प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्था कोणत्याही माणसाला कर्ज देण्याआधी त्याचा CIBIL स्कोर तपासून बघत असते.

CIBIL या शब्दाचा फुल फॉर्म आहे ‘ क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ ( Credit Information Bureo India Limited ) असा आहे. सिबिल स्कोर ला क्रेडिट स्कोर असेही म्हटले जाते.

CIBIL म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही भारतातील एक प्रमुख पत मापन करणारी (Credit Rating) संस्था आहे जीची स्थापना सन 2000 मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या शिफारसी ने झाली आहे.

CIBIL Score हा एक तीन अंकी नंबर असतो. CIBIL मार्फत प्रत्येक व्यक्तीला एक तीन अंकी नंबर दिला जातो, जो 300 ते 900 च्या दरम्यान असतो.

जितका तुमचा Cibil Score जास्त म्हणजेच 900 च्या जवळ असेल तितका तुम्हाला कर्ज सहज आणि लवकर मिळू शकते व त्यावर व्याजदर ही कमी लागते.

बऱ्याचदा कमी Cibil Score असलेल्या व्यक्तींना बँक कर्ज देणे नाकारते.

cibil स्कोअर पुढील गोष्टींसाठी महत्वाचा असतो.   *कर्ज मिळवणे *क्रेडिट कार्ड मिळवणे

फायनान्स बँकिंग डिजिटल मार्केटिंग सारख्या अनेक विषयांवरील नवनवीन माहिती साठी भेट द्या www.rikamakhisa.com या वेबसाइट ला