महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा MHT CET (PCB) साठीचे प्रवेशपत्र जाहीर , लगेच डाऊनलोड करा | MHT CET Admit card 2024

MHT CET Admit card : मित्रांनो, जे विद्यार्थी आता 12 वी पूर्ण करून पुढे इंजिनियरिंग किंवा मेडिकल साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत, व ज्यांनी महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा सेल (State Common Entrance Test Cell) यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या MHT CET प्रवेश परीक्षेचा फिजिक्स केमिस्ट्रि आणि बायोलॉजी (PCB) ग्रुप चा फॉर्म भरलेला आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे MHT CET Admit card (PCB Group) हे महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा सेल च्या mahacet.org या अधिकृत वेबसाइट वर विद्यार्थ्यंना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा सेल च्या वेबसाइटवर जाऊन लॉगिन करून आपले MHT CET Admit card डाउनलोड करून घ्यायचे आहेत.

MHT CET Admit card | महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी सीईटी) 2024 PCB ग्रुप साठी प्रवेश पत्र जाहीर

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल मार्फत फिजिक्स केमिस्ट्रि बायोलॉजी (पीसीबी) ग्रुप साठी प्रवेश पत्र MHT CET Admit card (PCB Group) त्यांच्या https://cetcell.mahacet.org/ या वेबसाइट वर जाहीर केले आहेत.

विद्यार्थ्यांना MHT CET Admit card डाउनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक (Application Number) आणि पासवर्ड ची आवश्यकता असणार आहे.

MHT CET 2024 (फिजिक्स केमिस्ट्रि बायोलॉजी गटासाठी) ही परीक्षा एप्रिल मध्ये 22,23,24,28,29 आणि 30 या तारखांना होणार आहे.

परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रासोबतच एक फोटो असलेले एक अधिकृत ओळखपत्र बाळगावे लागणार आहे. यामध्ये आधार कार्ड,पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एखादे ओळखपत्र सोबत चालणार आहे.

हे पण वाचा : UPI म्हणजे काय ? | What is UPI in Marathi

प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करावे | How to download MHT CET Admit card

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी गूगल वर maharastra cet sell सर्च करा किंवा डायरेक्ट https://cetcell.mahacet.org/ या वेबसाइटवर जा.

त्या वेबसाइट वर असलेल्या उमेदवार पोर्टल वर जा.

तिथे आपले लॉगिन माहिती म्हणजेच यूजर नेम आणि पासवर्ड टाका व लॉगिन करा आणि प्रवेशपत्र या लिंक वर क्लिक करा.

यानंतर तुमचे प्रवेशपत्र (MHT CET Admit card) समोर दिसेल तो डाऊनलोड करा व त्यांची प्रिंट घ्या.

परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे | MHT CET (PCB) Exam Pattern

परीक्षा ही संगणकावर ऑनलाइन (Computer Based Test) असणार आहे.

प्रश्नांचे स्वरूप ‘बहुपर्यायी (Multiple Choice Questions)’ असे असणार आहे.

चुकलेल्या प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्क ची पद्धत नसणार आहे.

परीक्षा ही एकूण 200 गुणांची (फिजिक्स आणि केमिस्ट्री 100 व बायोलॉजी 100 गुण) असून त्यासाठी 3 तास ( 180 मिनिटे) इतका वेळ असणार आहे.

परीक्षेमध्ये दोन विभाग असून एक विभागात फिजिक्स आणि केमिस्ट्री चे प्रश्न व दुसऱ्या विभागात बायोलॉजी चे प्रश्न असणार आहेत.

हे वाचा : 65 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मिळणार 3000 रुपये | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

अभ्यासक्रम काय असणार आहे | MHT CET Exam Syllabas

MHT CET 2024 (PCB ग्रुप) या परीक्षेसाठी 2023-24 या वर्षातील इ.12 वी वर्गातील फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांचा सर्व अभ्यासक्रम असणार आहे. संपूर्ण परीक्षेमध्ये 80 % वेटेज हे 12 वी च्या अभ्यासक्रमाला असणार आहे.

तसेच या परीक्षेत सन 2022-23 मधील इयत्ता 11 वी वर्गातील संबंधित विषयांतील अभ्यासक्रमाचा सुद्धा समावेश असणार आहे. 11 वी च्या अभ्यासक्रमाला या परीक्षेत सुमारे 20 % प्राधान्य असणार आहे.

इयत्ता 11 वी मधील पुढील ठराविक प्रकरणांचा या परीक्षेत समावेश असणार आहे

Physics :- Motion in a plane, Laws of Motion, Gravitation, thermal properties
of matter, Sound, Optics, Electrostatics, Semiconductors

Chemistry :- Some basic concepts of Chemistry, Structure of atom, Chemical Bonding, Redox reactions, Elements of group 1 and 2, States of Matter (Gaseous and Liquids), Adsorption and Colloids (Surface Chemistry), Hydrocarbons, Basic principles of organic chemistry.

Biology :- Biomolecules, Respiration and Energy Transfer, Human Nutrition,
Excretion and Osmoregulation

महत्वाच्या तारखा | MHT CET 2024 Exam Dates

एमएचटी सीइटी 2024 (PCB) ही परीक्षा 22,23 24,28,29 आणि 30 एप्रिल या दिवशी होणार आहे.

अधिकृत वेबसाइट | MHT CET Official Website

https://cetcell.mahacet.org/

महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा सेल

Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions (Regulation of Admissions and Fees) Act ,2015 च्या सेक्शन 10 नुसार महाराष्ट्र शासनाने State Comman Entrance Test Cell ची स्थापना केली आहे. या CET सेल मार्फत राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते व पार पाडली जाते

महत्वाची सूचना | Important Notice

वरील सर्व माहिती ही https://cetcell.mahacet.org/ या वेबसाइट वरील MHT CET 2024 च्या अधिकृत सूचनेवरून दिली आहे. अधिक माहितीसाठी आणि अद्ययावत माहितीसाठी प्रत्यक्ष अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

MHT CET 2024 PCB ही परीक्षा केव्हा होणार आहे?

MHT CET 2024 PCB गट ही परीक्षा 22,23,24,28,29,30 एप्रिल या दिवशी होणार आहे.

MHT CET 2024 ही परीक्षा कोणामार्फत घेण्यात येते ?

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल मार्फत ही परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र शासनामार्फत या सेल ची निर्मिती झाली आहे.

You May also Like :