हे आहेत भारतातील टॉप चे MBA कॉलेज ! इथून MBA केले तर लाखोंची नोकरी पक्की | Top mba colleges in india list

Top MBA colleges in India list : हल्ली बरेच जण पदवी नंतर MBA (Master in Business Administration) करण्याचा विचार करतात. परंतु बऱ्याच वेळा चांगल्या कॉलेज ला प्रवेश न घेतल्यामुळे त्याचा हवा तसा फायदा होत नाही. खूप जणांना आपल्या देशातील Top mba colleges in india list माहिती नसते, त्यामळे ते योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यासाठी आज आपण भारतातील सर्वात टॉप चे MBA कॉलेज कोणते आहेत की जेथे ॲडमिशन घेतल्यानंतर व एमबीए पूर्ण केल्यानंतर आपल्याला लाखोंचे पॅकेज मिळू शकते, याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

हे आहेत भारतातील टॉप चे MBA कॉलेज ! इथून MBA केले तर लाखोंची नोकरी पक्की | Top mba colleges in india list

Top MBA colleges in India list

मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) ही भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत येणारे एक संस्था आहे जिच्या मार्फत विविध मुद्द्यांच्या आधारे वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या इन्स्टिट्यूटची रँकिंग ठरवली जाते. या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) नुसार आपल्या भारतामध्ये Top mba colleges in india list आपण पाहणार आहोत.

Telegram GroupLink
Whatsapp ChannelLink

NIRF Ranking 2024

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट , अहमदाबाद राज्य – गुजरात , स्कोअर – 83.20 , रॅंक – 1
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट , बंगळुरू राज्य – कर्नाटक, स्कोअर – 80.89 , रॅंक – 2
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोडे राज्य – केरळ, स्कोअर – 76.48 , रॅंक – 3
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कलकत्ता राज्य – पश्चिम बंगाल, स्कोअर – 75.53 , रॅंक – 4
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली राज्य – दिल्ली, स्कोअर – 74.14 , रॅंक – 5
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनऊ राज्य – उत्तर प्रदेश, स्कोअर – 74.11 , रॅंक – 6
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग, मुंबई राज्य – महाराष्ट्र, स्कोअर – 71.99 , रॅंक – 7
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर राज्य – मध्यप्रदेश, स्कोअर – 71.95 , रॅंक – 8
  • एक्स एल आर आय-झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट,जमशेदपूर राज्य – झारखंड, स्कोअर – 70.75 , रॅंक – 9
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई राज्य – महाराष्ट्र, स्कोअर – 68.11 , रॅंक – 10
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रायपुर राज्य – छत्तीसगड, स्कोअर – 66.18 , रॅंक – 11
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रोहतक राज्य – हरियाणा, स्कोअर – 65.88 , रॅंक – 12
  • मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट,गुरग्राम राज्य – हरियाणा, स्कोअर – 64.88 , रॅंक – 13
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर राज्य – पश्चिम बंगाल, स्कोअर – 63.92 , रॅंक – 14
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास राज्य – तामिळनाडू, स्कोअर – 62.83 , रॅंक – 15
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, उदयपूर राज्य – राजस्थान, स्कोअर – 62.78 , रॅंक – 16
  • सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट,पुणे राज्य – महाराष्ट्र, स्कोअर – 62.74 , रॅंक – 17

हे पण वाचा :

१० वी पास वर मिळवा सरकारी जॉब | List of 10th Pass Govt Jobs in India in marathi
हे आहेत 12 नंतरचे सर्वोत्तम डिप्लोमा कोर्सेस | Diploma courses after 12th in Marathi
गुगल मध्ये जॉब करायचं आहे ? एवढं करा, जॉब नक्की ! | How to apply for job in google company in marathi
शिक्षक व्हायचा विचार करताय ? हे आहेत 12 वी नंतरचे उत्तम कोर्सेस | Career in teacher training after 12th in Marathi

नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)

नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क या संस्थेची स्थापना 29 सप्टेंबर 2015 रोजी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट च्या मान्यतेने झाली आहे. ही संस्था संपूर्ण भारतभरातील विविध शैक्षणिक संस्थांचे रँकिंग ठरवते. ही रँकिंग ठरवताना ते ‘टिचिंग लर्निंग अँड रिसोर्सेस, रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिसेस, ग्रॅज्युएशन आउटकम्स, आउटरीच अँड इन्क्लुझिविटी, आणि परसेप्शन या निकषांचा विचार केला जातो. त्या संस्थेमार्फत फक्त मॅनेजमेंटच नाही तर इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, डेंटल, लॉ, आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग, एग्रीकल्चर अँड सेक्टर्स अशा प्रकारच्या अनेक अभ्यासक्रमांच्या संस्थांचे रँकिंग जाहीर केले जाते. याचा वापर विद्यार्थ्यांना भविष्यात या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी होऊ शकतो. आपण कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याआधी जर नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क ने जाहीर केलेल्या संस्थांची रँकिंग बघितली तर निश्चितच आपल्याला योग्य इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेता येईल.

