हे कोर्स करा आणि बँकेमध्ये जॉब मिळवा | Top demanded courses in banking Information in Marathi

बँकिंग मध्ये करियर करू इच्छिता ? तुम्ही आताच 12 वी किंवा ग्रॅजुएशन पूर्ण केले आहे आणि तुम्हाला बँकिंग क्षेत्रात जॉब मिळवायचा आहे, तर आजची पोस्ट ही खास तुमच्या साठी आहे. आजच्या या पोस्ट मध्ये 12 वी नंतर किंवा पदवी नंतर बँकिंग क्षेत्रातील Top demanded courses in banking Information in Marathi कोर्सेस बद्दल Top Banking Courses Information in Marathi) संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत ही पोस्ट पूर्ण वाचा.

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये बँकिंग क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावत आहे. दिवसेंदिवस बँकामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा व सेवा यांमध्ये वाढ होत आहे. सर्वांपर्यंत आर्थिक लाभ पोचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते ओपन करण्याकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात या क्षेत्रातील विशेष कौशल्य असणाऱ्या माणसांची गरज वाढतच जाणार आहे. त्यासाठी आजच्या पोस्ट मध्ये आपण Banking Courses in details पाहणार आहोत.

10 वी नंतर बँकिंग मधील कोर्स

  • बँकिंग आणि फायनान्स मध्ये डिप्लोमा
  • डिप्लोमा इन बँकिंग मॅनेजमेंट
  • बँकिंग सुरक्षा डिप्लोमा
  • बँकिंग आणि वित्तीय सेवा मध्ये डिप्लोमा
  • बँकिंग आणि फायनान्स लॉ मध्ये डिप्लोमा
  • व्यावसायिक बँकिंगमधील व्यावसायिक कार्यक्रम (PPCB)
  • बँकिंग आणि सेवा व्यवस्थापन मध्ये डिप्लोमा
  • बँकिंग कायदे आणि कर्ज व्यवस्थापनातील प्रगत प्रमाणपत्र

हे पण वाचा :

बँक म्हणजे काय ? बँकेविषयी संपूर्ण माहिती bank in marathi

हे आहेत भारतातील टॉप चे MBA कॉलेज ! इथून MBA केले तर लाखोंची नोकरी पक्की | Top mba colleges in india list

१० वी पास वर मिळवा सरकारी जॉब | List of 10th Pass Govt Jobs in India in marathi

हे आहेत 12 नंतरचे सर्वोत्तम डिप्लोमा कोर्सेस | Diploma courses after 12th in Marathi

12 वी नंतर पदवी कोर्सेस | Top 10 Certificate Courses in Banking

  • बी. ए. (बँकिंग & फायनान्स)
  • बी. ए. (बँकिंग & फायनान्शियल प्लॅनिंग)
  • बी. ए. (इंटरनॅशनल फायनान्स & बँकिंग)
  • बी.बी.ए ( फायनान्स & बँकिंग )
  • बी.कॉम (बँकिंग)
  • बी.एस.सी (बँकिंग & फायनान्स)
  • बी.एस.सी (एकॉनॉमिक्स विथ बँकिंग)
  • बी. एस.सी (मनी, बँकिंग & फायनान्स)
  • बॅचलर ऑफ बिझनेस (बँकिंग)
  • बॅचलर ऑफ बिझनेस (बँकिंग & फायनान्स)
  • बॅचलर ऑफ बिझनेस & कॉमर्स (बँकिंग & फायनान्स)

पदवी नंतरचे कोर्स | Banking courses after BCom or graduation

पदवीपर्यंतच्या कोर्सेस मध्ये संपूर्ण बँकिग क्षेत्राविषयी एकत्रितपणे अभ्यासक्रम शिकवला जातो,तर post graduation courses in banking मध्ये विद्यार्थ्याच्या इंटरेस्ट नुसार ठराविक विषयात स्पेशलायझेशन केलं जातं.

