष : पत्रकारिता हे क्षेत्र खूप मोठे असून फक्त कोर्सेस करून यात यश मिळवता येत नाही. या क्षेत्रात येण्यासाठी काही गुण असणे आणि त्यांचा विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. जसे कि, संवाद कौशल्य, सामाजिक प्रश्नांची जाण आणि आवड, विविध आव्हाने स्वीकारण्याची सवय इ. वरील दिलेली माहितीचा वापर करून आपण योग्य संस्थेतून पत्रकारीतेचा कोर्स केला आणि या क्षेत्रातील बारकावे आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.