List of 10th Pass Govt Jobs in India in marathi : भारत हा असा देश आहे कि तिथे सरकारी नोकरीला खूपच डिमांड आहे. सरकारी कर्मांचार्यांना मिळणाऱ्या सुविधा, कामाची सुरक्षितता, चांगला पगार यामुळे प्रत्येकालाच सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असते. सरकारी नोकरीसाठी आपल्याला शिक्षण ही घ्यावे लागते,विविध परीक्षा सुद्धा द्याव्या लागतात आणि मग मेरिट नुसार तुमची निवड होत असते. काही सरकारी नोकऱ्या अशा आहेत कि तुम्ही फक्त 10 पास वर सुद्धा तिथे नोकरीसाठी पात्र ठरता. चला तर मग, आज आपण List of 10th Pass Govt Jobs in India in marathi बद्दल संपूर्ण माहिती पाहू या, जेणेकरून तुम्ही सुद्धा ई 10 वी पास वर सरकारी नोकरी मिळवू शकता.
List of 10th Pass Govt Jobs in India in marathi
केंद्र सरकार किंवा इतर राज्य सरकार यामध्ये काही असे डिपार्टमेंट आहेत कि जिथे विशिष्ठ पदांसाठी भरती करतांना इ 10 पास ही पात्रता असते. ही पात्रता करणारा कुणीही या ठिकाणी अर्ज करू शकतो. काही नोकऱ्या आशाअ आहेत कि तिथे कोणतीही परीक्षा न घेता आलेल्या अॅप्लिकेशन मधूनच इ 10 च्या गुणांच्या आधारे निवड केली जाती. तर इतर सरकारी नोकऱ्यांसाठी शक्यतो सामाईक परीक्षा घेतली जाते व त्यातील गुणांच्या आधारे निवड केली जाते. List of 10th Pass Govt Jobs in India in marathi ची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे आहे.
1) भारतीय डाक विभाग भरती | Indian Post Recruitment
जर तुम्ही 10 वी पास असाल तर भारतीय पोस्ट खात्यांमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS), मल्टि टास्किंग स्टाफ ही पदे इ 10 वी पास च्या पात्रतेवर असतात. यामध्ये ग्रामीण डाक सेवक ची पदे ही इ 10 च्या गुणांवर डायरेक्ट भरली जातात. तुम्ही सुद्धा 10 वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला पोस्ट खात्यात सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्ही या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. ज्यावेळी भरती निघते त्यावेळी भारतील पोस्ट खात्याच्या अधिकृत वेबसाइटवर भरती संबंधी सूचना आणि जाहिरात दिली जाते.
भारतीय रेल्वे मध्ये नोकरी | Indian Railway Bharati
आपल्याला माहिती आहे कि ‘भारतीय रेल्वे’ हे आपल्या देशातील सर्वात जास्त सरकारी जॉब देणारे डीपार्टमेंट आहे. भारतीय रेल्वे ही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते. यामध्ये 10 वी पास वर टेक्निशीयन, ट्रकमन, गँगमन, पॉइंटसमन,पोर्टर, हेल्पर इत्यादि प्रकारची पदे असतात. तसेच रेल्वे सुरक्षा दलामध्ये सुद्धा 10 वी पास वर भरती असते. तुम्ही सुद्धा 10 वी पास असाल आणि तुमचे वयाची 18 वर्षे पूर्ण झाली असतील तर आणि तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट वरुन ऑनलाइन अर्ज करू शकता.
पोलिस दलामध्ये नोकरी | Police Bharati
विविध राज्यांमध्ये पोलिस भरती नेहमी होत असतात. काही राज्यांमध्ये पोलिस भरती ही 10 वी पास च्या पात्रतेवर सुद्धा होते. पोलिस विभागात सुद्धा अनेक प्रकारची पदे असतात ज्यांची पात्रता ही 10 वी पास अशी असते. पोलिस डिपार्टमेंट मधील कारागृह विभागात सुद्धा अनेक प्रकारची पदे 10 वी पास वर असतात. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दळामद्धे सुद्धा 10 वी पास वर जागा असतात. अधिक माहिती साठी तुम्ही महाराष्ट्र पोलिस विभागाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देवू शकता.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत सरकारी नोकरी | MSEB
महाराष्ट्र राज्याच्या तसेच इतर राज्यांच्या वीज मंडळात सुद्धा ‘विद्युत सहायक’ वायरमन अशा प्रकारची पदे असतात जिथे तुम्ही 10 वी पास वर अर्ज करू शकता. यातील पदांना 10 वी बरोबर आयटीआय ची सुद्धा आवश्यकता असते. तुम्ही जर 10 वी नंतर संबंधित ट्रेड मधील ITI अभ्यासक्रम उत्तीर्ण केला असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. अधिक माहिती साठी पुढील वेबसाईट्स बघू शकता https://www.mahadiscom.in/
भारतीय सैन्य अग्नीवीर भरती | Agniveer Bharti