  • एम.कॉम (बँकिंग)
  • एम.बी.ए (बँकिंग & फायनान्स)
  • एम.बी.ए (ग्लोबल बँकिंग & फायनान्स)
  • एम.बी.ए (इस्लामिक बँकिंग & फायनान्स)
  • एम.एससी (फायनान्शियल सर्विसेस ईन बँकिंग)
  • एम.एससी (बँकिंग & फायनान्स)
  • एम.एससी (फायनान्शियल बँकिंग & इन्शुरेंस)
  • एम.एससी (बँकिंग & रिस्क)
  • एम.एससी (ग्लोबल बँकिंग & फायनान्स)
  • एम.एससी (इस्लामिक बँकिंग & फायनान्स)
  • एम.एससी (बँकिंग,फायनान्स & रिस्क मॅनेजमेंट)
  • एम.एससी (बिझनेस इकोनॉमिक्स,फायनान्स & बँकिंग)
  • एम.एससी (इंटरनॅशनल बँकिंग & फायनान्स)
  • मास्टर ऑफ बँकिंग & फायनान्स लॉ
  • मास्टर ऑफ लॉ ईन इंटरनॅशनल बँकिंग
  • पी.एच.डी (बँकिंग / अकाउंटिंग / फायनान्स /इकोनॉमिक्स /मॅनेजमेंट स्टडिज )
  • पी.एच.डी (बिझनेस अॅडमिनिसट्रेशन – बँकिंग & फायनान्स )

बँकिंग मधील डिप्लोमा कोर्सेस | Diploma Courses in Banking

  • Graduate Certificate in Banking Security
  • Graduate Certificate of Finance and Banking
  • Diploma in Banking Services Management
  • Graduate Diploma in Banking and Finance Law
  • Graduate Diploma in Banking
  • Post Degree Diploma in Economics and Global Banking

बँकिंग मधील कमी कालावधीचे कोर्सेस | Short Term Banking Courses

कोर्स चे नाव कालावधी
PGDRB – Post Graduate Diploma in Retail Banking3 months classes + 3 months internship
Short-term Post Graduate Diploma in Banking Operations3 months classes + 3 months internship
Professional Programme in Commercial Banking (PPCB)2 months
Short-term Post Graduate Diploma in Banking3 months classes + 3 months internship
Advanced Certificate in Banking Laws and Loan Management3 months

बँकिंग कोर्स नंतर मिळणारे जॉब | Job in bank

Top demanded courses in banking Information in Marathi

बँकिंग क्षेत्र हे भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. म्हणून यात कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे. वरील प्रमाणे बँकिंग मधील कोर्सेस केल्यानंतर विद्यार्थ्यंना साधारणपणे पुढील जॉब मिळू शकतात.

  • बँकेमध्ये आसिस्टंट मॅनेजर
  • खूप जास्त इन्कम असलेल्या व्यक्तींसाठी पर्सनल बँकर
  • म्युच्युअल फंड ॅडव्हायजर आणि डिस्ट्रिब्युटर
  • वेल्थ मॅनेजर
  • ब्रोकर
  • गुंतवणूक सल्लागार
  • बँकेमध्ये कॅशियर
  • बँकेमध्ये सेल्स एक्झिक्युटीव्ह

बँकिंग कोर्स करतांना या गोष्टी विचारात घ्या | What to Consider When Choosing a Banking Course?

मित्रांनो, आपण वर पाहिल्याप्रमाणे खूप सारे बँकिंग कोर्सेस उपलब्ध आहेत. काही शासकीय संस्थांमध्ये तर काही खाजगी संस्थामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. परंतु, तुम्हाला जर यापैकी कोणातही बँकिंग कोर्स जॉइन करायचं असेल तर आपण काही गोष्टी तपासणे आवश्यक आहे,त्या पुढीलप्रमाणे.

कोर्स ची फी (प्रवेश शुल्क)

कोणताही बँकिंग कोर्स जॉइन करतांना त्या कोर्स ची फी हा एक अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. बरेच ऑनलाइन कोर्स मध्ये फी खूप कमी असते,मात्र ऑफलाइन कोर्स साठी जास्त फी आकारली जाते.

तसेच आपण भरत असलेल्या कोर्स फी मध्ये आपल्याला अभ्यास साहित्य, परीक्षा फी, व्हिडिओ लेसन्स, मासिक/त्रैमासिक चाचण्या या सर्वांची फी अंतर्भूत आहे का हे तपासून घ्या.