MBAम्हणजे काय ? | MBA information in Marathi

top MBA collage in India

एमबीए म्हणजेच मास्टर्स इन बिझनेस अॅडमिनिसट्रेशन होय. ही व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी असते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायातील फायनान्स, ह्युमन रिसोर्स, ऑपरेशन्स, बिझनेस स्ट्रॅटजी हे पैलू शिकवले जातात. विद्यार्थी यापैकी कोणत्याही विषयात MBA करू शकतात. उत्तम व्यवसायासाठी आवश्यक असणारी कौशल्ये जसे कि, नेतृत्व गुण,संघटन कौशल्य, टीम वर्क,समस्या सोडवणे,निर्णय घेणे ही विकसित करण्यावर MBA मध्ये भर दिला जातो.

MBA ला प्रवेश कसा घ्यावा | How to take admission for MBA

मास्टर्स ईन बिझनेस अॅडमिनिसट्रेशन (MBA) अभ्यासक्रम साठी प्रवेश घेण्यासाठी प्रथमतः कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. पुढे जर आपल्याला MBA करायचे असेल तर त्यासाठी CAT, XAT, MAT, ATMA, CMAT यां सारख्या प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तसेच काही विद्यापीठांकडून स्वतंत्र प्रवेश परीक्षा सुद्धा घेतल्या जातात.

यानंतर तुम्हाला प्रवेश परिक्षेतील गुणांच्या आधारावर MBA प्रवेशासाठी संबंधित विद्यापीठात अर्ज करावा लागतो. काही ठिकाणी प्रवेशासाठी मुलाखत सुद्धा घेतली जाते.

तुम्ही तुमच्या सोयीनुसार पूर्णवेळ एमबीए किंवा अंशतः वेळ एमबीए करू शकता. तसेच काही विद्यापीठां मार्फत ऑनलाइन MBA सुद्धा ऑफर केला जातो, जिथे विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार ऑनलाइन वर्गांसाठी हजर राहू शकतात. ऑनलाइन MBA करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

MBA करण्याचे फायदे | Benefits Of MBA

  • MBA मध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायतील विविध पैलू जसे कि, फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, बिझनेस स्ट्रॅटजी शिकवले जातात. कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी या गोष्टींचे ज्ञान असणे कोणत्याही व्यवसायी कासाठी आवश्यक आहे.
  • MBA अभ्यासक्रमातून परिणामकारक संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, निर्णय क्षमता, संघटन कौशल्य, टीम वर्क यांसारखी महत्वपूर्ण कौशल्ये विकसित होण्यास मदत होते.
  • चांगल्या संस्थेतून MBA अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अनेक नामांकित कंपन्यांमध्ये लाखोंचे पॅकेजेस असलेल्या नोकऱ्या मिळू शकतात, तसेच आपल्या करियर मध्ये प्रगतीच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतात
  • तसेच MBA च्या माध्यमातून आपला संपर्क अनेक विद्यार्थी, व्यावसायिक यांच्याशी येत असतो. त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते तसेच आपला संपर्क सुद्धा वाढतो ज्याचा फायदा आपल्याला आपल्या करियर मधील प्रगतीसाठी होतो.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न


कोणी MBA करू शकतो का?

MBA करण्यासाठी तो विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. त्यानंतर एमबीए ला प्रवेश घेण्यासाठी CAT, XAT, MAT, ATMA, CMAT यां सारख्या प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तसेच काही विद्यापीठांकडून स्वतंत्र प्रवेश परीक्षा सुद्धा घेतल्या जातात. त्यानंतर प्रवेशासाठी ची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गुणवत्तेनुसार आपल्याला MBA ला प्रवेश मिळतो.


एमबीए किती वर्षे पूर्ण करायचे?

MBA अभ्यासक्रम हा साधारण 2 वर्षांचा असतो. काही विद्यापीठा मध्ये आपल्याला पूर्ण वेळ MBA किंवा अंशतः वेळ MBA करण्याची सुविधा मिळते.

MBA चा फुल फॉर्म काय आहे?

MBA म्हणजेच Master in Business Administration होय. यालाच मराठीत व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी असे सुद्धा म्हणतात.

निष्कर्ष :

भारतामध्ये बऱ्याच इंस्टीट्यूट मध्ये MBA अभ्यासक्रम शिकवला जातो,परंतु त्या इंस्टीट्यूट ची मान्यता,तिथे दिल्या जाणाऱ्या सुविधा, तेथील शिक्षणाचा दर्जा,NIRF ची Ranking या सर्व गोष्टी आपण नीट तपासून पाहणे गरजेचे आहे. कारण MBA पूर्ण केल्यानंतर आपल्याला नोकरी मिळेल कि नाही,किंवा किती पगाराची मिळेल हे याच गोष्टींवर अवलंबून आहे. बरेच विद्यार्थी परदेशात सुद्धा एमबीए करण्यासाठी जातात. तिथे सुद्धा प्रवेश घेतांना यअ सर्व गोष्टी तपासून घ्या. तुम्हाला जर एमबीए व्यतिरिक्त विविध डिप्लोमा कोर्स करायचे असतील तर त्याची सुद्धा माहिती येथे वाचा. तुमच्या मध्ये अजून कोणते स्किल असतील तर तुम्ही गूगल सारख्या कंपनीत सुद्धा जॉब मिळवू शकता,गूगल मध्ये जॉब साठी अर्ज कसा करायचं, याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तुम्हाला Top MBA colleges in India list बद्दलची माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद !

हे पण वाचा :