भारत सरकारने भारतीय सैन्यामध्ये अग्नीवीर ही नवीन योजना आणली आहे. यामध्ये भारतीय सैन्याच्या वायू,भू-दल तसेच नेव्ही सारख्या दलांमध्ये इच्छुक उमेदवारांची भरती केली जाते. यामध्ये सुद्धा 10 वी पास वर पदे असतात. आधिक माहिती साठी आपण अग्नीवीर च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन माहिती पाहू शकता. या भरती साथी सुद्धा ऑनलाइन अर्ज करावा लागतो त्यानंतर परीक्षा व शारीरिक चाचण्या होतात व त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जाते. सविस्तर माहितीसाठी या वेबसाईट्स ना भेट द्या.. https://www.joinindiannavy.gov.in/page/agniveer-ways-to-join.html https://www.joinindianarmy.nic.in/ https://agniveernavy.cdac.in/
वन विभाग भरती | Forest Department Bharati
वन विभाग मध्ये अनेक राज्यात ‘वनरक्षक’ तसेच लघुलेखक या पदासाठी 10 वी पास ही पात्रता असते. जर तुमच्याकडे या पदासाठी आवश्यक असलेली शारीरिक पात्रता असेल आणि तुम्हाला वन विभागामध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही जेव्हा या विभागात भरती जाहिर होईल त्यावेळी ऑनलाइन अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी वेबसाईट्स ना भेट द्या. https://mahaforest.gov.in/ https://ifs.nic.in/
आरोग्य विभागातील भरती | Arogya Vibhag Bharati
अनेक राज्यांच्या आरोग्य विभागात ग्रुप ड च्या पदांसाठी 10 वी पास ही पात्रता असते. महाराष्ट्र राज्यातही नुकतीच आरोग्य विभागाच्या वतीने खूप मोठी भरती पार पडली. त्यामध्ये सुद्धा 10 पास वर अनेक पदे उपलब्ध होती. थोडक्यात तुम्हाला सुद्धा आरोग्य विभागात सरकारी नोकरी करायची असेल तर इथे तुम्ही अर्ज करू शकता. त्यासाठी आरोग्य विभागाच्या वेबसाइटला नेहमी भेट देत रहा, जेणेकरून कोणतीही भरती तुमच्या नजरेतून सुटणार नाही.
कृषि विभाग भरती | Krushi Vibhag Bharati
आपल्या देशात अनेक राज्यांमध्ये कृषि विभागातील काही पदे 10 वी पास वर भरण्यात येतात. तुम्हाला जर कृषी संबंधित क्षेत्रात काम करायला आवडणार असेल तर तुम्ही या विभागात भरतीच्या वेळी अर्ज नक्की करा. भरतीच्या अधिक माहिती साठी महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाच्या वेबसाइट ला भेट द्या जेणेकरून भरती केव्हा निघणार आहे व किती जागा आहेत पात्रता काय लाहाते यांची संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल.
अशा प्रकारे अजून खूप सरकारी नोकऱ्या आहेत जिथे फक्त 10 वी पास ही पात्रता असते. आम्ही इथे फक्त काही महत्वाच्याच सरकारी विभागांचाच List of 10th Pass Govt Jobs in India in marathi मध्ये समावेश केलेला आहे. विविध जॉब वेबसाईट्स ना नेहमी भेट देत राहिल्यास त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या 10 वी पास वर असण्याऱ्या सर्व भरत्यांची माहिती मिळून जाईल जेणे करून तुम्ही List of 10th Pass Govt Jobs in India in marathi पासून वंचित नाही राहणार.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
१० वी पास वर कोणते सरकारी जॉब आहेत?
ई १० वी पास या पात्रतेवर पुढील सरकारी विभागात वेळोवेळी भारती जाहीर केली जाते.
इंडियन पोस्ट
रेल्वे विभाग
भारतीय सैन्य विभाग
वन विभाग
पोलीस दल
केंद्रीय राखीव दल
सशस्त्र सीमा दल
विद्युत विभाग
कृषी विभाग
आरोग्य विभाग
विविध सरकारी कंपन्या
निष्कर्ष : List of 10th Pass Govt Jobs in India in marathi
सरकारी नोकरी करणे प्रत्येकालाच हवे आहे याच महत्वाच कारण म्हणजे नोकरीची सुरक्षितता. आपापल्या शिक्षणानुसार प्रत्येकालाच सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येतो. सरकारी भरतीमध्ये फक्त क्लास १ व क्लास २ हीच पडे नसतात तर क्लास 3 व क्लास ४ पडे सुद्धा असतात, जिथे १० वी पास या पात्रतेवर आपण अर्ज करू शकतो. तुम्हाला १० वी नंतर पुढील शिक्षण सुद्धा घ्यायचं असेल तर तुम्ही १२ वी नंतरचे सर्वोत्तम डिप्लोमा कोर्स करू शकता. १२ वी नंतर कोण कोणत्या क्षेत्रात उत्तम संधी आहेत याची सुद्धा माहिती घ्या, जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचे करियर सेट करू शकता. List of 10th Pass Govt Jobs in India in marathi ची माहिती तुम्हाला कशी वाटली व तुमच्या मनात अजून काही प्रश असतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा पोचवा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी रिकामा खिसा ला नक्की भेट द्या. तसेच आमचे Instagram Page, Facebook Page तसेच You Tube Channel सुद्धा नक्की फॉलो करा.
हे पण वाचा :
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024