बरेच इंस्टिट्यूट हे आपल्याला फी EMI स्वरूपात भरायची सोय उपलब्ध करून देतात, ज्यामुळे आपल्याला फी भरणे सोयीचे जाते.

शिक्षकांची गुणवत्ता

कोणत्याही कोर्स मध्ये प्रवेश घेतांना आपण तेथील शिक्षकांची गुणवत्ता विचारात घेणे आवश्यक आहे. जर शिक्षक कुशल आणि अनुभवी असतील तर त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान ते आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात.

तुम्ही त्या शिक्षकांचे प्रोफाइल मधून त्यांचे शिक्षण,अनुभव या सर्व गोष्टी पाहू शकता. ऑनलाइन कोर्सेस च्या बाबतीत तेथील शिक्षकांचे रेटिंग्स, आधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, या गोष्टी विचारात घेता येतील

स्किल

तुम्ही प्रवेश घेत असालेल्या कोर्स मधून तुम्ही नेमक कोणते स्किल शिकणार आहात कि जे तुम्हाला नंतर जॉब साठी उपयुक्त पडणार आहे, हे तपासून घ्या. बँक इंडस्ट्री मध्ये कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, त्यामुळे ते इंस्टीट्यूट कोणत्या विषयात आपली कुशलता वाढवणार आहे हे महत्वाचे आहे.

इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS)

Top demanded courses in banking Information in Marathi

बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालायाच्या देखरेखीखाली काम करणारी संस्था आहे. सार्वजनिक तसेच खाजगी बँकांमध्ये कुशल अधिकारी आणि कर्मचारी यांची परीक्षा घेऊन निवड करणे हे या संस्थेचे काम आहे. IBPS मार्फत देशभरात बँकिंग कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठी परीक्षा आयोजित केल्या जातात. बँकिंग क्षेत्रातील क्लास 1,2 &3 या वर्गातील पदे भरण्यासाठी IBPS मार्फत निवड प्रक्रिया राबवली जाते.

पदवी पूर्ण केल्यानंतर कोणताही विद्यार्थी IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सहभागी होऊन बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब करू शकतो.

FAQ-नेहमी विचारले जाणारे प्रश्न

बारावीनंतर बँक कर्मचारी कसे व्हावे?

बारावीनंतर बँकिंग क्षेत्रात काम करण्यासाठी वर सुचविल्याप्रमाणे बँकिंग संबंधित विषयात पदवी पूर्ण करू शकता. त्यानंतर सार्वजनिक बँकेमध्ये जॉब करण्यासाठी IBPS घेण्यात येणाऱ्या बँकिंग परीक्षांची तयारी करा. किंवा खाजगी बँकांमध्ये काम करण्यासाठी बँकिंग मधील विषयात पदव्युत्तर पदवी घेऊ शकता.


बँकेत करिअर कसे सुरू करावे?

बँकेत करियर सुरू करण्यासाठी बँकिंग , अर्थशास्त्र , वित्त , वाणिज्य यांसारख्या बँकिंग संबंधित कोणत्याही विषयात पदवी प्राप्त करा. पदवीनंतर सार्वजनिक बॅंकामध्ये काम करण्यासाठी IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या बँकिंग परीक्षांची तयारी करा. बँकिंग संबंधित एखाद्या विषयात स्पेशलायझेशन करून तुम्ही खाजगी बँकेमध्ये सुद्धा जॉब मिळू शकतो.

निष्कर्ष:

आज आपण या पोस्ट मध्ये Top demanded courses in banking Information in Marathi बद्दल संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला सुद्धा वरीलपैकी एखादा कोर्स जॉइन करायचं असेल तर त्या संबंधी आधी संपूर्ण माहिती घ्या आणि पूर्ण खात्री केल्यानंतरच कोर्स जॉइन करा,जेणेकरून तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक न होता तुम्ही योग्य career in banking घडवू शकाल. तुम्हाला ही माहिती काशी वाटली आणि बँकिंग कोर्स विषयी आणखी काही माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, आणि आपल्या मित्रांनाही ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन उपयुक्त माहिती वाचण्यासाठी रिकामा खिसा सोबत कनेक्ट रहा.

धन्यवाद !